सप्तशृंगी किल्ला

सप्तशृंगी किल्ला - [Saptashrungi Fort] ४६०० फूट उंचीचा सप्तशृंगी किल्ला गिरीदुर्ग प्रकारातील आहे. नाशिक जिल्ह्यातील अजंठा सातमाळ डोंगररांगेतील सप्तशृंगी किल्ला ट्रेकर्स च्या दृष्टीने मध्यम समजला जातो.
सप्तशृंगी किल्ला - Saptashrungi Fort

नाशिक जिल्ह्यातील सातमाळ डोंगररांगेमध्ये येणारा ‘सप्तश्रुंगी गड’ हा वणीचा डोंगर या नावाने ओळखला जातो.

सप्तशृंगी किल्ला - [Saptashrungi Fort] ४६०० फूट उंचीचा सप्तशृंगी किल्ला गिरीदुर्ग प्रकारातील आहे. नाशिक जिल्ह्यातील अजंठा सातमाळ डोंगररांगेतील सप्तशृंगी किल्ला ट्रेकर्स च्या दृष्टीने मध्यम समजला जातो. नाशिक जिल्ह्यातील सातमाळ डोंगररांगेमध्ये येणारा ‘सप्तश्रुंगी गड’ हा वणीचा डोंगर या नावाने ओळखला जातो.

सप्तश्रुंगी हे जगदंबेचे देवस्थान आहे. महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांपैकी असलेली ही देवी सात आदिमातांमधील थोरली माता आहे.

सप्तशृंगी किल्ल्यावर पहाण्यासारखी ठिकाणे


सप्तशृंगी किल्ल्यावर जगदंबा मातेचे अर्थातच वणीच्या देवीचे मंदिर आहे. मंदिरापर्यंत जाण्यासाठी पायऱ्या आहेत.

सप्तशृंगी गडावर जाण्याच्या वाटा


सप्तशृंगी किल्ल्यावर जाण्यासाठी नांदुरी गावातून गाडीरस्ता गेलेला आहे. वणी नांदुरी देवीचे मंदिर आहे. मंदिरापर्यंत जाण्यासाठी पायऱ्या आहेत. वणी नांदुरी दर अर्ध्यातासाला बसेस चालू असतात. नाशिकवरून थेट नांदुरी गाठून जीपने किल्ल्यावर जाता येते.

किल्ल्यावर राहण्यासाठी धर्मशाळा आहेत. जेवणासाठी किल्ल्यावर हॉटेल्स आणि भोजनालये आहेत. किल्ल्यावर बारमाही पिण्याचे पाण्याचे टाके आहे. गडावर जाण्यासाठी नांदुरी गावातून अर्धातास लागतो.


मराठीमाती | MarathiMati
संपादक मंडळ, मराठीमाती डॉट कॉम
मराठीमाती डॉट कॉम वरील विविध विभागांत लेखन आणि संपादन.

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.