कोडं - मराठी कविता

कोडं, मराठी कविता - [Koda, Marathi Kavita] प्रत्येक संवाद, प्रत्येक नातं, प्रत्येक अशी गोष्ट जी हृदयाला काहितरी सतत सांगत असते इशारा देत असते.

हृदयात त्याच्या हेच दाटलेले असेल

प्रत्येक संवाद, प्रत्येक नातं, प्रत्येक अशी गोष्ट जी हृदयाला काहितरी सतत सांगत असते इशारा देत असते, प्रत्येक असा अनुभव जो काहितरी शिकवतो

अनुभव, नातं, संगत, कथा, विचार-आचार, संसार, परमार्थ, उपदेश, आदर, निष्ठा, श्रद्धा याच काही गोष्टी आपणही घेतो देतो देवाण घेवाणही करतो

मग का म्हणून या उपदेशक गोष्टींना असेच विचारतो
नाही म्हणून का आपण स्वतःलाच त्रास देतो

परिस्थितीच्या जाळ्यात का अजूनही कोणीतरी अडकलाय
अरे वेळ गेल्यावरही का ते तसेच बांधलेले राहतात

पुढे गेल्यावर कुठे आजही मला आठवतं
एरवी मला चिडवणारं का माझ्यावरच खुपतं

काहीतरी समजल्यावर मला नक्की आनंद वाटेल
हृदयाचा ठोका बंद झाला तरी नाही सांगेल

बघितली होती वाट कधीतरी, त्या दिवशी नशेतच कुठेतरी होतो
सिगारेटच्या धुरा बरोबर सगळंच काही चूकवून बसलो

आजही आठवतं तीळ तीळ भटकणारा हा जीव कधीतरी एका दिव्या सारखा नक्की जळेल
तोंडा मधले थोडे घास त्यांच्यासाठीही वाढेल

समजूतदार म्हणून घेऊन स्वतःला काही वेळ शांत करू शकेल
डोक्यावर लिहिलेलं नाही कधी पुसू शकेल

निर्दयी, दयनीय, सहानुभूती, कळकळ कदाचित तेव्हा कधीतरी मनात दाटेल
त्याच्या करिता ते अश्रू तेंव्हा त्या डोळ्यात साठेल

वेग वेगळं वळण परिस्थीती घेत असतांना आपलेही कुठेतरी परके होतील असं कधीतरी वाटेल
त्याला कधीतरी आठवावे एवढंच फक्त सांगेल

जवळ कधीही कोणाच्या कोणीच नसतं
मग का आपलंच मन आपल्यालाच खात असतं

देव, देवांनी, ईश्वराने, प्रभूने सगळ्यांना हा एक मार्ग दिलाय
निशब्द राहून तू फक्त ऐकुन घे हा एकच पर्याय आता उरलाय

रडून रडून तू काय अन्‌ किती रडशील
काहीतरी मिळावं यासाठी इतका स्वार्थी बनशील

विचार केला तर आणखी खुप काही आज कदाचित आठवेल
हृदयात त्याच्या हेच दाटलेले असेल

शोधालय असा एक गुप्तहेर तोच फक्त हे सगळं शोधून काढू शकेल
जीवन अन्‌ मरण ह्याच्या परिक्षेत तोच फक्त पास होऊ शकेल

आनंद दांदळे | Anand Dandale
सभासद, मराठीमाती डॉट कॉम
मराठी कविता या आणि अशा विविध विभागात लेखन.

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.