भग्न आणि गुदमरलेली नदी नाली - मराठी कविता

भग्न आणि गुदमरलेली नदी नाली, मराठी कविता - [Bhagna Aani Gudmarleli Nadi Nali, Marahi Kavita ] मुंबईतले ​​भग्न आणि गुदमरलेली नदी नाली आज मनोमन हसली.
भग्न आणि गुदमरलेली नदी नाली - मराठी कविता
मुंबईतले भग्न आणि गुदमरलेली नदी नाली आज मनोमन हसली
जणू त्यांचा, या पावसाळी पुन्हा नवा जन्मच झाला
मी लपुन स्वतः पहिले त्यांचे आनंदाश्रू

जणू त्यांनी सर्वस्व अर्पण करून उपभोग करून घेतला पावसासोबत पुन्हा पुन्हा
मनाने आणि तणाने स्वच्छ होण्यासाठी

मी पाहिलं इथली सगळी नदी नाली उसवून घेत होती
स्वतःलाच पुन्हा पुन्हा
आणि मिळेल तितक्या पाण्यात विवस्त्र होऊन न्हाहून घेत होती स्वतःलाच पुन्हा पुन्हा

पावसालाही वास आला असेल त्यांच्या दुर्गंधीचा
त्यालाही बघवलं नसेल त्यांच्या पोटात अडकलेलं प्लास्टिक आणि बरचं काही
म्हणून तोही बेभान बरसला, कडाडला आणि आंनदाने रडला सुध्दा

३ टिप्पण्या

  1. खूपच छान गवते , अप्रतिम लिखाण
    1. आपल्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद!
  2. धन्यवाद
स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.