गणपतीचा आशीर्वाद मोदक - मराठी कविता

गणपतीचा आशीर्वाद मोदक, मराठी कविता - [Ganapaticha Aashirwad Modak, Marathi Kavita] नेवेद्यासाठी आईने, खोबरे घेतले खोवायला, समोरच्या आमराईने, दिले तोरण दाराला.

नेवेद्यासाठी आईने, खोबरे घेतले खोवायला, समोरच्या आमराईने, दिले तोरण दाराला

नेवेद्यासाठी आईने
खोबरे घेतले खोवायला
समोरच्या आमराईने
दिले तोरण दाराला

आजच्या खोबर्‍यामध्ये असे
काय होते खास?
प्रसाद म्हणुन मिळणार होता
गोड मोदकाचा घास

हळूहळू वितळू लागला
गूळ खोबर्‍या भोवती
निरांजनात मिठी मारून
बसल्या होत्या वाती

श्वेत मुलायम समईमध्ये
भरले मोदकाचे सारण
धावणार्‍या नात्यांना लाभले
भेतावयाचे कारण

अनोख्या शब्दांच्या आरत्या
पितळी झांजांची त्यांना साथ
गुणगान ऐकूनी प्रिय पुत्राचे
प्रसन्न झाले भोलेनाथ

दुर्वांकूर व जास्वंद
झाल्या मस्तकी विराजमान
पंचपक्वानांनी नटले
सुगरास केळीचे पान

मुखी जेव्हा विरघळतो माझ्या
मोदकाचा हा प्रसाद
आभार त्या गणरायाचे
दिधला मोदकरूपी आशीर्वाद


ऋचा मुळे | Rucha Muley
सभासद, मराठीमाती डॉट कॉम
मराठीमाती डॉट कॉम वरिल मराठी कविता विभागात लेखन.

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.