
जोडी जुळवून देणाऱ्या गॅटमॅट मराठी चित्रपटाचे टीझर पोस्टर नुकतेच लाँच करण्यात आले आहे.
असे म्हणतात की जोड्या स्वर्गात बनतात. परंतु या बनलेल्या जोड्यांचा 'गॅटमॅट' हा खालीच होत असतो. यामुळे, जोडी कितीही ‘मेड फॉर इच अदर’ असली तरी, त्यांचे पहिले एकत्र येणे अधिक महत्वाचे असते.
अश्याच काहीश्या विषयावर आधारित ‘गॅटमॅट’ हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
‘यशराज इंडस्ट्रीज’च्या सहयोगाने ‘अवधूत गुप्ते’ यांची प्रस्तुती असलेल्या या सिनेमाच्या टीझर पोस्टरचा नुकताच श्री गणेशा करण्यात आला.
गणेशोत्सवाच्या मुहूर्तावर लाँच झालेला हा टीझर पोस्टर प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहे.
येत्या ‘१६ नोव्हेंबर’ला प्रेक्षकांच्या भेटीस येणाऱ्या, ‘निशीथ श्रीवास्तव’ दिग्दर्शित आणि ‘राजेंद्रप्रसाद श्रीवास्तव’ निर्मित, ‘गॅटमॅट’ या सिनेमाच्या टीझर पोस्टरवर ‘आम्ही जुळवून देतो’ असे उपशिर्षक असून, दोन प्रेमदूतदेखील यात आपल्याला पाहायला मिळतात. शिवाय प्रेमी युगुलांचे सांकेतिक चिन्हदेखील आपल्याला यात दिसून येत असल्यामुळे, हा एक रोमेंटिक सिनेमा असल्याचा अंदाज प्रेक्षकांना येतो.
या टीझर पोस्टरवरून सिनेमाच्या कास्टिंगबाबत कोणतीच माहिती मिळत जरी नसली तरी हा सिनेमा तरूणवर्गासाठी पर्वणी ठरणार आहे, हे नक्की.
२००२ । मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादक मंडळाद्वारे विविध विभागांतील साहित्याचे संपादन, पुनर्लेखन आणि संदर्भासहित नवीन लेखन केले जाते.
अधिक माहिती पहा । सर्व लेखन पहा