हे माणसा माणसासारखं वाग - मराठी कविता

हे माणसा माणसासारखं वाग, मराठी कविता - [He Manasa Manasasarakh Vaag, Marathi Kavita] एवढा अहंकार आला तरी कोठून तुझ्यात, हे माणसा माणसासारखं वाग.
हे माणसा माणसासारखं वाग - मराठी कविता | He Manasa Manasasarakh Vaag - Marathi Kavita

एवढा अहंकार आला तरी कोठून तुझ्यात

एवढा अहंकार आला तरी कोठून तुझ्यात
हे माणसा माणसासारखं वाग

तु पण एक प्राणी आहेस हे विसरला आहेस का?
हे माणसा माणसासारखं वाग

तुला बहिण, मुलगी, परस्त्री नाही ओळखायला येत
हे माणसा माणसासारखं वाग

माणसापेक्षा धर्म, जात, पक्ष, मोठा नाही
हे माणसा माणसासारखं वाग

गटा, तटात विभागला गेलास रे तु
हे माणसा माणसासारखं वाग

का? आणि कशासाठी? मारतोयस तु दुसऱ्याला
हे माणसा माणसासारखं वाग

काय घेवून आलास तू आणि काय घेवून जाणार आहेस तु
हे माणसा माणसासारखं वाग

का नाही कळत तुला किंमत तुझ्या जिवनाची
हे माणसा माणसासारखं वाग

तु, मी, आपण सर्व एकच आहोत रे
हे माणसा माणसासारखं वाग

का तु बंधिस्त करून घेतलेस स्वतःला
हे माणसा माणसासारखं वाग

ये माणसात तोडून तुझी सर्व बंधने
हे माणसा माणसासारखं वाग

घेवू दे भरारी तुझ्या विचारांना, पंखाना
हे माणसा माणसासारखं वाग

हे जिवन खुप सुंदर आहे, जगुण घे आताच
हे माणसा माणसासारखं वाग

पुन्हा तुला माणसाचा जन्म भेटेल का? नाही
हे माणसा माणसासारखं वाग
हे माणसा माणसासारखं वाग


टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.