पाऊस गातो गाणे - मराठी कविता

पाऊस गातो गाणे, मराठी कविता - [Paaus Gaato Gaane, Marathi Kavita] टिप टिप पाऊस, झो झो वारा, गीत गाऊ पाहतो, आसमंत सारा.

टिप टिप पाऊस, झो झो वारा, गीत गाऊ पाहतो, आसमंत सारा

टिप टिप पाऊस
झो झो वारा
गीत गाऊ पाहतो
आसमंत सारा

कडाडणारी वीज
गडगडणारे ढग
धावण्यार्‍या छत्रीतली
आपली लगबग

डराव्‌ डराव्‌ बेडकं
छम छम तळे
लेझीम हाती घेऊनी जणू
थेंब लाटेवर पळे

खळ खळ झरा
तड तड पत्रा
पावसाने भरवली बघा
ताला सुरांची जत्रा


ऋचा मुळे | Rucha Muley
सभासद, मराठीमाती डॉट कॉम
मराठीमाती डॉट कॉम वरिल मराठी कविता विभागात लेखन.

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.