तुझा अबोला - मराठी कविता

तुझा अबोला, मराठी कविता - [Tujha Abola, Marathi Kavita] नजर माझी होती तुझ्यावर, तुझी प्रीत जडली मजवर.
तुझा अबोला
नजर माझी होती तुझ्यावर
तुझी प्रीत जडली मजवर

मैत्रीण ती तुझी
गोष्ट तुझी येऊन सांगायची

प्रयत्न खूप केला बोलण्याचा
बघत नाही नजर उठवूनी

मनातील भावना
मनात ठेऊनी

सुटेल कधी शब्दांचे वादळ?
कळेल केव्हा मनाची तळमळ?

कधी तुझा अबोला सुटेल
कधी तुझे मन कळेल?

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.