व्यथा शेतकऱ्याची - मराठी कविता

व्यथा शेतकऱ्याची, मराठी कविता - [Vyatha Shetkaryachi, Marathi Kavita] निसर्गाने जसा आज कोप केलाय, असा हा वैतागलेला दुष्काळ पसरलाय.

तुया समोर आज एका शेतकऱ्याची व्यथा मांडतो

निसर्गाने जसा आज कोप केलाय
असा हा वैतागलेला दुष्काळ पसरलाय
वाटोळा झालाय आज त्या संसाराचा
ज्यांना सुख नाही लाभलाय त्या निसर्गाचा

स्वतःचा विचार न करता सतत कष्ट केले
काय रे देवा तू हेच हातावर दिले
रडून रडून गळा सुकलाय आमचा
कसा चालील गाडा आता आमच्या जीवनाचा

अशी हि कठोर शिक्षा काशाले देतोस
किती त्रास आम्ही भोगतोय याचीच मजा पाहतोस
आत्ता तरी छळ आमचा एवढा करू नकोस
तुझ्या देवळात उद्या दिवा न लागायला भाग पाडू नकोस

कसे बरे जगतील आत्ता ते उरलेले
देव तू तरी गाळ आत्ता अश्रू राहिलेले
अशी हि वाईट परिस्थिती आमच्या जीवावर बेतली
अन्‌ तिनं साऱ्याच्या जीवनाची घोट घेतली
तू जरी मदतीले नाही आला, तरी मी अजून कष्ट करतो
संकटाले समोर जाण्याची हिम्मत दाखून देतो

शेवटी तुले देवा एकच विनंती करतो
पुन्हा असा करशील तर तुले नमस्कार करणं सोडतो
तू आहेस दगडाचा तरी भक्ती भावना तुयी पूजा करतो
म्हणून तुया समोर आज एका शेतकऱ्याची व्यथा मांडतो
आनंद दांदळे | Anand Dandale
सभासद, मराठीमाती डॉट कॉम
मराठी कविता या आणि अशा विविध विभागात लेखन.

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.