चंद्रनाट्य - मराठी कविता

चंद्रनाट्य, मराठी कविता - [Chandra Natya, Marathi Kavita] धरी का मम, करी कर, जावे क्षमया, पाहे चंद्रकला.
चंद्रनाट्य - मराठी कविता | Chandra Natya - Marathi Kavita
धरी का मम, करी कर
जावे क्षमया, पाहे चंद्रकला
पाहे चंद्रकला, अवघडे
चांदणे स्वर न्ह्याला

या वदे इच्छये पर
क्षर श्रमती, विरही अश्रुमाला
उमगती विलासे आकंठी
मनी वरुणराज विसला

खड्ग परीस वा भृगमय
शरीरा, रजनी स्पर्शीयते
मनी नवनीत भासे कटू मम
तरी क्षण जिव्हा गुणगुणते

आनंदे क्षण भोगित प्रति
जन, समयी बोबडती
वावगे प्रेमया कारण पुसता
चांदणे लखलखती
रोहित साठे | Rohit Sathe
सभासद, मराठीमाती डॉट कॉम
मराठी कविता या विभागात लेखन.

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.