मनाची होडी - मराठी कविता

मनाची होडी, मराठी कविता - [Manachi Hodi, Marathi Kavita] मनाची होडी आज जेजेच्या बेटावर पुन्हा फिरून आली, आठवणीतल्या त्या ओल्या रंगांना अलगद स्पर्शून आली.

मनाची होडी आज जेजेच्या बेटावर पुन्हा फिरून आली, आठवणीतल्या त्या ओल्या रंगांना अलगद स्पर्शून आली

मनाची होडी आज जेजेच्या बेटावर पुन्हा फिरून आली
आठवणीतल्या त्या ओल्या रंगांना अलगद स्पर्शून आली

मातीच्या त्या स्पर्शाने ती स्वतःसच आकारू पाहू लागली
मनाची ही होडी आपला मार्ग बनवू पाहू लागली

आता ह्या होडीच्या लाकडाला देखील पालवी फुटायला लागली
कारण
मनाची ही होडी आज जेजेच्या बेटावर फिरून आली


केदार नामदास | Kedar Namdas
सभासद, मराठीमाती डॉट कॉम
मराठी कविता या विभागात लेखन.

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.