Loading ...

नाजुका आणि रायबा उधळणार प्रीती सुमने - मराठी चित्रपट

नाजुका आणि रायबा उधळणार प्रीती सुमने, मराठी चित्रपट - [Najuka Aani Rayaba Preeti Sumane Maaza Agadbam, Marathi Movie].

नाजुका आणि रायबा उधळणार प्रीती सुमने - मराठी चित्रपट | Najuka Aani Rayaba Preeti Sumane Maaza Agadbam - Marathi Movie

प्रेक्षकांना अगदी लोटपोट हसवणारा अगडबम सिनेमा आठ वर्षांपूर्वी भेटीस आला होता

या चित्रपटातील नाजुकाने प्रत्येक सिनेरसिकाचे मन जिंकलं होतं. त्यामुळे ही नाजुका पुन्हा एकदा ‘माझा अगडबम’ द्वारे प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

नाजुका आणि रायबा उधळणार प्रीती सुमने
नाजुका आणि रायबा उधळणार प्रीती सुमने

या सिनेमातील विनोदाचा उच्चांक गाठणारे ‘अटकमटक’ 'गाणे सध्या प्रेक्षकांचे तुफान मनोरंजन करत असतानाच, आणखीन एक ‘प्रीती सुमने’ हे लव्ह सॉंग सोशल नेट्वर्किंग साईटवर नुकतेच प्रदर्शित करण्यात आले आहे. ‘सुबोध भावे’ आणि ‘तृप्ती भोईर’ यांच्यावर चित्रित केलेलं ‘प्रीती सुमने’ हे गाणं नाजूका आणि तिचा पती रायबाच्या आगळ्यावेगळ्या प्रेमावर आधारित आहे.

नाजुका आणि रायबा उधळणार प्रीती सुमने
नाजुका आणि रायबा उधळणार प्रीती सुमने

‘पेन इंडिया लिमिटेड’ कंपनीचे ‘जयंतीलाल गडा’ आणि ‘तृप्ती भोईर फिल्म्स’ प्रस्तुत ‘माझा अगडबम’ हा सिनेमा ‘नाजूका’ या प्रमुख पात्रावर आधारित आहे. सर्वसामान्य प्रेमीयुगूलांपेक्षा अगदी हटके असणाऱ्या या जोडीची प्रेमछटा दाखवणारे ‘प्रीती सुमने’ हे गाणं ‘मंगेश कांगणे’ यांनी शब्दबद्ध केले आहे. तसेच, ‘टी. सतीश चक्रवर्ती’ यांनी या गाण्याला संगीत दिले असून, हिंदीची सुप्रसिद्ध गायिका ‘श्रेया घोषाल’सह त्यांनी हे गाणे गायले देखील आहे.

नाजुका आणि रायबा उधळणार प्रीती सुमने
नाजुका आणि रायबा उधळणार प्रीती सुमने

येत्या २६ ऑक्टोबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत असलेला ‘माझा अगडबम’ हा सिनेमा मनोरंजनाची खुमासदार मेजवानी प्रेक्षकांना घेऊन येत आहे. सुपरहिट ‘अगडबम’ चा दमदार सिक्वेल असलेल्या या सिनेमाचे दिग्दर्शन आणि लेखन तृप्ती भोईरनेच केले असून, ‘टी. सतीश चक्रवर्ती’, ‘धवल जयंतीलाल गडा’ आणि ‘अक्षय जयंतीलाल गडा’ यांसोबत तिने निर्मितीफळीतदेखील आपला सहभाग दर्शवला आहे. शिवाय, ‘रेश्मा कडाकिया’, ‘कुशल कांतीलाल गडा’ आणि ‘नीरज गाला’ यांनी या सिनेमाच्या सहनिर्मात्याची धुरा सांभाळली आहे.

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची