लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा
लहानपण देगा देवा
मुंगी साखरेचा रवा
ऐरावत रत्न थोर
त्याशी अंकुशाचा मारा
बालपण किती सुख विलासात गेले
हवेचे झुळूक जसे झाडावरची फुले
खेळता बागडता क्षणात दिस गेले
मस्ती मौज करता तरुणपण आले
मित्रांची मैफिल घेऊन गाव सारे पिंजले
वेशिवारची आमराई शिवारातली फुले
झाडावरचा तो झोपाडा नदीकाठची घरे
- आकाश भुरसे