बावरे प्रेम - मराठी कविता

बावरे प्रेम, मराठी कविता - [Baware Prem, Marathi Kavita] श्रेष्ठत्वाच्या लेखणीने, लिहितोय हि तुझी कविता.
बावरे प्रेम
श्रेष्ठत्वाच्या लेखणीने
लिहितोय हि तुझी कविता
कल्पनेच्या पानांवरती
शब्द विसावती रक्ताची सरिता

आठवण तुझी येता मनी
निसर्ग बघ कसा सजला
जवळ नाहीस म्हणून बघ
कसा हिणावतोय मला

हळूच कानात वारा गुपचूप
विचारतोय मला
वेडापिसा झालोय मी
काय करशील तिच्या करिता?

तुझ्या आठवणींची साक्ष देत
उत्तर दिले तडाख त्याला
स्वतःलाही जाळू शकतो
डोळ्यातील तिच्या काजळाकरिता

घुंघरू बनून नाचेलही
सोबत तिची घेण्या करिता
संपूनी टाकेल इथेच स्वतःला
आठवणीत तिच्या राहण्या करिता

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.