महती महाराष्ट्राची - मराठी कविता

महती महाराष्ट्राची, मराठी कविता - [Mahati Maharashtrachi, Marathi Kavita] मराठी पाऊले न राहता मागे, सदा पडत राहती पुढे.

मराठी पाऊले न राहता मागे, सदा पडत राहती पुढे

मराठी पाऊले न राहता मागे
सदा पडत राहती पुढे
निळ्या नभाच्या प्रांगणात
विजया पताका उडे

थोर साधु, संत, महात्मांनी
पावन झालेली ही भूमि
अभंग, ओवी, कविता, लेख
नसे कोणत्या साहित्याची कमी

शिवरायाच्या तलवारीने लावला
धाक दृष्टकर्मी यवनाला
जल्लोष हर हर महादेवाचा
जागला माता जिजाऊच्या वचनाला

सह्याद्रीच्या कडा कपारीतून
वाहती निर्मळ पाण्याच्या धारा
हिरव्या गर्द वनराईतूनी
वाहे थंडगार मधुर वारा

सोज्वळतेने नटले सजले
महाराष्ट्र आमुचे राज्य
एकता व विविधतेने गाजलेले
होणार नाही कधी अविभाज्य

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.