
मूर्ती मोहक सुंदर सावळी
गुंतला जीव हा तिच्यावरी
नयनात तिच्या भान हरवितो
न बोलून बोलण्याची
अदा खेळते याच नैनी
कला क्षणात ती लाजण्याची
करमेना विना तिच्या… सुचेना काही
नजरेला तिची नजर मिळता
उमलते काळी मनाच्या मनी
जणू ते रूप किरण आशेची
स्मित तिचे उष:काल माझी
इच्छा एकाच आहे अंतरी
गुंतला जीव हा तिच्या वरी
भाकीत जुळावे आता दोघांची
अर्पण तिलाच कविता माझी