कोकणी पद्धतीचे उकडीचे मोदक - पाककृती

कोकणी पद्धतीचे उकडीचे मोदक, पाककला - [Ukadiche Modak Konkani Method, Recipe] महाराष्ट्रातील कोकणातील प्रसिद्ध असा एक अस्सल मराठमोळा महाराष्ट्रीय पदार्थ.
कोकणी पद्धतीचे उकडीचे मोदक - पाककृती | Ukadiche Modak Konkani Method - Recipe

उकडीच्या मोदकाच्या अनेक प्रकारापैकी एक कोकण पद्धतीचा उकडीचा मोदक

सण-उत्सव आणि गणेश चतुर्थीस नैवेद्य म्हणुन बनवीला जाणारा गोड पदार्थ म्हणजे उकडीचे मोदक, त्यातील अनेक प्रकारापैकी हा कोकण पद्धतीचा उकडीचा मोदक.

‘कोकणी पद्धतीचे उकडीचे मोदक’साठी लागणारा जिन्नस

(जिन्नस साधारण २१ मोदकांसाठी)
  • अर्धा किलो मऊसुत तांदळाचे पीठ
  • १ टेबलस्पून पातळ वनस्पती तूप किंवा शेंगदाना तेल
  • १ मोठा ओला नारळ
  • एक ते दीड वाटी गूळ
  • ७ ते ८ वेलदोड्यांची पूड

‘कोकणी पद्धतीचे उकडीचे मोदक’ची पाककृती

तांदूळ स्वच्छ धुवून सावलीत वाळवावे व दळून आणावे. प्रथम सारण तयार करून घ्यावे. पिवळ्या रंगाचा गूळ आणावा. तो विळीवर हलके हलके चिरावा. नंतर वाटीने मोजून साधारणपणे जेवढे ओले खोबरे मोजून भरेल त्याच्या निम्मा गूळ पुरतो. म्हणजे ३ वाट्या ओले खोबरे असेल तर दीड वाटी बारीक चिरलेला गुळ लागतो.

खोबरे व गूळ हाताने कालवावे. गॅसवर ठेवून शिजवावे. नंतर खाली उतरवून त्यात वेलदोड्याची पूड घालावी व सारण थंड होऊ द्यावे. जरा मोठ्या व जाड बुडाच्या पितळेच्या पातेल्यात उकड काढण्यासाठी पाणी तयार करावे. वाटीने(सपाट वाटी) तांदळाचे पीठ मोजून घ्यावे. (सपाट) व जेवढे पाण्यातच तेलाचे किंवा तुपाचे मोहन पीठ असेल तेवढे मोजून पाणी ठेवावे व मीठ घालावे. पाण्याला उकळी आली की त्यात वरील तांदळाचे पीठ वैरावे. उलथन्याच्या टोकाने ढवळावे. गॅस लहान करून झाकण ठेवावे व चांगली वाफ येऊ द्यावी. नंतर पातेले खाली उतरवावे.

जरा वेळाने त्यातली थोडी उकड ताटात काढून हाताला थोडे तेल व पाणी लावून मळावी. नंतर त्याचा मोठ्या लिंबाएवढा गोळा घेऊन वाटीसारखा आकार करावा. त्यात वरील नारळाचे पुरण भरावे. नंतर मुखऱ्या करून मोदकाचे तोंड बंद करावे. असे ७ - ८ मोदक झाले की मोदकपात्रातील चाळणीवर कपड्याचा तुकडा किंवा केळीच्या पानाचा तुकडा घालून त्यावर ठेवून १० मिनिटे वाफवावे.

स्वाती खंदारे
संपादिका, मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादकीय, मराठी लेख, फोटो गॅलरी, पाककला, महाराष्ट्र या आणि अशा विविध विभागांत लेखन.
अधिक माहिती पहासर्व लेखन पहा

जीवनशैली / पाककला


२ टिप्पण्या

  1. Great! Keep up the good work...
    1. आपल्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद!
स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.