पावसाळा नव्याने - मराठी कविता

पावसाळा नव्याने, मराठी कविता - [Paavsala Navyaane, Marathi Kavita] सरींसवे सरूनी गेले, भुर्कन उडूनी गेले तास, नभी भरलेल्या काजळासवे, नव्याने दाटला मनी उल्हास.

सरींसवे सरूनी गेले, भुर्कन उडूनी गेले तास, नभी भरलेल्या काजळासवे, नव्याने दाटला मनी उल्हास

सरींसवे सरूनी गेले
भुर्कन उडूनी गेले तास
नभी भरलेल्या काजळासवे
नव्याने दाटला मनी उल्हास

निळे, पोपटी, हिरवे, पिवळे
लख्खं मला दिसु लागले
तेच रंग त्या उन्हात
नव्याने भोवती फिरू लागले

चिंब भिजुनी चमकणारे
समोरच उभे बकुळ होते
त्याची रेखीव फुले वेचाया
नव्याने आज व्याकुळ होते

स्वतःस झोकुनी देती सरी
मातीच्या असीम प्रेमासाठी
मनात झिरपुनी अर्थ देतात
नव्याने त्याच रेशीमगाठी

झरझर सरसर कोसळणारे
क्षण कुणी मोजले का?
आज त्याच पावसामध्ये मी
नव्याने अशी भिजले का?


ऋचा मुळे | Rucha Muley
सभासद, मराठीमाती डॉट कॉम
मराठीमाती डॉट कॉम वरिल मराठी कविता विभागात लेखन.

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.