माझ्या आनंदाचे गोत्र - मराठी कविता

माझ्या आनंदाचे गोत्र, मराठी कविता - [Majhya Anadache Gotra, Marathi Kavita] ओल्या मातीलाही कधी, येई काळाचा सुगंध.
माझ्या आनंदाचे गोत्र - मराठी कविता | Majhya Anadache Gotra - Marathi Kavita

ओल्या मातीलाही कधी, येई काळाचा सुगंध

ओल्या मातीलाही कधी
येई काळाचा सुगंध
धरा हरखून जाई
कवे मावेना आनंद

किती रहस्ये दडली
धरित्रीच्या या गर्भात
वेणा किती रे सोसल्या
तिने थाटात माटात

आज जाणावे वाटते
तिच्या अंतरीचे गूज
थोडी ऐकावी हळूच
निसर्गाची कुजबुज

आता गळुनीया पडो
पिढ्या पिढ्यांचे जोखड
पाणी पिऊन नवेली
झाली धरणी ओसाड

चला पिकवू हे शेत
घेऊ नांगर हातात
नका पुसू आता मला
माझ्या आनंदाचे गोत्र


अजित पाटणकर | Ajit Patankar
सभासद, मराठीमाती डॉट कॉम
बालपणापासून काव्यलेखनाची आवड असणारे बडोदा, गुजरात येथील अजित पाटणकर हे मराठीमाती डॉट कॉम येथे मराठी कविता या विभागात लेखन करतात.

1 टिप्पणी

  1. खूप छान..👌👌
स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.