अशी कशी हि मैत्री आपली, हिला नाव काय मी देऊ?, वेड लागले असे कसे हे, तुला नजरेत कसा मी ठेऊ?
अशी कशी हि मैत्री आपली
हिला नाव काय मी देऊ?
वेड लागले असे कसे हे
तुला नजरेत कसा मी ठेऊ?
थरकाप झाला तुझा माझा
शब्द पुढे कसे नेऊ?
वेड लागले मला तुझ्या प्रेमाचे
सांग तुझ्यात कसा मी वाहून जाऊ?
अश्या प्रेमाची सवयच नव्हती
तुला कसे मी दाखवून देऊ?
अशी कशी हि मैत्री आपली
हिला नाव काय मी देऊ?
हिला नाव काय मी देऊ?