राग निसर्गाचा - मराठी कविता

राग निसर्गाचा, मराठी कविता - [Raag Nisargacha, Marathi Kavita] निसर्गा अरे रागाऊ नकोस, तुमच्या दुःखात मी सहभागी होणार नाही! असे म्हणू नकोस.

असे तुझे वर्तन पहिल्यांदाच पाहत आहोत

निसर्गा अरे रागाऊ नकोस
तुमच्या दुःखात मी सहभागी होणार नाही! असे म्हणू नकोस

गेली कित्तेक वर्षे आम्ही तुझ्या सोबत आहोत
असे तुझे वर्तन पहिल्यांदाच पाहत आहोत
तुझी बदलेली वृत्ती तू कसा पाहू शकतोस
निसर्गा अरे रागाऊ नकोस, तुमच्या दुःखात मी सहभागी होणार नाही! असे म्हणू नकोस

मिळून मिसळून राहण्याची आपली सवय का तू विसरलास?
असं काय झालंय?
तू कोणाचीही पर्व न करता एवढा रागावलास
निसर्गा अरे रागाऊ नकोस, तुमच्या दुःखात मी सहभागी होणार नाही! असे म्हणू नकोस

तुझ्या वाचून आम्ही कसे बरे जगू शकतो
असा दुष्काळ आणून का तू छळतो
एवढ्या वेदना आम्हाला का देतोस
निसर्गा अरे रागाऊ नकोस, तुमच्या दुःखात मी सहभागी होणार नाही! असे म्हणू नकोस

आई सुद्धा रागावल्यावर तिला वाईट वाटते
अश्रू गळून ती आपल्या पोरस जवळ करते
तू असं करून काय विनाश करू पाहतोस
निसर्गा अरे रागाऊ नकोस, तुमच्या दुःखात मी सहभागी होणार नाही! असे म्हणू नकोस

पुरे झाले आता हे रागावणं
सोड आता रूसवा कर हिरवे रान
का एवढा तू निष्ठुर होतोस
निसर्गा अरे रागाऊ नकोस, तुमच्या दुःखात मी सहभागी होणार नाही! असे म्हणू नकोस

आनंद दांदळे | Anand Dandale
सभासद, मराठीमाती डॉट कॉम
मराठी कविता या आणि अशा विविध विभागात लेखन.

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.