राजकारण - मराठी कविता

राजकारण, मराठी कविता - [Raajkaran, Marathi Kavita] आजचं राजकारण जसा सिनेमा आहे, प्रत्येक जन जनू ट्रेलरवर ट्रेलर दाखवत आहे.

निवडणुका आल्या की मिळत असतात आश्वासने

आजचं राजकारण जसा सिनेमा आहे
प्रत्येक जन जनू ट्रेलरवर ट्रेलर दाखवत आहे

निवडणुका आल्या की मिळत असतात आश्वासने
मग पूर्ण होतात ती दीर्घ श्वासाने

सगळ्यांनाच हवं आहे आज वरच्यांचा मान
विसरू नका त्या मराठी मातीनं दिलेलं ज्ञान

राजकारण प्रत्येकच गोष्टीचं करायचं नसतं
आपल्या कडून होईल तेव्हडं फक्त चांगलंच करायचं असतं

कोणीतरी काळजी / कीव करा रे; त्या शेतकऱ्यांची
या राजकारणामुळेच दाटी होतेय त्यांची

म्हणतात असं ‘मनातून म्हटलेलं तो ऐकतो’
आम्ही पाहतोय रे बाबा वाट!

‘राजकारण’ करू नको फक्त एवढंच सांगतो
‘राजकारण’ करू नको फक्त एवढंच सांगतो

आनंद दांदळे | Anand Dandale
सभासद, मराठीमाती डॉट कॉम
मराठी कविता या आणि अशा विविध विभागात लेखन.

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.