सुधागड किल्ला

सुधागड किल्ला - [Sudhagad Fort] ५९० मीटर उंचीचा सुधागड किल्ला गिरीदुर्ग प्रकारातील आहे. रायगड जिल्ह्यातील लोणावळा डोंगररांगेतील सुधागड किल्ला ट्रेकर्स च्या दृष्टीने सोपा समजला जातो.

सुधागड किल्ला - Sudhagad Fort

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक श्री शिवछत्रपतींचा पदस्पर्श या गडाला झाला आणि याचे नाव सुधागड ठेवले गेले.

सुधागड किल्ला - [Sudhagad Fort] ५९० मीटर उंचीचा सुधागड किल्ला गिरीदुर्ग प्रकारातील आहे. रायगड जिल्ह्यातील लोणावळा डोंगररांगेतील सुधागड किल्ला ट्रेकर्स च्या दृष्टीने सोपा समजला जातो. ‘गडकोट म्हणजे राज्याचे मूळ’, ‘गडकोट म्हणजे खजिना’, ‘गडकोट म्हणजे सैन्याचे बळ’. सुधागड म्हणजे भोर संस्थानाचे वैभव. सुधागड हा फार प्राचीन किल्ला आहे. पूर्वी या गडाला भोरपगड असेही म्हणत असत.

पूढे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक श्री शिवछत्रपतींचा पदस्पर्श या गडाला झाला आणि याचे नाव सुधागड ठेवले गेले. या गडाची साधारणः उंची ५९० मीटर आहे. झाडांमध्ये लपलेला गड विस्ताराने फारच मोठा आहे. गडावर जाण्यासाठी तीन प्रमुख वाटा आहेत.

सुधागड किल्ल्याचा इतिहास


सुधागड हा किल्ला फार प्राचीन आहे. या परिसरात अस्तित्वात असणारी ठाणाळे लेणी ही २२०० वर्षांपूर्वीची आहेत. यावरून असे अनुमान निगह्ते की सुधागड हा देखील तितकाच जुना किल्ला असावा. एखाद्या मोठ्या सत्तेखाली या गडाची जडणघडण झाली असावी. पुराणात भृगु ऋषींनी येहे वास्तव्य केल्याचे अनेक उल्लेख आढळतात. याच ऋषींनी भोराई देवीची स्थापना या डोंगरावर केली. इ.स. १६४८ साली हा किल्ला स्वराज्यात सामील झाला. याबाबत्त असा उल्लेख आढळतो की, ‘साखरदऱ्यात मालवजी नाईक कारके यांनी माळ लाविली. सरदार मालोजी भोसले यांच्या हाताखाली जाधव आणि सरनाईक हे प्रथम किल्ल्यावर चढले.

या धारकऱ्यांना उभे करून त्यांचे पाठीवर हैबतराव चढले. त्यास संभाजीराव पुढे जाऊन माथा गेले. पंचविसाने पुढे जाऊन गस्त मारिली. बोकडसिलेचा पहारा मारला. पुढे भोराईच्या टप्प्यावरी गेले तो सदरेतून किल्लेदार व लोक धावत आले. हाणहाण झाली त्यासमयी किल्लेदार कामास आले. उपरांतिक जाऊन सदर काबीज केली. ‘शिवरायांनी या गडाचे भोरपगडावरून‘ सुधागड’ असे नामकरण केले.

गडाच्या पायथ्याशी असलेल्या ‘पाच्छापूर’ या गावातच संभाजी व औरंगजेबाचा बंडखोर मुलगा अकबर याची भेट झाली होती. महाराजांच्या अष्टप्रधान मंडळात असलेल्यांपैकी अण्णाजी दत्तो, बाळाजी आवजी चिटणीस, त्याचा मुलगा आवजी बल्लाळ आणि हिरोजी फर्जंद या सर्वांना भाद्रपद पौर्णिमेच्या दिवशी संभाजीने सुधागड परिसरात असणाऱ्या परली गावात हत्तीच्या पायी दिले.

सुधागड किल्ल्यावर पहाण्यासारखी ठिकाणे


सुधागडाचा घेरा तसा मोठा आहे. गडावर पाण्याचे अनेक तलाव आढळतात. गडावर पंत सचिवांचा वाडा आहे. यात ५० जणांची राहण्याची सोय होते. तसेच भोराई देवीचे मंदिर आहे. यामध्ये २५ जणांची राहण्याची सोय होते. येथे जंगलही बऱ्यापैकी आहे. आजुबाजूच्या जंगलाच्या परिसरात अनेक प्रकारची औषधी वनस्पती आढळतात. गडावरील पंत सचिवांच्या वाड्याच्या बाजूला भोरेश्वराचे मंदिर आहे. तिथूनच पुढे गेल्यावर एक चोरदरवाजाची विहीर आहे.

सचिवांच्या वाड्यापासून पुढे पायऱ्यांची वाट जाते आणि सरळ भोराई देवीच्या मंदिरात आणून सोडते. जर ही वाट सोडून खालची वाट पकडली तर पुढे पाण्याची टाके आहेत. या टाक्यातील पाणी पिण्यासाठी उपयुक्त आहे. टाक्यांच्या डावीकडील वाट ही आपणांस चोर दरवाज्यांकडे आणून सोडते. ही वाट मात्र आता अस्तित्वात नाही.

पाच्छापूर दरवाजा: या दरवाज्यातून गडावर शिरल्यास थोडे चढल्यावर आपण एका पठारावर पोहोचतो. पठाराच्या डावीकडे सिद्धेश्वराचे मंदिर, तसेच धान्यकोठारं, भाड्यांचे टाके, हवालदार तळे, हत्तीमाळ आहे. उजवीकडे गडाची नैसर्गिक तटबंदी बघावयास मिळते.

गडावरील टकमक टोक: वाड्यापासून आपण पायऱ्यांच्या साह्याने वर आले की उजवीकडची वाटा पकडावी. ही वाट मात्र हत्तीपागा मधूनजाते. या वाटेने आपण सरळ एका टोकावर पोहचतो. या टोकाकडे आपण पाहिल्यावर आपल्याला रायगडावरील ‘ टकमक’ टोकाची आठवण येते. या टोकावर उभे राहिल्यावर समोरच उभा असणारा घनगड, कोरीगड, तैलबैल्या दिसतो. तसेच अंबानदी व नदीच्या आजुबाजूची गावे हा परिसर दिसतो.

दिंडी दरवाजा: सवाष्णीच्या घाटावरून येणारी वाट आपणास दिंडी दरवाज्यात आणून सोडते. हा दरवाजा म्हणजे रायगडावरील ‘महादरवाज्याची’ हुबेहूब प्रतिकृती. हे किल्ल्याचे महाद्वार आहे. या द्वाराची रचना गोमुखी बांधणीची आहे. दोन भीमकाय बुरुजामध्ये लपल्यामुळे या द्वारास मोठे संरक्षण लाभले आहे. गडावर वाड्याच्या मागील बाजूस चोरवाट विहीर आहे. त्याच्यात एक भुयार असून आता मात्र, ते गाळाने पूर्ण भरले आहे.

संकटाच्या वेळी गडावरून खाली जाण्यासाठी चोरवाट पण आहे. भोराई देवीच्या मंदिराच्या मागील बाजूस अनेक समाध्या आहेत. त्यावर सुबक नक्षीकाम केले आहे.

सुधागड गडावर जाण्याच्या वाटा


सवाष्णीचा घाट: तैलबैला गावातून सरळ धोंडसे या गावी यावे. अथवा पाली गाव ते धोंडसे गाव हे अंतरही १२ कि.मी. आहे. पालीहून धोंडसे गावी यावे. तिथून गडावर जाण्यासाठी ३ तास लागतात. वाट फारच दमछाक करणारी आहे. वाट सरळसोट असल्यामुळे चुकण्याचा संभव कमी आहे. या वाटेने आपण दिंडी दरवाजात येतो.

नाणदांड घाट: एकोले गावातून घनगड डावीकडे ठेवून मावळती कडे निघावे. पुढे पाऊण तासाने नाणदांड घाटात पोहोचतो. पुढे एक बावधान गाव आहे. पुढे पाच्छापुरची दिशा धरून ठाकूरवाडीत यावे मग गडमाथा अवघ्या दोन तासात गाठता येतो.

पंत सचिवांचे वाडे येथे उपलब्ध असून येथे ५० माणसे राहू शकतात. तसेच भोराई देवीच्या मंदिरात देखील रहाण्याची सोय होते. जेवणाची सोय स्वतः केलेली असल्यास उत्तम. पण तसे शक्य नसल्यास गडावरती ‘मोरे’ नावाच्या गृहस्थांचे घर आहे. तेथे ४ ते ५ जणांची सोय होऊ शकते. गडावरतीच अनेक हौद आणि तलाव असल्याने बारामाही पाण्याची सोय होते. गडावर जाण्यासाठी दोन तास पाच्छापूर मार्गे, तीन दिंडी दरवाजा मार्गे (धोंडसे मार्ग) लागतात.


मराठीमाती | MarathiMati
संपादक मंडळ, मराठीमाती डॉट कॉम
मराठीमाती डॉट कॉम वरील विविध विभागांत लेखन आणि संपादन.

अभिप्राय

ब्लॉगर
सामायिक करा


तुमच्यासाठी सुचवलेले संबंधित लेखन


नाव

अंधश्रद्धेच्या कविता,4,अजय दिवटे,1,अजित पाटणकर,15,अनिल गोसावी,2,अनुभव कथन,4,अनुराधा फाटक,14,अपर्णा तांबे,7,अब्राहम लिंकन,2,अभंग,1,अभिव्यक्ती,497,अमन मुंजेकर,2,अमित पडळकर,4,अमित बाविस्कर,3,अमुक-धमुक,1,अमोल सराफ,1,अलका खोले,1,अक्षरमंच,320,आईच्या कविता,15,आईस्क्रीम,3,आकाश भुरसे,7,आज,401,आजीच्या कविता,1,आठवणींच्या कविता,6,आतले-बाहेरचे,1,आत्मविश्वासाच्या कविता,4,आनंद दांदळे,6,आनंदाच्या कविता,15,आभिजीत टिळक,2,आमट्या सार कढी,12,आरती गांगन,2,आरती शिंदे,4,आरत्या,80,आरोग्य,3,आशिष खरात-पाटील,1,इंद्रजित नाझरे,11,इसापनीती कथा,44,उदय दुदवडकर,1,उन्मेष इनामदार,1,उपवासाचे पदार्थ,13,उमेश कुंभार,11,ऋग्वेदा विश्वासराव,2,ऋचा मुळे,8,ऋषिकेश शिरनाथ,2,एप्रिल,30,एहतेशाम देशमुख,2,ऑक्टोबर,31,ऑगस्ट,31,कपिल घोलप,5,कपील घोलप,2,करमणूक,40,कर्क मुलांची नावे,1,कविता शिंगोटे,1,कार्यक्रम,8,कालिंदी कवी,1,काव्य संग्रह,1,किल्ले,92,किल्ल्यांचे फोटो,3,किशोर चलाख,3,कुठेतरी-काहीतरी,2,कृष्णाच्या आरत्या,5,केदार कुबडे,40,कोशिंबीर सलाड रायते,11,कौशल इनामदार,1,खरगपूर,1,गणपतीच्या आरत्या,5,गणेश पाटील,1,गण्याचे विनोद,1,गावाकडच्या कविता,7,गुरूच्या आरत्या,2,गुलझार काझी,1,गोड पदार्थ,31,घरचा वैद्य,2,घाट,1,चटण्या,1,जानेवारी,31,जीवनशैली,220,जुलै,31,जून,30,ज्योती मालुसरे,1,टीझर्स,1,ट्रेलर्स,2,डिसेंबर,31,तरुणाईच्या कविता,2,तिच्या कविता,11,तुकाराम गाथा,4,तेजस्विनी देसाई,1,दत्ताच्या आरत्या,5,दादासाहेब गवते,1,दिनदर्शिका,380,दिनविशेष,366,दिनेश बोकडे,1,दिनेश हंचाटे,1,दिपक शिंदे,1,दिवाळी फराळ,9,दुःखाच्या कविता,35,देवीच्या आरत्या,3,धोंडोपंत मानवतकर,6,निखिल पवार,1,निसर्ग कविता,10,नोव्हेंबर,30,न्याहारी,31,पंचांग,14,पथ्यकर पदार्थ,2,पांडुरंग वाघमोडे,3,पाककला,174,पावसाच्या कविता,12,पी के देवी,1,पुडिंग,10,पुणे,6,पोस्टर्स,5,पोळी भाकरी,8,पौष्टिक पदार्थ,14,प्रतिक्षा जोशी,1,प्रभाकर लोंढे,3,प्रवासाच्या कविता,4,प्राजक्ता गव्हाणे,1,प्रिया महाडिक,6,प्रियांका न्यायाधीश,3,प्रेम कविता,43,प्रेरणादायी कविता,12,फेब्रुवारी,29,फोटो गॅलरी,8,बातम्या,5,बाबाच्या कविता,1,बायकोच्या कविता,3,बालकविता,5,बालकवी,1,बाळाची मराठी नावे,1,बाळासाहेब गवाणी-पाटील,1,बिपीनचंद्र नेवे,1,बेकिंग,3,भक्ती कविता,1,भाज्या,18,भाताचे प्रकार,9,भूमी जोशी,1,मंगळागौरीच्या आरत्या,2,मंदिरे,1,मधल्या वेळेचे पदार्थ,27,मनाचे श्लोक,205,मराठी कथा,44,मराठी कविता,248,मराठी गझल,3,मराठी गाणी,2,मराठी चारोळी,1,मराठी चित्रपट,10,मराठी टिव्ही,26,मराठी नाटक,1,मराठी पुस्तके,2,मराठी प्रेम कथा,4,मराठी भयकथा,39,मराठी रहस्य कथा,2,मराठी लेख,20,मराठी विनोद,1,मराठी साहित्य,2,मराठी सुविचार,2,मराठीमाती,401,मसाले,12,महाराष्ट्र,255,महाराष्ट्र फोटो,6,महाराष्ट्राचा इतिहास,32,महाराष्ट्रीय पदार्थ,15,महालक्ष्मीच्या आरत्या,2,मांसाहारी पदार्थ,10,माझं मत,1,माझा बालमित्र,46,मातीतले कोहिनूर,10,मारुतीच्या आरत्या,2,मार्च,31,मुंबई,7,मुलांची नावे,1,मुलाखती,1,मे,31,मैत्रीच्या कविता,3,यशपाल कांबळे,1,यशवंत दंडगव्हाळ,16,यादव सिंगनजुडे,2,योगेश कर्डीले,1,राजकीय कविता,6,रामचंद्राच्या आरत्या,5,राहुल अहिरे,3,रेश्मा विशे,1,रोहित साठे,12,लता मंगेशकर,1,लक्ष्मण अहिरे,2,लोणची,7,वाळवणाचे पदार्थ,5,विचारधन,211,विठ्ठलाच्या आरत्या,5,विद्या कुडवे,4,विद्या जगताप,2,विनायक मुळम,1,विरह कविता,26,विराज काटदरे,1,विलास डोईफोडे,2,विवेक जोशी,1,विशेष,46,विष्णूच्या आरत्या,4,विज्ञान तंत्रज्ञान,2,वेदांत कोकड,1,व्यंगचित्रे,9,व्हिडिओ,18,शंकराच्या आरत्या,4,शशांक रांगणेकर,1,शांततेच्या कविता,3,शारदा सावंत,1,शाळेच्या कविता,1,शितल सरोदे,1,शिक्षकांवर कविता,1,शेतकर्‍याच्या कविता,4,श्रद्धा नामजोशी,3,श्रावणातल्या कहाण्या,27,श्रीनिवास खळे,1,संगीता अहिरे,1,संघर्षाच्या कविता,9,संजय पाटील,1,संजय बनसोडे,1,संजय शिवरकर,5,संजय सावंत,1,संत एकनाथ,1,संत तुकाराम,7,संत नामदेव,2,संत ज्ञानेश्वर,3,संदेश ढगे,17,संपादकीय,4,संपादकीय व्यंगचित्रे,8,संस्कृती,120,सचिन पोटे,4,सण-उत्सव,12,सणासुदीचे पदार्थ,28,सनी आडेकर,10,सप्टेंबर,30,समर्थ रामदास,206,सरबते शीतपेये,8,सामाजिक कविता,34,सायली कुलकर्णी,3,साहित्य,1,साहित्य सेतू,1,साक्षी खडकीकर,9,सुमती इनामदार,1,सुरेश भट,1,सुशीला मराठे,1,सैनिकांच्या कविता,1,सैरसपाटा,96,स्तोत्रे,1,स्फूर्ती गीत,1,स्वप्नाली अभंग,3,स्वाती खंदारे,167,स्वाती दळवी,3,स्वाती वक्ते,1,ह मुलांची नावे,1,हरितालिकेच्या आरत्या,1,हर्षद खंदारे,35,हर्षदा जोशी,3,हेमा चिटगोपकर,8,होळी,5,
ltr
item
मराठीमाती | माझ्या मातीचे गायन: सुधागड किल्ला
सुधागड किल्ला
सुधागड किल्ला - [Sudhagad Fort] ५९० मीटर उंचीचा सुधागड किल्ला गिरीदुर्ग प्रकारातील आहे. रायगड जिल्ह्यातील लोणावळा डोंगररांगेतील सुधागड किल्ला ट्रेकर्स च्या दृष्टीने सोपा समजला जातो.
https://2.bp.blogspot.com/-4KTrHPcLW28/XbBnnhXK73I/AAAAAAAAEpQ/CnZABr4SwKUFCg1yrKizi-d3-dNbslTXgCLcBGAsYHQ/s1600/sudhagad-fort.jpg
https://2.bp.blogspot.com/-4KTrHPcLW28/XbBnnhXK73I/AAAAAAAAEpQ/CnZABr4SwKUFCg1yrKizi-d3-dNbslTXgCLcBGAsYHQ/s72-c/sudhagad-fort.jpg
मराठीमाती | माझ्या मातीचे गायन
https://www.marathimati.com/2013/11/sudhagad-fort.html
https://www.marathimati.com/
https://www.marathimati.com/
https://www.marathimati.com/2013/11/sudhagad-fort.html
true
2079427118266147504
UTF-8
सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ minutes ago १ तासापूर्वी $$1$$ hours ago काल $$1$$ days ago $$1$$ weeks ago ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy