शब्द सुंदर केवढा - मराठी कविता

शब्द सुंदर केवढा, मराठी कविता - [Shabd Sundar Kevadha, Marathi Kavita] शब्द सुंदर केवढा, पारिजातकाचा सडा.
शब्द सुंदर केवढा
शब्द सुंदर केवढा
पारिजातकाचा सडा
शब्द पाऊस हा वेडा
शब्द जमिनीचा ओढा

शब्द संतांच्या दारी
शब्द मंदिरात हरी
शब्द कबीराचे करी
शब्द झाले एकतारी

शब्द पाखरांच्या दिठी
तुका ज्ञानियाच्या भेटी
शब्द भीमेच्याही काठी
शब्द सिंधूच्या ललाटी

शब्द बासरीची धून
शब्द श्रावणाचे ऊन
शब्द पायात रूतून
शब्द बंबाळ अजून

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.