आमचे दोस्त - मराठी कविता

आमचे दोस्त, मराठी कविता - [Amche Dost, Marathi Kavita] आमचे दोस्त काही जास्त नाहीत, आहेत जेवढे तेवढे सगळ्यांना माहित आहेत.

नका टेंशन घेऊ उद्याचं जग आपलं आहे...

आमचे दोस्त काही जास्त नाहीत
आहेत जेवढे तेवढे सगळ्यांना माहित आहेत

ते सगळे प्रेमळ स्वभावाचे
साधे सरळ अन्‌ मैत्रभावाचे

आमच्या अशा जिगरी दोस्तीत, येत नाही राग
आला तरी क्षणात करतो त्याग

आमच्या अशा दोस्तीत, लऽऽऽय गोडी आहे
चव चाखून पहा, किती दडलेली आहे

हे पहा मित्रहो, आपली दोस्ती अशीच राहिली पाहिजे
तिला टिकवण्याची, हिम्मतही असली पाहिजे

आज आहोत दुःखात आपण, मला माहित आहे
पण नका टेंशन घेऊ, उद्याचं जग आपलं आहे

आनंद दांदळे | Anand Dandale
सभासद, मराठीमाती डॉट कॉम
मराठी कविता या आणि अशा विविध विभागात लेखन.

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.