Loading ...
/* Dont copy */

शाळा - मराठी भयकथा

शाळा, मराठी कथा - [Shala, Marathi Katha] पाच मित्रांनी पहिले ते खरेच भुत होते की भास होता हे माहित नाही पण ते जे काही होते ते नक्कीच अंगावर काटा आणणारे होते.

शाळा - मराठी कथा | Shala - Marathi Katha

गप्पांच्या ओघात चार पाच मित्रांचे भुताचा शोध घेण्याचे ठरते आणि...

अमानवीय शक्ती आपले अस्तित्व कोणाला कधी कुठे कशाप्रकारे दाखवुन देतील याचा काही भरवसा नाही. गप्पांच्या ओघात चार पाच मित्रांचे भुताचा शोध घेण्याचे ठरते आणि त्यांची ती विचित्र इच्छा एका अमानवीय शक्ती पुर्ण करते. जे काही त्यांनी पहिले ते खरेच भुत होते की भास होता हे माहित नाही पण ते जे काही होते ते नक्कीच अंगावर काटा आणणारे होते. त्या पुर्ण प्रसंगाचा शहारा अनुभवण्यासाठी वाचा शाळा ही भयकथा.

रात्री जेवण झाले कि आम्ही काही मित्र आमच्या शैलू नावाच्या एका मित्राच्या एस टी डी बुथवर गप्पा मारायला जमायचो. गप्पात इतर तरुण मुलांच्या विषयासारखे मारामार्‍या, मुली, सिनेमे, कॉलेज मधील प्रोफेसर इत्यादी विषय असायचे पण हळूहळू विषय भुताटकी या विषयावर जायला लागला, ज्याला जो काही अनुभव असे किंवा काही माहीत असे त्याप्रमाणे तो शेयर करायचा. ऐकताना खुप थ्रिल वाटायचे. त्या एस टी डी बुथपासून माझ्या घरी जाण्याच्या रस्त्याला लागुनच एक पहिली ते चौथी साठी पुर्व प्राथमिक कौलारू शाळा होती. तिला दगडी चिरा वापरून बांधलेला गडगा (कंपाउंड) होता आणि रस्त्याच्या बाजुचा तो गडगा तोडुन शाळेत जायची वाट केली होती, गेटचा पत्ताच नव्हता. दिवसा काही वाटायचे नाही पण रात्री त्या शाळेच्या बाजुने जाताना ती खुप भयाण वाटायची, रस्त्यावरील पोलवरच्या दिव्याच्या प्रकाशात शाळेच्या दारांना लावलेली कुलपे आणि चंदेरी रंगाचा ध्वजस्तंभ चमकायचा, वार्‍यामुळे जिर्ण झालेले झोपाळे आणि घसरगुंड्या करकरायच्या. शांत वातावरणात ते आवाज खुप भीतीदायक वाटायचे. पण कधी काही दिसले नाही.

[next]असेच एका रात्री जेवल्यावर मी एस टी डी बुथवर गेलो होतो, अजुन आमची गँग जमा झाली नव्हती. हळूहळू एक-एक तारा उगवायला लागला. चार पाच जण जमल्यावर भुताचा विषय निघाला. प्रताप म्हणाला की त्या शाळेत भुत आहे. साहजिकच मी त्याचे म्हणणे उडवून लावले तेव्हा तो म्हणाला की, “अरे त्या शाळेच्या आवारात गेले की पैंजणाचे आणि नाणे जमिनीवर घरंगळत गेल्यासारखे आवाज येतात आणि दारे आपोआप हलतात.” मी काही मानायला तयार नव्हतो कारण माझा रोजचा रस्ता असल्यामुळे त्या शाळेजवळूनच मी नेहमी यायचो जायचो अर्थात बाईकवरून पण कधीच काही दिसले नव्हते. झाले! भुताचा छडा लावायचे ठरले आणि आम्ही चौघे शाळेच्या दिशेने निघालो.

चालताना माझा पाय अमितला लागल्यामुळे मी त्याला हात लावुन नमस्कार केला. त्याचा स्पर्श मला एकदम थंडगार वाटला. वास्तविक रत्नागिरी समुद्र किनार्‍याजवळ वसल्यामुळे मुंबई सारखाच येथेही प्रचंड उकाडा असतो, थंडीचा तर काही संबंधच नाही. त्यामुळे मला थोडे नवल वाटले पण मी त्याकडे दुर्लक्ष केले. थोड्याच वेळात आम्ही शाळेजवळ पोहोचलो. शाळेच्या आवारात प्रवेश करताच एक थंड हवेच्या झोताने आमचे स्वागत केले, सर्व अंग मस्त शहारले. तो थंडगार हवेचा स्पर्श मती गुंगावून गेला कारण तो वारा नैसर्गिक नाही वाटला. मन आत जायला विरोध करत होते पण मी तिकडे दुर्लक्ष केले कारण मित्रांच्यात मला माझे हसे करून घ्यायचे नव्हते. आम्ही ध्वजस्तंभाजवळ जाऊन उभे राहिलो आणि शाळेचे अवलोकन करत होतो. इतक्यात आमचा एक मित्र वैभव, एस टी डी बुथच्या दिशेने येण्याऐवजी माझ्या घराच्या दिशेने येताना दिसला. त्याला विचारले की “इकडून कुठून येत आहेस?” तर तो म्हणाला, की “कोणा मित्राकडे गेला होता.” आम्हाला थोडे विचित्र वाटले कारण त्याने अंगात एक टी शर्ट आणि कापलेल्या जीन्सची हाफ पॅंट घातली होती आणि नेहमी बाईकने फिरणारा वैभव काळोखातुन चक्क चालत येत होता. त्याला फार प्रश्न न विचारता आता शाळेला एक पुर्ण वळसा घालून काही दिसते का ते बघायचे ठरले.

[next]आम्हा पाच जणांपैकी अमित आणि वैभव तिथेच थांबतो म्हणाले, आम्हाला आश्चर्य वाटले कारण ते दोघेही खुप भित्रे होते. दोन-तीन वेळा त्यांना आमच्या सोबत राहण्यास सांगुनही ते तिथेच थांबले म्हणुन त्यांना तिथेच सोडून सचिन, प्रताप आणि मी असे तिघे शाळेच्या गडग्याच्या बाहेरून शाळेला एक चक्कर मारून परत आलो. आम्हाला काहीच वावगे दिसले नाही पण येताना सचिन म्हणाला की, “आपण त्यांना तिथे एकटे सोडून यायला नको होते, आता जर का ते तिथे दिसले नाहीत किंवा त्यांना काही झाले तर मग आपले काही खरे नाही.” आम्ही ध्वजस्तंभाजवळ येऊन बघतो तर नेमकी त्याची भीती खरी ठरली होती; खरेच तिथे कोणीही नव्हते. आता मात्र आम्ही तिघेही घाबरलो की त्यांना काही झाले तर नसेल? आम्ही धावत शाळेच्या आवराबाहेर गेलो आणि ते दोघे एस टी डी बुथवर गेले असावेत असा विचार करून एस टी डी बुथच्या दिशेने चालू लागलो तर वैभव आम्हाला एस टी डी बुथकडुन आमच्या दिशेने बाईक वर येताना दिसला. तो आम्हाला शिव्या घालु लागला की आम्ही त्याला सोडून भुत बघायला का गेलो? आम्ही म्हटले की “तु तर आमच्या बरोबर होतास ना! घाबरलास म्हणुन पळुन गेलास अमित बरोबर!” तसा तो वैतागला आणि म्हणाला, “काही पण नका सांगु. मी आत्ता जेवुन एस टी डी बुथमध्ये आलोय एवढाच! आणि अमित तर मुंबईला गेलाय तो कुठून येईल माझ्यासोबत?” आम्हाला वाटले की तो थापा मारतोय म्हणुन आम्ही एस टी डी बुथमध्ये आलो आणि शैलुच्या आईला विचारले की हा एस टी डी बुथमध्ये कधी आला? तर काकी म्हणाल्या, आत्ताच आला. आम्ही चक्रावलो की जर हा आमच्या सोबत नव्हता आणि अमित मुंबईला गेलाय मग मगाशी आमच्या सोबत जे दोघे होते ते कोण होते?

परत सगळ्यांनी धीर एकवटला आणि या प्रकरणाचा छडा लावायचाच असा निर्धार करून वैभव, सचिन, प्रताप, शैलू आणि मी असे सगळे त्या शाळेकडे निघालो. शाळेच्या आवारात पाऊल टाकताच आम्हाला मगाशी जाणवलेला थंडगार वारा पुन्हा एकदा जाणवला. पुन्हा मन आक्रंदु लागले की उगाच विषाची परीक्षा नको, सगळे व्यवस्थित आहे तोपर्यंत परत चला पण चारजण सोबत असल्यामुळे प्रत्येकाच्या मनात एक प्रकारचा आत्मविश्वास निर्माण झाला होता. आम्ही शाळेच्या उघड्या खिडकीतुन आत वाकुन बघितले, आत भयाण शांतता होती. रस्त्यावरील दिव्याचा प्रकाश उघड्या खिडकीतुन आत जात होता त्यात आम्हाला आतील दृश्य अंधुक अंधुक दिसत होते. इतक्यात लोखंडी ट्रंक सरकावल्याचा आवाज माझ्या कानांनी स्पष्टपणे टिपला आणि अंगावर सरकन काटा आला. तो आवाज इतरांनी पण ऐकला होता पण सुदैवाने कोणीही पळाले नाही नाहीतर सगळ्यांचीच फाटली असती. बघुया काय होते ते! असा विचार करून आम्ही अजुन लक्षपुर्वक आत पाहु लागलो आणि अचानक शाळेच्या व्हरांड्यामधुन कोणी तरी धावत गेल्यासारखा आवाज आला म्हणुन खिडकी सोडून आम्ही धावत व्हरांड्याला लागुन असलेल्या मोठ्या जाळीदार खिडकीकडे गेलो आणि आत पाहु लागलो. कुठूनशी प्रचंड दुर्गंधी आली जिने नाकाला झिणझिण्या आल्या आणि व्हरांड्याच्या टोकाला एक मानव सदृश्य आकृती दिसली. साधारण पाच साडेपाच फुट उंच असेल, अंगात फुल हाताची बनियन, कमरेला टॉवेल आणि डोक्याला फडके गुंडाळलेला असा त्या आकृतीचा अवतार होता. दरवाज्यांना कुलुपे असताना हा आत कसा काय गेला असेल असा विचार मनात येतो न येतो तोच एक कर्कश किंकाळी फोडून तो माणुस आमच्या समोरच गायब झाला जणु काही हवेतच विरून गेला. ते पाहून सगळ्यांनाच दरदरून घाम फुटला. वळून पाहतो तर वैभव आणि प्रताप केव्हाच शाळेच्या आवाराबाहेर गेले होते. शैलू, सचिन आणि मीच उरलो होतो. आम्ही तिघे जीव मुठीत घेऊन धावत रस्त्याच्या दिशेने धावु लागलो तर डोक्यावरून केसाला घासत सरसरत काही तरी गेलेले जाणवले. बघतो तर लहान मुलांची स्लीपर होती ती तशीच परत शाळेवर भिरकावली आणि रस्ता पार करून पलीकडे असलेल्या नवलाई देवीच्या देवळाच्या आवारात गेलो.

[next]सगळे घामाने चिंब भिजले होते आणि सगळ्यांचेच उर धपापत होते, कोणीही एक अवाक्षर देखील काढले नाही. ‘सगळेजण सुटलो बाबा एकदाचे’ असा विचार करत असतानाच आमचे लक्ष्य शाळेकडे गेले. दोन दरवाज्यांमध्ये अर्धी भिंत आणि भिंतीवर दोन मोठ्या जाळीच्या खिडक्या होत्या आणि त्याच्या मागे व्हरांडा होता. अचानक खिडकीच्या आत उजव्या बाजुला एक ज्योत पेटलेली आम्हाला दिसली. मेणबत्ती किंवा समईची ज्योत जशी दिसते अगदी तशीच ती ज्योत होती. ती ज्योत कशावर पेटली होती ते कळत नव्हते आणि कुणी पणती किंवा मेणबत्ती धरून असेल तर तेही दिसत नव्हते. जणु काही ती ज्योत अधांतरी होती. आता हळू-हळू ती ज्योत खिडकीच्या उजव्या टोकापासून डाव्या टोकाकडे सरकु लागली. दरवाज्यांना कुलपे लावलेली असताना तो माणुस आता कसा गेला आणि ती ज्योत कोणी पेटवली असा विचार मनात येतो न येतो तोच मला एक अनामिक ओढ वाटू लागली आणि नकळत मी शाळेच्या दिशेने ओढला जाऊ लागलो. शैलूच्या हे लक्षात येताच त्याने मला घट्ट पकडून ठेवले आणि वैभवला पटकन जाऊन देवीचा अंगारा घेऊन यायला सांगितले. इकडे एकट्या शैलूला मी आवरत नाही हे पाहून प्रताप आणि सचिनने पण मला पकडून ठेवले, पण मी त्या तिघांना ओढत शाळेच्या दिशेने पुढे सरकु लागलो होतो. इतक्यात वैभवने देवीचा अंगारा माझ्या कपाळावर लावला आणि मी शरीरातील सगळी ताकद गेल्यासारखा सैल पडलो. माझा विरोध मावळून गेला. थोड्या वेळाने मी भानावर आलो तेव्हा झाला प्रकार सगळ्यांनी मला सांगितला. आपण उगाच या भानगडीत पडलो असे वाटुन सर्वानुमते असे ठरले की “आपण शाळेच्या बाहेर उभे राहून माफी मागुया की आम्ही परत तुझ्या वाटेला जाणार नाही. आम्हाला माफ कर.” नंतर आम्ही सर्वांनी देवीचा अंगारा कपाळावर लावला व त्या अज्ञात शक्तीची माफी मागितली आणि आपापल्या घरी गेलो. सुदैवाने कोणी आजारी पडले नाही की कोणाला काही त्रास झाला नाही.

पुढे चौकशी केल्यावर असे कळले की पुर्वी एका तरुण वडाराचा खुन करून त्या शाळेमागच्या संडासात त्याचा मृतदेह टाकला होता. वडार लोक म्हणजे रस्त्याच्या बाजुला चर खणणारे त्यांचा पेहराव तसाच असतो फुल बाहीची बनियन, कमरेला टॉवेल आणि डोक्याला फडके. आम्हाला शाळेच्या व्हरांड्यात दिसलेली आकृती हुबेहूब त्या वडाराशी जुळणारी होती. सुदैवाने त्या शाळेत शिकणाऱ्या कोणत्याच विद्यार्थ्याला, शिपायाला किंवा शिक्षकांना एवढेच काय आजु बाजुला राहणाऱ्या लोकांनाही कधीच काही जाणवले किंवा त्रास झाला नव्हता त्यामुळे आम्ही सर्वानीच ही गोष्ट तिथेच विसरून जायचे ठरवले. आज या कथेच्या रूपाने त्या जुन्या आठवणीला पुन्हा एकदा उजाळा मिळाला. आजही रत्नागिरीला घरी जाताना मी जेव्हा त्या शाळेवरून जातो तेव्हा शाळेकडे नजर जातेच, आणि तो प्रसंग आठवल्यावर अजुनही अंगावर सरकन काटा येतो. पण परत कधीच असा काही अनुभव तिथे आला नाही. आम्हाला दिसले ते भुत होते की आमच्याच मनात वसलेली एक प्रतिमा? कोणास ठाऊक, पण अनुभव मात्र आजही ताजा आहे जसा काही काल परवाच घडला असावा.



केदार कुबडे | Kedar Kubade
सभासद, मराठीमाती डॉट कॉम
मराठी कथा, मराठी भयकथा, मराठी कविता या आणि अशा विविध विभागांत लेखन.

अभिप्राय

नाव

अ रा कुलकर्णी,1,अ ल खाडे,2,अ ज्ञा पुराणिक,1,अंकित भास्कर,1,अंजली भाबट-जाधव,1,अंधश्रद्धेच्या कविता,5,अकोला,1,अजय दिवटे,1,अजित पाटणकर,18,अनंत दळवी,1,अनंत फंदी,1,अनंत भावे,1,अनिकेत येमेकर,2,अनिकेत शिंदे,1,अनिल गोसावी,2,अनिल भारती,1,अनिल वल्टे,8,अनुभव कथन,19,अनुरथ गोरे,1,अनुराधा पाटील,1,अनुराधा फाटक,39,अनुवादित कविता,1,अपर्णा तांबे,7,अब्राहम लिंकन,2,अभंग,6,अभिजित गायकवाड,1,अभिजीत टिळक,2,अभिव्यक्ती,1385,अभिषेक कातकडे,5,अभिषेक घुगे,1,अमन मुंजेकर,7,अमरश्री वाघ,2,अमरावती,1,अमित पडळकर,4,अमित पवार,1,अमित बाविस्कर,3,अमित सुतार,1,अमुक-धमुक,1,अमृत जोशी,1,अमृता शेठ,1,अमोल कोल्हे,1,अमोल तांबे,1,अमोल देशमुख,1,अमोल बारई,7,अमोल वाघमारे,1,अमोल सराफ,2,अरविंद जामखेडकर,1,अरविंद थगनारे,5,अरुण कोलटकर,1,अरुण म्हात्रे,1,अर्चना कुळकर्णी,1,अर्चना डुबल,2,अर्जुन फड,3,अर्थनीति,3,अल्केश जाधव,1,अविनाश धर्माधिकारी,2,अशोक थोरात,1,अशोक रानडे,1,अश्विनी तातेकर-देशपांडे,1,अश्विनी तासगांवकर,2,अस्मिता मेश्राम-काणेकर,7,अहमदनगर,1,अक्षय वाटवे,1,अक्षरमंच,1131,आईच्या कविता,29,आईस्क्रीम,3,आकाश पवार,2,आकाश भुरसे,8,आज,6,आजीच्या कविता,1,आठवणींच्या कविता,18,आतले-बाहेरचे,3,आतिश कविता लक्ष्मण,1,आत्मविश्वासाच्या कविता,15,आदर्श कामिरे,4,आदित्य कदम,1,आदेश ताजणे,8,आनंद दांदळे,8,आनंद प्रभु,1,आनंदाच्या कविता,26,आमट्या सार कढी,18,आर समीर,1,आरती गांगण,2,आरती शिंदे,4,आरत्या,82,आरोग्य,21,आशा गवाणकर,1,आशिष खरात-पाटील,1,आशिष चोले,1,इंदिरा गांधी,1,इंदिरा संत,6,इंद्रजित नाझरे,26,इंद्रजीत भालेराव,1,इतिहास,281,इलाही जमादार,1,इसापनीती कथा,48,उत्तम कोळगावकर,2,उदय दुदवडकर,1,उन्मेष इनामदार,1,उपवासाचे पदार्थ,15,उमा पाटील,1,उमेश कानतोडे,1,उमेश कुंभार,14,उमेश चौधरी,1,उस्मानाबाद,1,ऋग्वेदा विश्वासराव,5,ऋचा पिंपळसकर,10,ऋचा मुळे,18,ऋषिकेश शिरनाथ,2,ऋषीकेश कालोकार,2,ए श्री मोरवंचीकर,1,एच एन फडणीस,1,एप्रिल,30,एम व्ही नामजोशी,1,एहतेशाम देशमुख,2,ऐतिहासिक स्थळे,2,ऑक्टोबर,31,ऑगस्ट,31,ऑडिओ कविता,15,ऑडिओ बुक,1,ओंकार चिटणीस,1,ओम ढाके,8,ओमकार खापे,1,ओशो,1,औरंगाबाद,1,कपिल घोलप,12,करण विधाते,1,करमणूक,72,कर्क मुलांची नावे,1,कल्पना देसाई,1,कल्याण इनामदार,1,कविता शिंगोटे,1,कवितासंग्रह,280,कवी अनिल,1,कवी ग्रेस,4,कवी बी,1,काजल पवार,1,कार्यक्रम,12,कार्ल खंडाळावाला,1,कालिंदी कवी,2,काशिराम खरडे,1,कि का चौधरी,1,किरण कामंत,1,किल्ले,97,किल्ल्यांचे फोटो,5,किशोर चलाख,6,किशोर पवार,1,कुठेतरी-काहीतरी,3,कुणाल खाडे,3,कुणाल लोंढे,1,कुसुमाग्रज,9,कृष्णकेशव,1,कृष्णाच्या आरत्या,5,के के दाते,1,के तुषार,8,के नारखेडे,2,केदार कुबडे,40,केदार नामदास,1,केदार मेहेंदळे,1,केशव मेश्राम,1,केशवकुमार,2,केशवसुत,5,कोल्हापूर,1,कोशिंबीर सलाड रायते,14,कौशल इनामदार,1,खंडोबाची स्थाने,2,खंडोबाच्या आरत्या,2,खरगपूर,1,ग दि माडगूळकर,6,ग ल ठोकळ,3,ग ह पाटील,4,गंगाधर गाडगीळ,1,गझलसंग्रह,1,गडचिरोली,1,गणपतीच्या आरत्या,5,गणपतीच्या गोष्टी,24,गणेश कुडे,2,गणेश तरतरे,20,गणेश निदानकर,1,गणेश पाटील,1,गणेश भुसारी,1,गण्याचे विनोद,1,गाडगे बाबा,1,गायत्री सोनजे,5,गावाकडच्या कविता,14,गुरुदत्त पोतदार,2,गुरूच्या आरत्या,2,गुलझार काझी,1,गो कृ कान्हेरे,1,गो गं लिमये,1,गोकुळ कुंभार,13,गोड पदार्थ,55,गोपीनाथ,2,गोविंद,1,गोविंदाग्रज,1,गौतम जगताप,1,गौरांग पुणतांबेकर,1,घरचा वैद्य,2,घाट,1,चंद्रकांत जगावकर,1,चंद्रपूर,1,चटण्या,3,चातुर्य कथा,6,चित्रपट समीक्षा,1,चैतन्य म्हस्के,1,चैत्राली इंगळे,2,जयश्री चुरी,1,जयश्री मोहिते,1,जवाहरलाल नेहरू,1,जळगाव,1,जाई नाईक,1,जानेवारी,31,जालना,1,जितेश दळवी,1,जिल्हे,31,जीवनशैली,431,जुलै,31,जून,30,ज्योती किरतकुडवे,1,ज्योती मालुसरे,1,टीझर्स,1,ट्रेलर्स,3,ठाणे,2,डिसेंबर,31,डॉ मानसी राजाध्यक्ष,1,डॉ. दिलीप धैसास,1,तनवीर सिद्दिकी,1,तन्मय धसकट,1,तरुणाईच्या कविता,7,तिच्या कविता,63,तुकाराम गाथा,4,तुकाराम धांडे,1,तुतेश रिंगे,1,तेजश्री कांबळे-शिंदे,4,तेजस्विनी देसाई,1,दत्ता हलसगीकर,2,दत्ताच्या आरत्या,5,दत्तात्रय भोसले,1,दत्तो तुळजापूरकर,1,दया पवार,1,दर्शन जोशी,2,दर्शन शेळके,1,दशरथ मांझी,1,दादासाहेब गवते,1,दामोदर कारे,1,दिनदर्शिका,366,दिनविशेष,366,दिनेश बोकडे,1,दिनेश लव्हाळे,1,दिनेश हंचाटे,1,दिपक शिंदे,2,दिपाली गणोरे,1,दिवाळी फराळ,26,दीपा दामले,1,दीप्तीदेवेंद्र,1,दुःखाच्या कविता,76,दुर्गेश साठवणे,1,देवीच्या आरत्या,3,देशभक्तीपर कविता,3,धनंजय सायरे,1,धनराज बाविस्कर,71,धनश्री घाणेकर,1,धार्मिक स्थळे,1,धुळे,1,धोंडोपंत मानवतकर,12,नमिता प्रशांत,1,नलिनी तळपदे,1,ना के बेहेरे,1,ना घ देशपांडे,4,ना धों महानोर,3,ना वा टिळक,1,नांदेड,1,नागपूर,1,नारायण शुक्ल,1,नारायण सुर्वे,2,नाशिक,1,नासीर संदे,1,निखिल पवार,3,नितीन चंद्रकांत देसाई,1,निमित्त,4,निराकाराच्या कविता,15,निवडक,8,निसर्ग कविता,37,निसर्ग चाटे,2,निळू फुले,1,नृसिंहाच्या आरत्या,1,नोव्हेंबर,30,न्याहारी,50,पथ्यकर पदार्थ,2,पद्मा गोळे,4,परभणी,1,पराग काळुखे,1,पर्यटन स्थळे,1,पल्लवी माने,1,पवन कुसुंदल,2,पांडुरंग वाघमोडे,3,पाककला,322,पाककृती व्हिडिओ,15,पालकत्व,7,पावसाच्या कविता,40,पी के देवी,1,पु ल देशपांडे,9,पु शि रेगे,1,पुंडलिक आंबटकर,4,पुडिंग,10,पुणे,15,पुरुषोत्तम जोशी,1,पुरुषोत्तम पाटील,1,पुर्वा देसाई,2,पूजा काशिद,1,पूजा चव्हाण,1,पूनम राखेचा,1,पोस्टर्स,5,पोळी भाकरी,27,पौष्टिक पदार्थ,20,प्र श्री जाधव,12,प्रकाश पाटील,1,प्रजोत कुलकर्णी,1,प्रतिक बळी,1,प्रतिभा जोजारे,1,प्रतिमा इंगोले,1,प्रतिक्षा जोशी,1,प्रदिप कासुर्डे,1,प्रफुल्ल चिकेरूर,10,प्रभाकर महाजन,1,प्रभाकर लोंढे,3,प्रवास वर्णन,1,प्रवासाच्या कविता,11,प्रविण पावडे,15,प्रवीण दवणे,1,प्रवीण राणे,1,प्रशांतकुमार मोहिते,2,प्रसन्न घैसास,2,प्रज्ञा वझे,2,प्रज्ञा वझे-घारपुरे,10,प्राजक्ता गव्हाणे,1,प्रितफुल प्रित,1,प्रिती चव्हाण,27,प्रिया जोशी,1,प्रियांका न्यायाधीश,3,प्रेम कविता,97,प्रेरणादायी कविता,17,फ मुं शिंदे,3,फादर स्टीफन्स,1,फेब्रुवारी,29,फोटो गॅलरी,11,फ्रॉय निस्सेन,1,बहिणाबाई चौधरी,6,बा भ बोरकर,8,बा सी मर्ढेकर,6,बातम्या,11,बाबा आमटे,1,बाबाच्या कविता,10,बाबासाहेब आंबेड,1,बायकोच्या कविता,5,बालकविता,14,बालकवी,9,बाळाची मराठी नावे,1,बाळासाहेब गवाणी-पाटील,21,बिपीनचंद्र नेवे,1,बी अरुणाचलाम्‌,1,बी रघुनाथ,1,बीड,1,बुलढाणा,1,बेकिंग,9,बेहराम कॉन्ट्रॅक्टर,1,भंडारा,1,भक्ती कविता,23,भक्ती रावनंग,1,भरत माळी,2,भा दा पाळंदे,1,भा रा तांबे,7,भा वें शेट्टी,1,भाग्यवेध,1,भाज्या,29,भाताचे प्रकार,16,भानुदास,1,भानुदास धोत्रे,1,भावनांची वादळे,1,भुषण राऊत,1,भूगोल,1,भूमी जोशी,1,म म देशपांडे,1,मं वि राजाध्यक्ष,1,मंगला गोखले,1,मंगळागौरीच्या आरत्या,2,मंगेश कळसे,9,मंगेश पाडगांवकर,5,मंजुषा कुलकर्णी,2,मंदिरांचे फोटो,3,मंदिरे,4,मधल्या वेळेचे पदार्थ,41,मधुकर आरकडे,1,मधुकर जोशी,1,मधुसूदन कालेलकर,2,मनमोहन नातू,3,मनाचे श्लोक,205,मनिषा दिवेकर,3,मनिषा फलके,1,मनोज शिरसाठ,9,मराठी,1,मराठी उखाणे,2,मराठी कथा,107,मराठी कविता,1172,मराठी कवी,3,मराठी कोट्स,4,मराठी गझल,30,मराठी गाणी,2,मराठी गोष्टी,67,मराठी चारोळी,42,मराठी चित्रपट,19,मराठी टिव्ही,53,मराठी नाटक,1,मराठी पुस्तके,7,मराठी प्रेम कथा,23,मराठी भयकथा,44,मराठी मालिका,20,मराठी रहस्य कथा,2,मराठी लेख,48,मराठी विनोद,1,मराठी साहित्य,288,मराठी साहित्यिक,2,मराठी सुविचार,2,मराठीप्रेमी पालक महासंमेलन,5,मराठीमाती,145,मसाले,12,महात्मा गांधी,8,महात्मा फुले,1,महाराष्ट्र,307,महाराष्ट्र फोटो,11,महाराष्ट्राचा इतिहास,32,महाराष्ट्रीय पदार्थ,22,महालक्ष्मीच्या आरत्या,2,महेंद्र म्हस्के,1,महेश जाधव,3,महेश बिऱ्हाडे,9,मांसाहारी पदार्थ,17,माझं मत,4,माझा बालमित्र,88,मातीतले कोहिनूर,19,माधव ज्यूलियन,6,माधव मनोहर,1,माधवानुज,3,मानसी सुरज,1,मारुतीच्या आरत्या,2,मार्च,31,मिलिंद खांडवे,1,मीना तालीम,1,मुंबई,12,मुंबई उपनगर,1,मुकुंद भालेराव,1,मुकुंद शिंत्रे,35,मुक्ता चैतन्य,1,मुलांची नावे,1,मुलाखती,1,मे,31,मैत्रीच्या कविता,8,मोहिनी उत्तर्डे,2,यवतमाळ,1,यशपाल कांबळे,4,यशवंत दंडगव्हाळ,25,यादव सिंगनजुडे,2,योगा,1,योगेश कर्डिले,6,योगेश सोनवणे,2,रंगपंचमी,1,रंजना बाजी,1,रजनी जोगळेकर,5,रत्नागिरी,1,रविंद्र गाडबैल,1,रविकिरण पराडकर,1,रवींद्र भट,1,रा अ काळेले,1,रा देव,1,रागिनी पवार,1,राजकारण,2,राजकीय कविता,12,राजकुमार शिंगे,1,राजेंद्र भोईर,1,राजेश पोफारे,1,राजेश्वर टोणे,3,राम मोरे,1,रामकृष्ण जोशी,2,रामचंद्राच्या आरत्या,5,रायगड,1,राहुल अहिरे,3,रुपेश सावंत,1,रेश्मा जोशी,2,रेश्मा विशे,1,रोहित काळे,7,रोहित साठे,15,लघुपट,3,लता मंगेशकर,2,लहुजी साळवे,1,लक्ष्मण अहिरे,2,लक्ष्मीकांत तांबोळी,2,लातूर,1,लिलेश्वर खैरनार,2,लीना पांढरे,1,लीलावती भागवत,1,लोकमान्य टिळक,3,लोणची,9,वंदना विटणकर,2,वर्धा,1,वसंत बापट,12,वसंत साठे,1,वसंत सावंत,1,वा गो मायदेव,1,वा ना आंधळे,1,वा भा पाठक,2,वा रा कांत,3,वात्रटिका,2,वादळे झेलतांना,2,वामन निंबाळकर,1,वासुदेव कामथ,1,वाळवणाचे पदार्थ,6,वि दा सावरकर,3,वि भि कोलते,1,वि म कुलकर्णी,5,वि स खांडेकर,1,विंदा करंदीकर,8,विक्रम खराडे,1,विचारधन,215,विजय पाटील,1,विजया जहागीरदार,1,विजया वाड,2,विजया संगवई,1,विठ्ठल वाघ,3,विठ्ठलाच्या आरत्या,5,विद्या कुडवे,4,विद्या जगताप,2,विद्याधर करंदीकर,1,विनायक मुळम,1,विरह कविता,58,विराज काटदरे,1,विलास डोईफोडे,4,विवेक जोशी,3,विशाल शिंदे,1,विशेष,12,विष्णूच्या आरत्या,4,विज्ञान तंत्रज्ञान,2,वृषाली सुनगार-करपे,1,वेदांत कोकड,1,वैभव गव्हाळे,1,वैभव सकुंडे,1,वैशाली झोपे,1,वैशाली नलावडे,1,व्यंगचित्रे,17,व्रत-वैकल्ये,1,व्हिडिओ,13,शंकर रामाणी,1,शंकर विटणकर,1,शंकर वैद्य,1,शंकराच्या आरत्या,4,शरणकुमार लिंबाळे,1,शशांक रांगणेकर,1,शशिकांत शिंदे,1,शां शं रेगे,1,शांततेच्या कविता,9,शांता शेळके,11,शांताराम आठवले,1,शाम जोशी,1,शारदा सावंत,4,शाळेचा डबा,15,शाळेच्या कविता,11,शितल सरोदे,1,शिरीष पै,1,शिरीष महाशब्दे,8,शिल्पा इनामदार-आर्ते,1,शिवाजी महाराज,7,शिक्षकांवर कविता,4,शुभम बंबाळ,2,शुभम सुपने,2,शेतकर्‍याच्या कविता,14,शेती,1,शेषाद्री नाईक,1,शैलेश सोनार,1,श्याम खांबेकर,1,श्रद्धा नामजोशी,9,श्रावणातल्या कहाण्या,27,श्री दि इनामदार,1,श्री बा रानडे,1,श्रीकृष्ण पोवळे,1,श्रीधर रानडे,2,श्रीधर शनवारे,1,श्रीनिवास खळे,1,श्रीपाद कोल्हटकर,1,श्रीरंग गोरे,1,श्रुती चव्हाण,1,संघर्षाच्या कविता,33,संजय उपाध्ये,1,संजय डोंगरे,1,संजय पाटील,1,संजय बनसोडे,2,संजय शिंदे,1,संजय शिवरकर,5,संजय सावंत,1,संजीवनी मराठे,3,संत एकनाथ,1,संत चोखामेळा,1,संत जनाबाई,1,संत तुकडोजी महाराज,2,संत तुकाराम,8,संत नामदेव,3,संत ज्ञानेश्वर,6,संतोष जळूकर,1,संतोष झोंड,1,संतोष सेलुकर,30,संदिप खुरुद,5,संदीपकुमार खुरुद,1,संदेश ढगे,39,संध्या भगत,1,संपादक मंडळ,1,संपादकीय,11,संपादकीय व्यंगचित्रे,2,संस्कार,2,संस्कृती,133,सई कौस्तुभ,1,सचिन पोटे,12,सचिन माळी,1,सण-उत्सव,22,सणासुदीचे पदार्थ,32,सतिश चौधरी,1,सतीश काळसेकर,1,सदानंद रेगे,2,सदाशिव गायकवाड,2,सदाशिव माळी,1,सनी आडेकर,10,सप्टेंबर,30,समर्थ रामदास,206,समर्पण,8,सरबते शीतपेये,8,सरयु दोशी,1,सरला देवधर,1,सरिता पदकी,3,सरोजिनी बाबर,1,सलीम रंगरेज,8,सविता कुंजिर,1,सांगली,1,सागर बनगर,1,सागर बाबानगर,1,सातारा,1,साने गुरुजी,5,सामाजिक कविता,113,सामान्य ज्ञान,8,सायली कुलकर्णी,7,साहित्य सेतू,1,साक्षी खडकीकर,9,साक्षी यादव,1,सिंधुदुर्ग,1,सिद्धी भालेराव,1,सिमा लिंगायत-कुलकर्णी,3,सुदेश इंगळे,24,सुधाकर राठोड,1,सुनिल नागवे,1,सुनिल नेटके,1,सुनील गाडगीळ,1,सुभाष कटकदौंड,2,सुमती इनामदार,1,सुमित्र माडगूळकर,1,सुरज दळवी,1,सुरज दुतोंडे,1,सुरज पवार,1,सुरेश भट,2,सुरेश सावंत,2,सुशील दळवी,1,सुशीला मराठे,1,सुहास बोकरे,6,सैनिकांच्या कविता,4,सैरसपाटा,128,सोपानदेव चौधरी,1,सोमकांत दडमल,1,सोलापूर,1,सौरभ सावंत,1,स्तोत्रे,2,स्नेहा कुंभार,1,स्फुटलेखन,4,स्फूर्ती गीत,1,स्माईल गेडाम,4,स्वप्ना पाटकर,1,स्वप्नाली अभंग,5,स्वप्नील जांभळे,2,स्वाती काळे,1,स्वाती खंदारे,320,स्वाती गच्चे,1,स्वाती दळवी,9,स्वाती नामजोशी,31,स्वाती पाटील,1,स्वाती वक्ते,2,ह मुलांची नावे,1,हमार्टिक समा,1,हरितालिकेच्या आरत्या,1,हर्षद खंदारे,42,हर्षद माने,1,हर्षदा जोशी,3,हर्षवर्धन घाटे,2,हर्षाली कर्वे,2,हसनैन आकिब,3,हितेशकुमार ठाकूर,1,हेमंत जोगळेकर,1,हेमंत देसाई,1,हेमंत सावळे,1,हेमा चिटगोपकर,8,होळी,5,ज्ञानदा आसोलकर,1,ज्ञानदेवाच्या आरत्या,2,
ltr
item
मराठीमाती । माझ्या मातीचे गायन: शाळा - मराठी भयकथा
शाळा - मराठी भयकथा
शाळा, मराठी कथा - [Shala, Marathi Katha] पाच मित्रांनी पहिले ते खरेच भुत होते की भास होता हे माहित नाही पण ते जे काही होते ते नक्कीच अंगावर काटा आणणारे होते.
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEiqznfIrYUrUJ9HrE2jXrHYGhdP0ZEuMNFRpWvq2lDk_oF05d4H2AyXxtNXgggvDmH_GUCgKyYnNOFOMbMcZ-mq3SjdfnFI85qD45iSgLAVpHw9ySiFy8XQT9j2POXOtr_QltyQDmngV8xg/s1600/shala-marathi-bhaykatha.jpg
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEiqznfIrYUrUJ9HrE2jXrHYGhdP0ZEuMNFRpWvq2lDk_oF05d4H2AyXxtNXgggvDmH_GUCgKyYnNOFOMbMcZ-mq3SjdfnFI85qD45iSgLAVpHw9ySiFy8XQT9j2POXOtr_QltyQDmngV8xg/s72-c/shala-marathi-bhaykatha.jpg
मराठीमाती । माझ्या मातीचे गायन
https://www.marathimati.com/2015/07/shala-marathi-bhaykatha.html
https://www.marathimati.com/
https://www.marathimati.com/
https://www.marathimati.com/2015/07/shala-marathi-bhaykatha.html
true
2079427118266147504
UTF-8
सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची