एकदा खरेदीला निघालो, पण मला जे हवं होतं, ते कुठेच सापडेना
भीमाच्या नावाचा झाला जागरमाणुसकीला मिळाला मान
कोणी ना लहान मोठे
झाले सर्व एक समान ॥१॥
बुद्ध धम्माची घेऊन दिक्षा
पंचशिलेचे केले पठन
अन्यायाचा करुनी प्रतिकार
संघर्षाचे केले गठन ॥२॥
चवदार तळ्याचे पाणी
नाही राहिले तळ्यात
भागली तहानलेल्याची तहान
फुलली मानवता मळ्यात ॥३॥
झाले राज्यघटनेचे शिल्पकार
पाडले दगडाला पैलू
नाही जन्मणार असा हिरा
व्यक्तिमत्व त्यांचे अष्टपैलू ॥४॥
शांतीचा रंग निळा
निळ्या गगनात झळकला
जयघोष होता भीमाचा
अनुयायी तिथेचा ओळखला ॥५॥
बुद्धं शरणं गच्छामि बोलू
जाऊ बुद्ध धम्माच्या मागे
अज्ञानाला उजेडी आणू
ज्ञानसाधनेला करुनी जागे ॥६॥