आज खुणावते मला, माझ्या माहेरची वाट
आज खुणावते मलामाझ्या माहेरची वाट
दृष्ट लागोना कुणाची
आणि सुखा गालबोट
माझ्या माहेरची वाट
जसा झरोका मायेचा
आनंदाच्या वनामध्ये
कल्पवृक्ष हा छायेचा
माझ्या माहेरची वाट
वाट डोंगराएवढी
कृष्ण माझा बंधुराया
त्याची माया गं केवढी
माझ्या माहेरच्या घरी
उभी दारात वहिनी
भाऊ माझा भाग्यवान
अशी लाभाया सजणी
माझ्या माहेरची वाट
काय वर्णू थाटमाट
सारा मायेचा पसारा
त्याची गोडी शब्दातीत