मंद धुंद गारवा ओल्या मातीचा सुवास, वार्यासोबत पाऊस ढग करतो लांबचा प्रवास
मंद धुंद गारवा ओल्या मातीचा सुवासवार्यासोबत पाऊस ढग करतो लांबचा प्रवास
झिरमिर झिरमिर पाऊस धारा ओली चिंब झाली धरा
कण कण ऊमलून येतो घेऊन नाविन्याचा ध्यास
दूर कोठे डोंगरात मयूर ठेक्यात करतो नाच
इंद्रधनुषी सप्तरंगात देव मुगुटाचा होतो भास
तन मन चिंब चिंब कुठे बुडाले सूर्यबिंब
चंद्र चंद्र चांदण्याचा येतो सुखाची घेऊन रास