सुखाच्या शोधात - मराठी कविता

सुखाच्या शोधात, मराठी कविता - [Sukhachya Shodhat, Marathi Kavita] मनाला नेहमीच आस, लागलेली असते सुखाची.

मनाला नेहमीच आस, लागलेली असते सुखाची

मनाला नेहमीच आस
लागलेली असते सुखाची
होत असते घायाळ
लागता चाहूल दुःखाची

दुःखामागून येते सुख
हे नसते त्यास ठाऊक
नसतेच दुःखात गांगरुन
होत असते भावुक

दुःखातून कळत असते
नेहमी सुखाची महती
आधी सोसल्या वेदना
तर येते सुख हाती

म्हणून कधीच पाठमोरे
होऊ नये पाहून दुःखाला
करुन त्याचा सामना
जिंकून घ्यावे सुखाला

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.