दलदल - मराठी भयकथा

दलदल, मराठी भयकथा - [Daldal, Marathi Bhaykatha] लग्नाच्या आमिषाने फसवणुक करुन कोठ्यावर विकल्या गेलेल्या एक तरुणीच्या स्वप्नांची राख रांगोळी झाल्यावर, आपल्या अब्रुची लक्तरे वेशीवर टांगली जाण्यापेक्षा त्या तरुणीने मृत्युला जवळ करणे पसंत केले. आपल्या सारख्या इतर दुर्दैवी मुलींना वासनेच्या व्यापारी गिधाडांपासुन वाचवण्यासाठी तिच्या मृत्युनंतर सुरु झालेल्या रक्तरंजित लढ्याची रोमांचक कहाणी म्हणजे दलदल.

लग्नाच्या आमिषाने फसवणुक करुन कोठ्यावर विकल्या गेलेल्या एक तरुणीच्या स्वप्नांची राख रांगोळी झाल्यावर, आपल्या अब्रुची लक्तरे वेशीवर टांगली जाण्यापेक्षा त्या तरुणीने मृत्युला जवळ करणे पसंत केले. आपल्या सारख्या इतर दुर्दैवी मुलींना वासनेच्या व्यापारी गिधाडांपासुन वाचवण्यासाठी तिच्या मृत्युनंतर सुरु झालेल्या रक्तरंजित लढ्याची रोमांचक कहाणी म्हणजे दलदल.

स्थळ: हॉटेल मुन लाईट
वार: शनिवार
वेळ: रात्री १२:४०

‘‘सर, आम्हाला एकुण दोन मेल डेड बॉडीज मिळाल्या. त्यापैकी एक बेडवर पडली होती तर दुसरी बाथरूमच्या दरवाज्यात. पहिल्या डेड बॉडीवर कसल्याच खुणा आढळल्या नाहीत. बाहेर आलेले डोळे आणि लटकणारी जीभ मात्र व्हिक्टीमला फाशी दिले असावे असेच सुचीत करते. पण आम्हाला ना दोर सापडला, ना एखादा स्टुल, ना गळ्यावर बोटांचे ठसे आढळले. मान मात्र आवळल्यासारखी स्पष्ट दिसते. पंखा लटकवलेल्या हुकवर दोरीचे धागे वगैरे काही सापडतात का म्हणुन चेक केले पण काहीच सुगाव लागला नाही. आम्हाला रुममध्ये हातांचे काही ठसे मिळाले, ते दोन्ही व्हिक्टिम्सच्या हातांच्या ठश्यांशी मॅच होत आहेत. दुसऱ्या डेड बॉडीची अवस्था फारच वाईट होती. शरीरातील बहुतेक हाडे मोडली होती. जणु कोणी प्रचंड ताकदीने त्याला उचलुन उचलुन आपटला होता. डोक्याचा पुरा चेंदा मेंदा झालेला होता. बाथरूम मध्ये सगळीकडे रक्तच रक्त पसरले होते. माझ्या इतक्या वर्षाच्या करीयरमधे मी पहिल्यांदाच इतकी निर्घृण हत्त्या पाहिली. आम्हाला रूम मधील एका कोपऱ्यात, अर्धवट शुद्धितील एक मुलगी सापडली. आम्ही घटनेबद्दल प्रश्न विचारले पण ती प्रचंड शॉक मधे असल्याने, तिने काहीच उत्तर दिले नाही. ती बोलण्याच्या अवस्थेत नसल्यामुळे आम्ही तिला हॉस्पिटलमध्ये भरती केलंय.

बेडवरील बॉडीची ओळख पटली आहे. खिशातील कागदपत्रांवरून कळले की ती बॉडी एका बिल्डरची आहे आणि त्याचे नाव पवन कुमार आहे. बाथरूम मधील बॉडी एका एजंटची आहे ज्याचे नाव फिरोज आहे. तो कस्टमर्सना मुली पुरवतो. आम्ही बरेच दिवस त्याला ट्रॅप करण्याचा प्रयत्न करत होतो. एकंदर प्रकारावरुन ती मुलगी एक कॉलगर्ल असावी, पण चेहऱ्यावरून चांगल्या घरातील वाटते. कदाचित ह्युमन ट्रॅफिकिंग मध्ये फसली असेल. तिचा एजंट फिरोज, तिला पवन कुमारला डिलिव्हर करण्यासाठी आला असावा असा प्राथमिक अंदाज आहे. खुनाबद्दल कोणालाच काहीच माहिती नाही. पंचनामा झाल्यावर दोन्ही बॉडीज आम्ही पोस्ट मॉर्टेमसाठी पाठवल्या आहेत. हॉटेलच्या स्टाफ बरोबर आमची चौकशी सुरु आहेच. खुन कसे घडले हे ती मुलगी स्टेबल झाल्यावरच कळु शकेल कारण ती एकमेव प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आहे. मी तुम्हाला अपडेट्स देत राहीनच.” हॉटेल मुन लाईट मधुन बाहेर पडणारे इन्स्पेक्टर माने आपल्या वरिष्ठाना रिपोर्ट करत होते.

[post_ads] डॉक्टरनी झोपेचे इंजेक्शन दिल्यामुळे निशा रात्रभर गाढ झोपेत होती. सकाळी इंजेक्शनचा परिणाम ओसरु लागल्यावर निशा हळुहळु शुद्धीवर येऊ लागली, तसा तिच्या डोळ्यासमोर आदल्या रात्री घडलेला प्रसंग जसाच्या तसा ऊभा राहीला. सगळे आठवुन ती आणखीनच भयभीत झाली. नर्सने तिला शांत होण्याच्या गोळ्या दिल्यावर ती थोडी नॉर्मल झाली. आपण हॉस्पिटलमध्ये असल्याचे जाणावताच तिला थोडे हायसे वाटले पण अजुनही तिचे सर्वांग थरथरतच होते. डॉक्टरांनी परवानगी दिल्यावर निशाचा कबुली जबाब नोंदवण्यासाठी, इन्स्पेक्टर माने दोन लेडी कॉन्स्टेबल्स सोबत सकाळी दहा वाजता निशाच्या रूममध्ये आले.

[next] त्यांनी निशाला पोलीसी स्टाईल मधे प्रश्न विचारायला सुरवात केली, “तुझे नांव काय आहे? काल रात्री हॉटेल मुन लाईट हॉटेलमधे तु काय करत होतीस? पवन आणि फिरोजचा खुन कसा झाला? तुझा त्यांच्याशी काय संबंध? तु त्या दोघांना मारलेस की दुसऱ्या कोणी? तुमच्या तिघांशिवाय रूम मधे इतर कोण कोण होते? ते मेल्यावर तु रूममध्येच का थांबलीस? पळून का नाही गेलीस?” प्रश्नांच्या भडीमाराने निशा पुरती भांबावुन गेली. काय ऊत्तर द्यावे ते न कळल्यामुळे बिचारी रडु लागली. डॉक्टरांनी समज दिल्यावर इन्स्पेक्टर मानेना आपली चुक उमजली. त्यांनी निशाला विश्वासात घेतले. निशाची कहाणी ऐकुन बेडर असलेले इन्स्पेक्टर मानेही क्षणभर हादरले.

‘‘माझे नांव निशा. मी मुळची सांगलीची. घरची गरीबी, वडिलांची नोकरी गेलेली. त्यात त्यांना असलेले दारुचे व्यसन. आई लोकांकडे धुणीभांडी करते. धाकटा भाऊ पेपर आणि दुध टाकतो. मी कसे बसे ग्रॅजुएशन पुर्ण केले. वडिलांच्या मित्राने मुंबईत नोकरी लावतो सांगुन, मला इथे आणले आणि एका एस्कॉर्ट सर्विसला विकले. आधी मला काही समजलेच नाही पण तिथल्या मुलींनी मला तिथे काय चालते ते सांगितल्यावर मला धक्काच बसला. मी विरोध केला तर मला उपाशी ठेवले, ठार मारायची धमकी दिली, प्रसंगी पट्याने मारले पण. काल मला एका एजंटने जबरदस्तीने हॉटेल मुन लाईट वर आणले. विरोध केल्यास माझ्या कुटुंबाला इजा पोहोचेल अशी त्याने मला धमकी दिल्याने मी त्याच्या बरोबर गुपचुप आले.

एक माणुस तिथे आल्यावर तो एजंट मला त्या माणसाच्या मागोमाग हॉटेल मधील त्याच्या रुमवर घेऊन गेला. व्यवहाराचे बोलणे होताच मला सकाळी घ्यायला येतो सांगुन तो एजंट पैसे घेऊन जायला निघाला पण रुमचा दरवाजा लॉक झाला होता. काही केल्या उघडेना. मग त्या माणसाने रिसेप्शनला फोन लावला पण फोनही लागेना. अचानक त्या रूममध्ये खुप गारवा जाणवु लागला. दिवे बंद चालु होऊ लागले. पंखा चालु नसताना पण पडदे फडफडू लागले.” बोलता बोलता निशाला घाम फुटला. तिच्या चेहऱ्यावरचे भय, ती परत त्याच अनुभवातुन जात होती हे दर्शवत होते. लेडी कॉन्स्टेबलने थोडे पाणी पाजताच निशा नॉर्मल झाली.

[next] निशा शांत झाल्यावर पुढे काय झाले ते सांगु लागली. “त्या रुम मधले फर्नीचर आपोआप हलु लागले. आम्ही तिघही घाबरलो आणि रूममधुन बाहेर पडायचा प्रयत्न करू लागलो पण दरवाजा काही उघडेना. अचानक कोणीतरी मला हवेत उचलले आणि मी रुमच्या एका कोपऱ्याकडे तरंगत जाऊ लागले. त्या प्रकाराने मी खुप घाबरले. माझे पाय जमीनीला लागताच मी एका सोफ्याच्या मागे लपले आणि काय घडतंय ते पाहु लागले. डोळ्याची पापणी लवते न लवते तोच तो माणुस वेगाने फेकला गेला आणि धाडकन बेडवर आदळला. तो उठुन बसतो तोच, आपला गळा दोन्ही हातानी धरून जोरजोरात खोकु लागला.

बघता बघता तो माणुस हवेत उचलला गेला. त्याचा गळा आवळला जात असल्यासारखा तो तडफडु लागला. त्याने स्वत:ला सोडावायचा खुप प्रयत्न केला पण जी अदृश्य ताकद त्याचा गळा आवळत होती, त्या ताकदीपुढे त्याचे काहीच चालले नाही. हा प्रकार सुरु असताना तो एजंट आपल्या जवळील सुरा काढुन माझ्या दिशेने धावला. सुरा माझ्या गळ्यावर आडवा लावुन त्याने मला ढाल बनवले आणि ओरडला, “तू जो कोई भी है छोड़ उसको, वरना इसकी गर्दन चिर डालुँगा।” तो माणुस मेल्याची खात्री पटताच त्या शक्तीने त्याचे मृत शरीर बेडवर फेकले आणि हवेचा एक झोत आमच्या दिशेने झेपावला.”

“त्या एजंटचा सुरा धरलेला हात माझ्या गळ्यापासून दूर जाऊ लागला. जणु काही ती शक्ती मला त्याच्या पासुन वाचवू पाहात होती. अचानक तो एजंट वेदनेने कळवळला. एक सणसणित ठोसा त्याच्या नाकावर बसला होता. तुटलेल्या नाकासह रक्तबंबाळ झालेला तो एजंट मागच्या भिंतीवर आदळला. ते पाहुन मी दरवाज्याच्या दिशेने पळाले. त्यानंतर कसाबसा उठत तो एजंट माझ्यामागे धावला. तो मला पुन्हा पकडणार एवढ्यात अचानक तो माझ्या डोक्यावरून उसळला आणि बाथरूमच्या दरवाज्यावर फेकला गेला. दरवाजा तोडून तो बाथरूमच्या आत जाऊन पडला. बाथरूम मध्ये या भिंतीवरुन त्या भिंतीवर तो वेडावाकडा फेकला जाऊ लागला. नंतर एकदा हवेत उचलला जाऊन तो बाथ टबच्या कठड्यावर जोरात डोक्यावर आदळला.

[next] त्याचे डोके फुटुन त्याचा मेंदु जवळ जवळ बाहेरच आला ते पाहुन मी बेशुद्ध झाले. किती वेळ गेला कोणास ठाऊक पण एका किंकाळीमुळे मी शुद्धीवर आले. मला आधी काही कळलेच नाही, की काय होतंय. पण माझी नजर त्याच्याकडे गेली तेव्हा तो एजंट हवेत तरंगत होता आणि त्याच्या सुऱ्याने त्याचाच गळा चिरला जात होता. त्या एजंटच्या समोर एका स्त्रीची अस्पष्ट अशी आकृती होती. त्याला शेवटचे आचके देताना पाहुन ती असुरी हसली. तिने एक हिसडा दिल्यावर त्या एजंटच्या गळ्यातून रक्ताची एक मोठी चिळकांडी उडाली आणि तो गतप्राण झाला. त्या आकृतीने त्या एजंटचे मृत शरीर बाथरूमच्या दारात फेकुन दिले. माझ्याकडे वळुन ती म्हणाली, “तू आता सुरक्षित आहेस” आणि हवेत विरुन गेली. त्यानंतरचे मला काही आठवत नाही.”

निशाची कहाणी ऐकल्यावर इन्स्पेक्टर मानेना क्षणभर सुचेना की काय बोलावे. निशाच्या कबुली जबाबावर तिच्या सह्या घेऊन ते हॉस्पिटल मधुन बाहेर पडले. निशाच्या कहाणीवर त्यांचा विश्वास बसत नव्हता, पण निशा खरं बोलत होती हे त्यांनी ओळखले होते. इतक्या वर्षांच्या अनुभवावरुन समोरचा माणुस खरे बोलतोय की खोटे हे ते लगेच ओळखत. ज्या पद्धतीने खुन झालेत त्यावरून ते खुन निशाने करणे अशक्य वाटत होते. बाहेरून कोणी आत गेलेलेही कॅमेऱ्यात दिसले नाही. निशाच्या म्हणण्यानुसार खरच एखादी अमानवीय शक्ती या खुनांच्या मागे असेल तर तिला पकडणार तरी कसे? आणि वरिष्ठाना सांगावे तर आपलीच अक्कल काढली जाईल. हे प्रकरण वाटते तितके सोपे नाही हे त्यांनी ताडले. दुर्दैवाने प्रत्यक्षदर्शी साक्षीदार फक्त निशाच होती. हॉटेलच्या स्टाफपैकी कोणाला साधा आवाजही ऐकू आला नाही याचे त्यांना राहुन राहुन नवल वाटत होते. रूम सर्विसच्या वेटरने व्हिस्की, सोडा आणि तंदुरी चिकनची ऑर्डर सर्व्ह करण्यासाठी बेल वाजवली पण बराच वेळ आतुन काहीच रिस्पॉन्स न मिळाल्यामुळे मॅनेजरने डुप्लीकेट चावीने दरवाजा उघडल्यावर झाला प्रकार उघडकीस आला होता.

विचारांच्या चक्रात हरवलेल्या इन्स्पेक्टर मानेनी एका लेडी कॉन्स्टेबलला निशावर लक्ष ठेवायला सांगुन पोलीस स्टेशनची वाट धरली. निशा हॉस्पिटल मधील बेडवर आराम करत होती. अचानक अंधारून आले आणि तोच परिचित गारवा जाणवु लागला. प्रतिक्षिप्त क्रियेने निशाचे शरीर आकसले गेले. पाय पोटाशी दूमडून ती पडुन राहिली. आपल्या पाठीमागे कोणी तरी उभे असल्यासारखे तिला जाणवले आणि तिच्या अंगावर काटा ऊभा राहीला. तिच्या शरीरातून एक थंड शिरशीरी दौडत गेली. कुशीवर वळुन खांद्यावरून तिने मागे पाहिले आणि तिच्या काळजात धस्स झाले. ती निशापासुन ५-६ फुटांवर उभी होती. उभी कसली, जमीनीपासून वितभर उंचीवर तरंगतच होती. तिचे भयानक रूप पाहुन निशाने ओरडण्यासाठी तोंड उघडले पण तिच्या तोंडातून आवाजच बाहेर पडला नाही.

[next] त्या गारव्यातही तिच्या कपाळावर घर्मबिंदु जमा झाले होते. निशाला घाबरलेले पाहुन ती म्हणाली, “घाबरू नकोस मी तुला काहीही करणार नाही. जीवंत असताना मीही तुझ्यासारखीच या दलदलीत अडकले होते, पण मी तुझ्या एवढी सुदैवी नव्हते. मला वाचवायला कोणी आले नाही. वासनेची शिकार होण्यापेक्षा मी मृत्यु पत्करला. मरताना मला ज्याने फसवले त्याचा आणि आपल्या सारख्या असहाय्य मुलींना फसवुन जे लोक या दलदलीत ढकलतात त्या सर्वांचा बदला घ्यायच्या माझ्या तिव्र इच्छेने मला मृत्युनंतरही जीवंत ठेवले. तुझ्यासारख्या अनेक निरागस आणि निष्पाप मुलींना या नराधमांपासुन मी आजपर्यंत वाचवत आले आहे. पण दुर्दैव हे आहे की रक्तबिज राक्षसाप्रमाणे एकाला मारले की कोणी ना कोणी त्याची जागा घ्यायला येतोच. मी आता थकले आहे. हे दुष्टचक्र कधी संपणार ते त्या ईश्वरालाच ठाऊक.”

सर्व ऐकल्यावर निशाच्या मनातील भिती नाहीशी होऊन तिच्या बद्दल कणव आणि जिज्ञासा निर्माण झाली. निशाने, ती कोण? कुठली? तिचे नांव काय? असे प्रश्न विचारायला सुरवात केल्यावर तिने एक दीर्घ उसासा सोडला. तिचे हिडीस भितीदायक रूप हळुहळु पालटु लागले व तिच्या जागी 20-22 वर्षाची एक सुंदर आणि देखणी मुलगी दिसु लागली. निशा तिच्या सौंदर्याकडे पाहातच राहिली. “माझे नाव रागिणी.” असे म्हणत तिने आपली कहाणी सांगायला सुरवात केली. “मी कोल्हापुर जवळील एका छोट्याशा गावात राहायचे. माझे आई-वडील आणि मोठा भाऊ दिवस रात्र शेतात राबायचे. ऊसाचा बक्कळ पैसा मिळायचा त्यामुळे घरची परिस्थिती चांगली होती. मी थोडी लाडावलेली होते पण माझे सौंदर्य माझ्या घरच्यांच्या काळजीचे कारण बनले होते. मला माझ्या सौंदर्याचा खुप गर्व होता. किती तरी मुले माझ्या एका नजरेवर घायाळ व्हायची.

दादाला सर्व सुट होती पण मला मात्र खुप कडक नियम होते. मला याचा खुप राग यायचा. मी कॉलेजच्या शेवटच्या वर्षाला होते. एकदा स्कुटी वरून कॉलेजला जात असताना काही टवाळ मुलं माझ्या मागे लागली. आधी मी दुर्लक्ष केले पण नंतर ते आपली हद्द ओलांडु लागताच मात्र मी घाबरले. त्यांच्यापासुन वाचण्यासाठी मी गाडी जोरात चालवु लागले. गडबडीत भलतेच वळण घेतले आणि चुकीच्या रस्त्याला लागले. वस्ती विरळ होऊ लागली तशी मी आणखीनच घाबरले. ते अजुन किती लांब आहेत हे पाहण्यासाठी मी आरशात पाहिले पण तेवढ्यात गाडीचे चाक एका दगडावर गेले आणि मी धाडकन जमीनीवर कोसळले. कोपर फुटुन रक्त येऊ लागले. मी उठुन उभी राहते तोच चार पाच जणांनी मला घेरले. आता आपली धडगत नाही हे जाणवुन मी रडु लागले.”

[next] “त्या मुलांनी माझ्या अंगाला इकडे तिकडे हात लावायला सुरवात केली तसे मी जोर लावुन त्यातल्या एकाला ढकलुन पळाले. इतक्यात समोरून एक जीप येताना दिसली. मी जीव खाऊन तिच्या दिशेने पळत होते. जीप माझ्यापासुन काही अंतरावर येऊन थांबली आणि त्यातुन एक देखणा तरुण उतरला. त्याने मला सावरले म्हणुन बरे, नाहीतर तोल जाऊन मी तोंडावरच पडायचे. ती मुलं तिथे येऊन पोहोचली. मी न सांगताच तो तरुण काय प्रकार सुरु आहे ते समजला. नंतर त्याने त्या मुलांना असा काय चोपला की ती मुलं तिथुन पळून गेली. माझ्या जीवात जीव आला पण माझे मन कुठे तरी हरवले. पहिल्याच भेटीत मी त्याच्या प्रेमात पडले. त्याने त्याचे नांव राकेश सांगितले. जमीन खरेदी विक्रीचा त्याचा व्यवसाय होता. पुढे आमच्या भेटीगाठी सुरु झाल्या. त्याने बोलवले की मी कॉलेज चुकवून, घरी असल्यास मैत्रिणीच्या नांवावर त्याला भेटायला जाऊ लागले. आम्ही तासनतास एकत्र वेळ घालवू लागलो. तो मला महागड्या वस्तु भेट द्यायचा, फिरायला घेऊन जायचा. हॉटेल मधे खायला घालायचा. मला सगळीकडे तोच दिसायचा. मी त्याच्यासाठी ठार वेडी झाले होते.

शेवटी या सगळ्याचा जो परिणाम व्हायचा तोच झाला. कायम फर्स्ट क्लास मिळवणारी मी, चक्क परीक्षेत नापास झाले. माझे वडील मला खुप रागावले आणि कधी नाही ते त्यांनी मला घराबाहेर जाण्यास बंदी घातली. राकेशच्या ओढीने मी व्याकुळ झाले होते. एका मैत्रिणीच्या मदतीने मी त्याच्याशी संपर्क साधला आणि मला पळवून नेण्यास सांगितले. ठरल्याप्रमाणे एका रात्री आपल्या घराण्याची इभ्रत, आपल्या पित्याची गावातील इज्जत कशा कशाचा विचार न करता मी घर सोडले आणि राकेश बरोबर मुंबई गाठली. एका देवळात आम्ही लग्न केले. नंतर राकेश मला एका बिल्डिंगमध्ये घेऊन गेला. तिथे एका खोलीत त्याने मला बसण्यास सांगितले आणि काही खाण्यास आणतो असे सांगुन तो बाहेर निघुन गेला. अर्धा तास झाला तरी त्याचा पत्ता नव्हता म्हणुन मी बघण्यासाठी उठले, इतक्यात एका बटबटीत मेकअप केलेल्या चाळीशीच्या बाई सोबत तो आत आला, पाठोपाठ गुंडासारखे दिसणारे दोन पुरुष पण आले.”

ती बाई आणि ते पुरुष कोण आहेत असे मी त्याला विचारताच तो फारच विचित्र हसला आणि म्हणाला, “तू आता इथेच राहायचेस, मी तुला या मुन्नीबाईला दोन लाखात विकली आहे. या आधीही तुझ्यासारख्या किती तरी मुलींशी मी प्रेमाचे खोटे नाटक करुन त्या देवळात लग्न केलंय आणि या मुन्नीबाईला विकलंय. आज पर्यंतच्या सर्व मुलींपेक्षा तुझी सगळ्यात जास्त किंमत मोजली आहे मुन्नीबाईने!” असे म्हणत पुन्हा तो खदाखदा हसु लागला. त्याचे ते शब्द मला माझ्या कानात गरम शिश्यासारखे भासले. आपण पुरते फसलोय याची जाणीव होताच माझे पायच गळपटले. आपल्या वडिलांची अब्रु धुळीला मिळवून त्या हरामखोराचा हात धरून पळून जाण्याची मला मोठी शिक्षा मिळाली होती. माझ्या पायातील त्राणच गेल्यामुळे मी जवळ जवळ जमीनीवर कोसळलेच. माझ्या विश्वासाला पायदळी तुडवून पैसे मोजत, निर्लज्जासारखा हसत तो राक्षस बाहेर निघुन गेला. त्याला अडवायचीही ताकद माझ्यात नव्हती. मी स्वतःलाच शिव्या घालत होते. माझ्या डोळ्यातुन अखंड अश्रु वाहात होते. आजवर जे सिनेमा आणि सिरियल्स मध्ये बघीतले होते ते आपल्याच बाबतीत आज प्रत्यक्षात घडतय यावर माझा विश्वासच बसत नव्हता.

[next] मी काहीच विरोध करत नाही हे पाहुन त्या तिघांनाही आश्चर्य वाटले पण त्यामुळे ते सर्व थोडे रिलॅक्स झाले होते. त्यांचे माझ्याकडे लक्ष नाही हे पाहुन मी मनाशी ठरवले की जीव गेला तरी चालेल पण आपल्या अब्रुचा लिलाव होऊ द्यायचा नाही. सर्व ताकद एकवटून मी त्यातल्या एका बेसावध पुरुषाला जोराचा धक्का मारला, त्यासरशी तो कोलमडून दुसऱ्या पुरुषावर आपटला आणि ते दोघेही खाली पडले. ती संधी साधुन मी वेगाने दारातून बाहेर पडले आणि वाट फुटेल तिकडे धाऊ लागले. समोर एक जिना दिसताच मी त्यावर चढत टेरेसवर आले, मागोमाग ते दोघे होतेच. मी पुरती अडकले होते. माझ्याकडे पाहात ते मोठमोठ्याने हसु लागले. इतक्यात राकेश पण टेरेसवर आला. त्याला पाहताच माझ्या तळपायाची आग मस्तकात गेली. तो मला पकडण्यासाठी पुढे सरसावला तशी मी जवळच पडलेली एक लोखंडी शिग त्याच्या कपाळावर मारली. त्याच्या कपाळावर खोक पडुन त्यातुन रक्त वाहू लागले, ते पाहुन ते दोन्ही गुंड माझ्या दिशेने धावले. आपली अब्रु वाचवण्यासाठी माझ्या जवळ त्या बिल्डिंगवरुन खाली उडी मारण्याव्यतिरिक्त पर्यायच उरला नव्हता. राकेश मी तुला कधी माफ करणार नाही असे ओरडून मी स्वतःला टेरेसवरून खाली झोकून दिले. काही सेकंदातच मी जमीनीवर आदळले आणि माझी जीवनयात्रा संपली. पण नियतीच्या मनात काही वेगळेच होते. त्या नराधमांचा बदला घेण्यासाठी मी परत आले.”

रागिणीची कहाणी ऐकुन निशा सुन्न झाली. तिच्या मनात चिड उत्पन्न होऊ लागली. हे कुठेतरी थांबले पाहिजे, याच्या विरोधात आपण काहीतरी केले पाहिजे असे तिला प्रकर्षाने वाटु लागले. रागिणी पुढे म्हणाली, “प्रत्येक मुलीला तिचे आई-वडील, भाऊ व घरातील इतर सदस्य आपले स्वातंत्र्य हिरावुन घेतात, बंधने लादतात, अंग पुर्णपणे झाकेल असेच कपडे घाल अशी सक्ती करतात, रात्री उशीरापर्यंत बाहेर राहण्यास मज्जाव करतात, मुलांशी बोलण्यास व भेटण्यास विरोध करतात, ते का? याच्या मागचे कारण मला खुप उशीरा समजले आणि ते म्हणजे तिची असलेली काळजी. तिच्या अल्लडपणामुळे, अजाणतेपणी तिच्यावर एखादे संकट येऊन तिचे आयुष्य बरबाद होऊ नये यासाठी असलेली त्यांची आतंरिक तळमळ. कदाचित त्यांची पद्धत चुकीची असेलही पण त्या मागची काळजी, प्रेम आणि माया ही १००% खरी असते.

मुलींना कमी कपडे घालण्यापासुन रोखण्यापेक्षा लोकांनी आपली विचारसरणी बदलली पाहिजे, स्वतःच्या मुलींना बाहेर जाण्यापासून रोखण्यापेक्षा आपल्या मुलांना स्त्रियांचा सन्मान करायला शिकवला पाहिजे वगैरे सगळे बरोबर आहे. पण या सगळ्याला वास्तवात यायला किती वेळ लागेल ते कोण सांगु शकतो? समाजाला तर आपण बदलु शकत नाही, पण आपण मुली स्वतःच स्वतःला काही बंधने लाऊन घेऊन आपल्या कुटुंबियांच्या संरक्षणात सुरक्षित तर राहु शकतो! मी जर माझ्या वडिलांचे घर सोडुन राकेश सोबत पळाले नसते तर आज माझे आयुष्य कदाचित खुप वेगळे असते. असो, माझ्या बाबतीत जे झाले ते झाले. पण इतर मुलींनी माझ्यापासून योग्य तो धडा घेतला तरी मी भरून पावेन.” रागिणी आणि निशाचे संभाषण सुरु असताना दरवाज्याजवळ खुर्ची टाकुन बसलेल्या लेडी कॉन्स्टेबलने आत जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या तिघा जणांना हटकले.

[next] आपण निशाचे नातेवाईक असुन तिला घ्यायला आलो आहोत असे त्यांनी सांगितले. लेडी कॉन्स्टेबलला संशय आल्यामुळे तिने इन्स्पेक्टर मानेना फोन केला. त्या तिघांना तिथेच थांबवायला सांगुन मानेनी ड्रायव्हरला जीप काढायची ऑर्डर दिली. तिघांपैकी एकाने त्या लेडी कॉन्स्टेबलच्या मानेवर एक जोरदार फटका मारून तिला बेशुद्ध केले आणि आवाज होणार नाही याची काळजी घेत तिला ओढत निशाच्या रुममध्ये नेले. बाकीचे दोघेही त्याच्या पाठोपाठ आत गेले आणि दरवाजा बंद झाला. पडदा बाजुला सारुन ते तिघे निशाच्या बेडपाशी आले. ‘हॅलो निशा!’ निशाने दचकुन आवाजाच्या दिशेने पाहिले. तिच्या वडिलांच्या मित्राने तिला ज्या व्यक्तींना विकले होते त्याच दोन व्यक्ती समोर उभ्या पाहुन ती गर्भगळीत झाली. तिने रागिणीच्या दिशेने आशेने पाहिले पण तिथे कोणीच नव्हते. त्यांच्यातील एकाने तिला जबरदस्तीने उचलुन आपल्या खांद्यावर घेतले त्याबरोबर ती ओरडली, “रागिणी, मला वाचव!” निशाच्या तोंडुन रागिणीचे नांव ऐकताच तो तिसरा व्यक्ती अचंबित झाला. त्याने त्या माणसाला निशाला खाली उतरवण्यास सांगीतले. “तू रागिणीला कशी ओळखतेस?” असे त्याने विचारताच निशाने त्याच्याकडे पाहिले.

तिची नजर त्याच्या कपाळावरील जखमेकडे गेली, आणि नकळत तिच्या तोंडुन शब्द बाहेर पडले, ‘राकेश!’ निशाच्या तोंडुन आपले खरे नांव ऐकल्यावर तो व्यक्ती चपापलाच. “जे नांव मी कित्येक वर्षांपुर्वीच बदलले होते ते तुला कसे माहीत? माझ्या जून्या विश्वासू साथिदारांव्यतिरिक्त माझे खरे नांव कोणालाच माहीत नाही. तू मला कसे काय ओळखतेस? खरे सांग कोण आहेस तू?” राकेश गरजला. राकेशच्या आवाजातील भिती जाणवून निशा त्याच्या नजरेला नजर देत मंद हसली आणि म्हणाली, “घाबरलास? हिच भीती तुला रागिणीच्या प्रेमाचा विश्वासघात करुन तिला आणि अशा कित्येक रागिणींना या दलदलीत ढकलताना नाही वाटली?” निशाच्या या परखड प्रश्नाने राकेशचा चेहरा कोणीतरी सणसणीत मुस्काटात ठेऊन द्यावी तसा लाल झाला. निशाचा गळा पकडून त्याने आपली सायलेंसर लावलेली पिस्टल तिच्यावर रोखली. “तूला गरजेपेक्षा जास्तच माहीत आहे आणि तू जरा जास्तच बोलतेस. तुला मरावे लागेल”, असे म्हणत त्याने चाप ओढला.

पिस्टल मधुन सुटलेली गोळी निशाच्या कपाळापासुन इंचभर अंतरावर वेगाने गरगर फिरत होती. तो प्रकार पाहुन तिघेही चक्रावले. निशा जादुटोणा करणारी आहे असे वाटुन राकेशचे साथीदार पळून जाऊ लागले पण ते दरवाज्यापर्यंतही पोहोचु शकले नाहीत. कोपऱ्यातील एक स्टूल त्यांच्या पायावर वेगाने येऊन आदळले. त्यामुळे दोघेही हवेत कोलांटी मारून पाठीवर जोरात आदळले. धिप्पाड असलेल्या त्या दोघांची ती अवस्था पाहुन राकेश पुरता हादरला. अचानक ते दोघे हवेत तरंगु लागले आणि त्यांची तिच गत झाली जी फिरोजची झाली होती. त्यांचे रक्तबंबाळ छिन्नविच्छिन्न देह पाहुन राकेशला कापरेच भरले. त्याने निशाचा गळा सोडताच ती खोकत बाजुला झाली. तिच्या मागे उभ्या असलेल्या रागिणीला पाहुन तर राकेशच्या काळजाचा ठोकाच चुकला. “तू जिवंत कशी? मी स्वतःच्या डोळ्यांनी तुला टेरेसवरून खाली उडी मारताना पाहिलंय. नाही, हे शक्य नाही.” असे त्याने म्हणताच हवेत थांबलेली गोळी सरसरत रागिणीच्या छातीत घुसली रक्ताची चिळकांडी उडाली आणि रागिणी धाडकन खाली कोसळली. राकेशला काय चाललंय ते न समजल्यामुळे तो आणखीनच घाबरला. बावचळून तो इकडे तिकडे पाहात असताना रागिणी आपल्या भयंकर रुपात त्याच्यासमोर येऊन तरंगु लागली. काळीज गोठवेल अशा भयाकारी आवाजात हसत ती राकेशला म्हणाली, “मी तुला सोडणार नाही, राकेश! इतकी वर्ष मी तुझी वाट पाहिली आणि शेवटी तू माझ्यासमोर आलासंच!”

[next] राकेशला वेड लागायची पाळी आली होती. त्याचा मेंदु काम करेनासा झाला होता. त्याने आपल्या पिस्टल मधुन रागिणीवर चार गोळ्या चालवल्या. सर्व गोळ्या तिच्या शरीरातून आरपार निघुन गेल्या जणु काही त्याने त्या हवेत झाडल्या होत्या. रागिणी राकेशकडे पाहात कुत्सित हसली म्हणाली “अजुन किती वेळा मला मारणार आहेस, राकेश?” इतक्यात गोळ्यांचा आवाज ऐकुन इन्स्पेक्टर माने दरवाज्यावर लाथ मारून आत शिरले. ती संधी साधुन त्यांना धक्का मारून राकेश दरवाज्याच्या बाहेर पळाला. जिन्याने धावत तो टेरेसवर आला. दम लागल्यामुळे त्याला धाप लागली होती. त्याने टेरेसचा दरवाजा लावुन घेतला आणि दरवाज्याच्या दिशेने पिस्टल रोखुन ऊभा राहीला. टेरेसच्या दारातून आरपार जात रागिणी टेरेसवर आली. तिला पाहाताच राकेशने शेवटची गोळी झाडली ती रागिणीच्या शरीरातून आरपार गेली पण दरवाज्याच्या बिजागरावर आदळून परत फिरली आणि कठड्याच्या दिशेने धावणाऱ्या राकेशच्याच बगलेत घुसली. राकेश टेरेसवर कोसळला.

इन्स्पेक्टर माने, इतर कॉन्स्टेबल आणि निशा दरवाजाला धडका मारून टेरेसवर आले. इन्स्पेक्टर मानेनी राकेशला पिस्टल खाली टाकुन हात वर करण्यास सांगितले. राकेशने आपली पिस्टल मानेंच्या दिशेने रोखली आणि खुरडत पळु लागला. “आहेस तिथेच थांब, नाहीतर गोळी घालीन!”, इन्स्पेक्टर माने गरजले. राकेश थांबत नाही हे पाहाताच, मानेंच्या रिव्हॉल्व्हर मधुन सुटलेल्या गोळीने राकेशच्या पायाचा वेध घेतला. राकेश उसळून खाली पडणार तेवढ्यात रागिणीने राकेशला धरून आपल्यासोबत हवेत उंच नेले आणि वेगाने टेरेसच्या कठड्यावर फेकले. राकेश जोरात कठड्यावर आदळला आणि तोल जाऊन खाली फेकला गेला. काही सेकंदातच तो जमीनीवर जाऊन आपटला आणि त्याची प्राणज्योत मालवली. रागिणी आणि निशाच्या चेहऱ्यावर एक समाधान पसरले. इन्स्पेक्टर माने मात्र वेड्यासारखे दोघींकडे आलटून पालटून पाहात होते.

निशाचा निरोप घेऊन रागिणी हवेत विरुन गेली. राकेश मेल्यावर तिला मुक्ती मिळाली पण जाता जाता निशाला जगण्यासाठी ती एक धेय्य देऊन गेली. रागिणीच्या कहाणीने प्रेरित झालेल्या निशाने, रागिणीने घेतलेले व्रत पुढे सुरु ठेवण्याचा निश्चय केला. अथक प्रयत्नातून तिने एक NGO स्थापन केला जो निराधार, असहाय्य आणि फसवल्या गेलेल्या मुली व स्त्रियांच्या मागे खंबीरपणे ऊभा राहुन त्यांना समाजात ताठ मानेने जगण्याची नवी उमेद आणि बळ देऊ लागला. ही दलदल कदाचित कधीच नष्ट होणार नाही, पण प्रबोधन केल्यामुळे तिच्यात अडकणाऱ्या स्त्रियांच्या संख्येत लाक्षणिक घट होऊ शकेल. हे जेव्हा साध्य होईल तेव्हाच खऱ्या अर्थाने रागिणीच्या आत्म्याला मुक्ती मिळेल असे निशाला वाटते. आजही तिचे कार्य अविरत सुरु आहे. ईश्वर रागिणीच्या आत्म्यास शांती देवो.
केदार कुबडे | Kedar Kubade
सभासद, मराठीमाती डॉट कॉम
मराठी कथा, मराठी भयकथा, मराठी कविता या आणि अशा विविध विभागांत लेखन.

अभिप्राय

ब्लॉगर: 2
 1. प्रत्युत्तरे
  1. नमस्कार,
   9326052552 या क्रमांकावर व्हॉट्सॲप सेवा सुरू आहे.
   अधिक माहिती येथे पाहा: https://www.marathimati.com/p/whatsapp.html

   हटवा
भारत सरकारच्या नवीन आयटी पॉलिसी नुसार कोणत्याही विषयावर कोणत्याही व्यक्ती, समूदाय, धर्म तसेच देशाविरुद्ध आपत्तीजनक टिप्पणी दंडणीय गुन्हा आहे.

अशा प्रकारच्या टिप्पणीवर कायदेशीर कारवाई (शिक्षा किंवा आर्थिक दंड किंवा दोन्ही) ची तरतूद देखील आहे. त्यामुळे या चर्चेत पाठविलेल्या कोणत्याही विचारांची जबाबदारी संपूर्णपणे लेखकाची असेल.

मराठीमाती डॉट कॉम प्रताधिकार, अस्वीकरण आणि वापरण्याच्या अटी.  सामायिक करा


नाव

अंधश्रद्धेच्या कविता,5,अजय दिवटे,1,अजित पाटणकर,18,अनिकेत शिंदे,1,अनिल गोसावी,2,अनुभव कथन,12,अनुराधा फाटक,39,अपर्णा तांबे,7,अब्राहम लिंकन,2,अभंग,2,अभिव्यक्ती,929,अमन मुंजेकर,6,अमरश्री वाघ,2,अमित पडळकर,4,अमित पवार,1,अमित बाविस्कर,3,अमुक-धमुक,1,अमोल देशमुख,1,अमोल वाघमारे,1,अमोल सराफ,2,अर्थनीति,3,अलका खोले,1,अश्विनी तातेकर-देशपांडे,1,अक्षय वाटवे,1,अक्षरमंच,695,आईच्या कविता,19,आईस्क्रीम,3,आकाश पवार,1,आकाश भुरसे,8,आज,12,आजीच्या कविता,1,आठवणींच्या कविता,14,आतले-बाहेरचे,3,आतिश कविता लक्ष्मण,1,आत्मविश्वासाच्या कविता,9,आनंद दांदळे,8,आनंदाच्या कविता,20,आभिजीत टिळक,2,आमट्या सार कढी,16,आरती गांगन,2,आरती शिंदे,4,आरत्या,82,आरोग्य,4,आशिष खरात-पाटील,1,इंद्रजित नाझरे,26,इसापनीती कथा,44,उदय दुदवडकर,1,उन्मेष इनामदार,1,उपवासाचे पदार्थ,13,उमेश कानतोडे,1,उमेश कुंभार,12,ऋग्वेदा विश्वासराव,3,ऋचा पिंपळसकर,10,ऋचा मुळे,16,ऋषिकेश शिरनाथ,2,एप्रिल,30,एहतेशाम देशमुख,2,ऑक्टोबर,31,ऑगस्ट,31,ओंकार चिटणीस,1,कपिल घोलप,11,करमणूक,43,कर्क मुलांची नावे,1,कविता शिंगोटे,1,कवितासंग्रह,7,कार्यक्रम,9,कालिंदी कवी,2,किल्ले,92,किल्ल्यांचे फोटो,5,किशोर चलाख,6,कुठेतरी-काहीतरी,2,कुणाल खाडे,2,कुसुमाग्रज,1,कृष्णाच्या आरत्या,5,केदार कुबडे,40,केदार नामदास,1,केदार मेहेंदळे,1,केशवसुत,1,कोशिंबीर सलाड रायते,14,कौशल इनामदार,1,खंडोबाची स्थाने,1,खंडोबाच्या आरत्या,2,खरगपूर,1,गणपतीच्या आरत्या,5,गणेश तरतरे,10,गणेश पाटील,1,गण्याचे विनोद,1,गाडगे बाबा,1,गावाकडच्या कविता,10,गुरूच्या आरत्या,2,गुलझार काझी,1,गोड पदार्थ,57,घरचा वैद्य,2,घाट,1,चटण्या,3,चातुर्य कथा,6,चित्रपट समीक्षा,1,चैतन्य म्हस्के,1,जयश्री मोहिते,1,जानेवारी,31,जिल्हे,1,जीवनशैली,366,जुलै,31,जून,30,ज्योती मालुसरे,1,टीझर्स,1,ट्रेलर्स,3,डिसेंबर,31,तरुणाईच्या कविता,4,तिच्या कविता,48,तुकाराम गाथा,4,तेजस्विनी देसाई,1,दत्ताच्या आरत्या,5,दर्शन जोशी,2,दादासाहेब गवते,1,दिनदर्शिका,372,दिनविशेष,366,दिनेश बोकडे,1,दिनेश लव्हाळे,1,दिनेश हंचाटे,1,दिपक शिंदे,2,दिवाळी फराळ,26,दीप्तीदेवेंद्र,1,दुःखाच्या कविता,68,देवीच्या आरत्या,3,देशभक्तीपर कविता,2,धार्मिक स्थळे,1,धोंडोपंत मानवतकर,9,निखिल पवार,3,निमित्त,3,निराकाराच्या कविता,7,निवडक,1,निसर्ग कविता,16,नोव्हेंबर,30,न्याहारी,41,पंचांग,6,पथ्यकर पदार्थ,2,पराग काळुखे,1,पल्लवी माने,1,पांडुरंग वाघमोडे,3,पाककला,301,पालकत्व,6,पावसाच्या कविता,19,पी के देवी,1,पुडिंग,10,पुणे,9,पोस्टर्स,5,पोळी भाकरी,18,पौष्टिक पदार्थ,19,प्रजोत कुलकर्णी,1,प्रतिक बळी,1,प्रतिभा जोजारे,1,प्रतिक्षा जोशी,1,प्रफुल्ल चिकेरूर,10,प्रभाकर लोंढे,3,प्रवास वर्णन,1,प्रवासाच्या कविता,10,प्रविण पावडे,10,प्रवीण राणे,1,प्रसन्न घैसास,2,प्रज्ञा वझे-घारपुरे,10,प्राजक्ता गव्हाणे,1,प्रिती चव्हाण,14,प्रिया जोशी,1,प्रियांका न्यायाधीश,3,प्रेम कविता,79,प्रेरणादायी कविता,14,फेब्रुवारी,29,फोटो गॅलरी,11,बा भ बोरकर,1,बातम्या,6,बाबा आमटे,1,बाबाच्या कविता,1,बायकोच्या कविता,4,बालकविता,11,बालकवी,1,बाळाची मराठी नावे,1,बाळासाहेब गवाणी-पाटील,1,बिपीनचंद्र नेवे,1,बेकिंग,9,भक्ती कविता,8,भरत माळी,1,भाज्या,28,भाताचे प्रकार,16,भूमी जोशी,1,मंगळागौरीच्या आरत्या,2,मंजुषा कुलकर्णी,2,मंदिरांचे फोटो,2,मंदिरे,1,मधल्या वेळेचे पदार्थ,35,मनाचे श्लोक,205,मनिषा दिवेकर,3,मराठी उखाणे,2,मराठी कथा,93,मराठी कविता,538,मराठी गझल,17,मराठी गाणी,2,मराठी गोष्टी,1,मराठी चारोळी,1,मराठी चित्रपट,12,मराठी टिव्ही,27,मराठी नाटक,1,मराठी पुस्तके,4,मराठी प्रेम कथा,23,मराठी भयकथा,41,मराठी रहस्य कथा,2,मराठी लेख,30,मराठी विनोद,1,मराठी साहित्य,13,मराठी साहित्यिक,1,मराठी सुविचार,2,मराठीमाती,293,मसाले,12,महाराष्ट्र,274,महाराष्ट्र फोटो,9,महाराष्ट्राचा इतिहास,32,महाराष्ट्रीय पदार्थ,19,महालक्ष्मीच्या आरत्या,2,महेश बिऱ्हाडे,2,मांसाहारी पदार्थ,17,माझं मत,1,माझा बालमित्र,54,मातीतले कोहिनूर,14,मारुतीच्या आरत्या,2,मार्च,31,मुंबई,8,मुकुंद शिंत्रे,35,मुक्ता चैतन्य,1,मुलांची नावे,1,मुलाखती,1,मे,31,मैत्रीच्या कविता,5,मोहिनी उत्तर्डे,1,यश सोनार,2,यशपाल कांबळे,2,यशवंत दंडगव्हाळ,17,यादव सिंगनजुडे,2,योगा,1,योगेश कर्डिले,4,रजनी जोगळेकर,4,रागिनी पवार,1,राजकीय कविता,6,राजकुमार शिंगे,1,राजेंद्र भोईर,1,राजेश्वर टोणे,1,रामचंद्राच्या आरत्या,5,राहुल अहिरे,3,रेश्मा विशे,1,रोहित काळे,7,रोहित साठे,14,लता मंगेशकर,1,लक्ष्मण अहिरे,2,लिलेश्वर खैरनार,2,लोणची,9,वात्रटिका,2,वासुदेव कामथ,1,वाळवणाचे पदार्थ,6,विचारधन,211,विठ्ठलाच्या आरत्या,5,विद्या कुडवे,4,विद्या जगताप,2,विनायक मुळम,1,विरह कविता,51,विराज काटदरे,1,विलास डोईफोडे,4,विवेक जोशी,2,विशेष,5,विष्णूच्या आरत्या,4,विज्ञान तंत्रज्ञान,2,वृषाली काकडे,2,वृषाली सुनगार-करपे,1,वेदांत कोकड,1,वैभव सकुंडे,1,वैशाली झोपे,1,व्यंगचित्रे,17,व्हिडिओ,20,शंकराच्या आरत्या,4,शशांक रांगणेकर,1,शांततेच्या कविता,5,शांता शेळके,1,शारदा सावंत,4,शाळेच्या कविता,10,शितल सरोदे,1,शिक्षकांवर कविता,2,शुभम बंबाळ,2,शुभम सुपने,2,शेतकर्‍याच्या कविता,10,शेती,1,श्याम खांबेकर,1,श्रद्धा नामजोशी,9,श्रावणातल्या कहाण्या,27,श्रीनिवास खळे,1,श्रीरंग गोरे,1,संगीता अहिरे,1,संघर्षाच्या कविता,21,संजय पाटील,1,संजय बनसोडे,2,संजय शिवरकर,5,संजय सावंत,1,संत एकनाथ,1,संत तुकाराम,7,संत नामदेव,2,संत ज्ञानेश्वर,4,संतोष झोंड,1,संतोष सेलुकर,30,संदिप खुरुद,5,संदेश ढगे,37,संपादकीय,25,संपादकीय व्यंगचित्रे,16,संस्कार,2,संस्कृती,128,सचिन पोटे,12,सचिन माळी,1,सण-उत्सव,17,सणासुदीचे पदार्थ,32,सतिश चौधरी,1,सदाशिव गायकवाड,2,सनी आडेकर,10,सप्टेंबर,30,समर्थ रामदास,206,समर्पण,9,सरबते शीतपेये,8,सलिम रंगरेज,1,सागर बनगर,1,सागर बाबानगर,1,सामाजिक कविता,96,सायली कुलकर्णी,6,साहित्य सेतू,1,साक्षी खडकीकर,9,सिद्धी भालेराव,1,सिमा लिंगायत-कुलकर्णी,1,सुदेश इंगळे,3,सुनिल नेटके,2,सुनील गाडगीळ,1,सुभाष कटकदौंड,2,सुमती इनामदार,1,सुरेश भट,1,सुशील दळवी,1,सुशीला मराठे,1,सैनिकांच्या कविता,2,सैरसपाटा,97,सोपानदेव चौधरी,1,सोमकांत दडमल,1,स्तोत्रे,1,स्फूर्ती गीत,1,स्वप्नाली अभंग,4,स्वाती खंदारे,300,स्वाती दळवी,6,स्वाती नामजोशी,31,स्वाती वक्ते,2,ह मुलांची नावे,1,हमार्टिक समा,1,हरितालिकेच्या आरत्या,1,हर्षद खंदारे,38,हर्षदा जोशी,3,हर्षवर्धन घाटे,1,हर्षाली कर्वे,2,हसनैन आकिब,3,हेमा चिटगोपकर,8,होळी,5,harshad-khandare,1,swati-khandare,1,
ltr
item
मराठीमाती | माझ्या मातीचे गायन: दलदल - मराठी भयकथा
दलदल - मराठी भयकथा
दलदल, मराठी भयकथा - [Daldal, Marathi Bhaykatha] लग्नाच्या आमिषाने फसवणुक करुन कोठ्यावर विकल्या गेलेल्या एक तरुणीच्या स्वप्नांची राख रांगोळी झाल्यावर, आपल्या अब्रुची लक्तरे वेशीवर टांगली जाण्यापेक्षा त्या तरुणीने मृत्युला जवळ करणे पसंत केले. आपल्या सारख्या इतर दुर्दैवी मुलींना वासनेच्या व्यापारी गिधाडांपासुन वाचवण्यासाठी तिच्या मृत्युनंतर सुरु झालेल्या रक्तरंजित लढ्याची रोमांचक कहाणी म्हणजे दलदल.
https://4.bp.blogspot.com/-cEmHSnlNwzo/XUZ2OdxBguI/AAAAAAAAD3o/cx0BzuT0O_gej0ATA62X3-wmKAu_oUGCwCLcBGAs/s1600/daldal-710x360.jpg
https://4.bp.blogspot.com/-cEmHSnlNwzo/XUZ2OdxBguI/AAAAAAAAD3o/cx0BzuT0O_gej0ATA62X3-wmKAu_oUGCwCLcBGAs/s72-c/daldal-710x360.jpg
मराठीमाती | माझ्या मातीचे गायन
https://www.marathimati.com/2015/09/daldal-marathi-bhaykatha.html
https://www.marathimati.com/
https://www.marathimati.com/
https://www.marathimati.com/2015/09/daldal-marathi-bhaykatha.html
true
2079427118266147504
UTF-8
सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची