
इच्छा आकांक्षेच्या छायेत
अपेक्षांच्या वेलीवर फुले फुलतात अनेक
प्रत्येक फुलांची आस करुनी
कळी हि फुलवायची असते
निराशेचे काटे म्हणून
बाग का तोडायची असते?
बाग बहरते सर्व रंगांनी
फुलं हे क्षणभंगुर सत्य कटू आहे
असो परी गुलाब सुंदर
त्यालाही गळावे लागते
अनगिणत दुःख जीवनात तरी
फुलांची आस सोडायची नसते