...अन् मनातील अश्रूंचे धबधबे दुष्काळातही तसेच वाहत राहतील
तिची मी बघितलेली वाट कधीही चुकली नव्हतीरोज तिची आठवण मनात फक्त बोचत होती
कितीही गदारोळ मनाच्या घरात तिच्या विषयी झाला
तरीही तिला विसरणं मला श्क्य नव्हते
आठवण आजही आली तरी दोन अश्रू ढाळतच होतो
मी कधी काळी शांत असलो की तिची आठवण जरूर यायची
कदाचित माझीही आठवण तिला व्हायची?
मारलेल्या त्या गप्पा अन् बोललेल्या त्या गोष्टी
सहज आज मला कालच्या दुनियेत परत नेतील
एकदा का होईना त्या निमित्ताने तरी ती मला आठवणीत घेऊन जाईल
जगाच्या अन् मनाच्या कोपऱ्यात मी तिला रोज लिहित होतो
माझ्या शब्दांत ती आणखी सुंदर दिसावी याचा प्रामाणिक प्रयत्न मी रोज करत होतो
आठवण माझी ती घेईल न घेईल या मोठ्या प्रश्नाकडे मला वळायचे नव्हते
तिच्या आठवणीत आणखी किती दुःख मी मनात साठवायचे होते
वेगवेगळ्या क्षणात कधी कधी अश्रूंसारखे शब्द सुसाट वेगात वाहत होते
मग मनाच्या डबक्यातच का शब्दांचे ढग साठले होते
रागात न बोलण्याची सवय ही प्रेमा पलिकडची तिची होती
हे वेगळं प्रेम बघण्याची पहिलीच वेळ माझी होती
राग, शब्द, प्रेम, लोभ, सौंदर्य या बाराखडीत ती बसायची
मग माझ्याच मनाच्या कोपऱ्यात का दबा धरून बसायची
मला पडलेली अनेक प्रश्न ती विसरण्यासाठी जबाबदार ठरतील
अन् मनातील अश्रूंचे धबधबे दुष्काळातही तसेच वाहत राहतील