Loading ...
/* Dont copy */
पन्हाळगड किल्ला (महाराष्ट्रातील दुर्ग - किल्ले)
स्वगृहमहाराष्ट्रसैरसपाटाकिल्लेजागतिक वारसा स्थळेदुर्ग

पन्हाळगड किल्ला (महाराष्ट्रातील दुर्ग - किल्ले)

पन्हाळगड किल्ला हा शिवरायंच्या जीवातील नाट्यपूर्ण घटनांचा साक्षीदार आहे...

पन्हाळगड किल्ला (महाराष्ट्रातील दुर्ग - किल्ले) - ४००० फूट उंचीचा पन्हाळगड किल्ला गिरीदुर्ग प्रकारातील आहे (Panhalgad Fort).

शिवनेरी किल्ला (महाराष्ट्रातील दुर्ग - किल्ले)
राजगड किल्ला (महाराष्ट्रातील दुर्ग - किल्ले)
साल्हेर किल्ला (महाराष्ट्रातील दुर्ग - किल्ले)
चंदन वंदन किल्ला (महाराष्ट्रातील दुर्ग - किल्ले)
लोहगड किल्ला
पन्हाळगड किल्ला (महाराष्ट्रातील दुर्ग - किल्ले)

पन्हाळगड किल्ला

मराठीमाती संपादक मंडळ

(Panhalgad Fort) ४००० फूट उंचीचा पन्हाळगड किल्ला गिरीदुर्ग प्रकारातील आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील कोल्हापूर डोंगररांगेतील पन्हाळगड किल्ला ट्रेकर्स च्या दृष्टीने सोपा समजला जातो. महाराष्ट्राच्या इतिहासात शिवरायांना अनन्य साधारण महत्त्व आहे. त्यांच्या कारकिर्दीतील करे सोबती म्हणजे अजिंक्य आणि बेलाग किल्ले. शिवरायंच्या जीवातील नाट्यपूर्ण घटनांचा साक्षीदार म्हणजे किल्ले पन्हाळगड.

पन्हाळगड किल्ल्याचा इतिहास


पन्हाळगड किल्ला प्रथम शिलाहार भोज राजा नृसिंह याच्या कारकिर्दीत बांधण्यात आला. हा किल्ला पूर्वी नाग जमातीतील लोकांकडे होता. याचे पहिले नाव ‘पन्नग्नालय’ अफजलवधा नंतर १८ दिवसातच शिवरायांनी हा किल्ला २८ नोव्हेंबर १६५९ ला घेतला.

पन्हाळगडावरील तीन दरवाजा
पन्हाळगडावरील तीन दरवाजा

किल्ला विजापुररांच्या ताब्यात पडला पण राजांनी तो पुन्हा घेतला. २ मार्च १६६० मध्ये किल्ल्यास सिद्धी जौहरचा वेढा पडला. १६७३ मध्ये कोंडाजी फर्जंद या बरोबर सैन्य पाठवून भेदनितिचा उपयोग करून किल्ला ताब्यात घेतला. पुढे १७१० मध्ये पन्हाळा कोल्हापूरची राजधानी झाली नंतर १८४४ मध्ये किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेला.

पन्हाळगड किल्ल्यावर पहाण्यासारखी ठिकाणे


राजवाडा


हा ताराबाईचा वाडा होय. वाडा प्रेक्षणीय असून यातील देवघर बघण्यासारखे आहे. आज याट नगरपालिका कार्यालय पन्हाळा हायस्कूल व मिलटरी बाईज होस्टेल आहे.

सज्जाकोठी


राजवाड्यावरून पुढे गेल्यावर ही कोठीवजा इमारत दिसते. याच इमारतीस संभाजी राजांना शिवरायांनी या प्रांताचा कारभार पहाण्यास ठेवले होते. शिवरायांची गुप्त खलबते येथेच चालत.

राजदिंडी


ही दुर्गम वाट गडाखाली उतरते. याच वाटेचा उपयोग करून शिवराय सिद्धी जौहरचा वेढ्यातून निसटले. हीच विशाळगडावर जाणारी एकमेव वाट आहे. याच दरवाजातून ४५ मैलांचे अंतर कापून महाराज विशाळगडावर पोहचले.

अंबारखाना


अंबारखाना हा पूर्वीचा बालेकिल्ला. याच्या सभोवती खंदक आहे येथेच गंगा, यमुना आणि सरस्वती अशी तीन धान्यकोठारे आहेत. यात वरी, नागली आणि भात असे सुमारे २५ हजार खंडी धान्य मावत असे. याशिवाय सरकारी कचेऱ्या, दारूगोळा आणि टाकसाळ वैगरे होती.

चार दरवाजा


हा पूर्वकडील अत्यंत मोक्याचा व महत्वाचा दरवाजा होय. इ.स. १८४४ मध्ये हा इंग्रजांनी पाडून टाकला. थोडे भग्नावशेष आज शिल्ल्क आहेत. येथेच ‘शिवा काशीद’ यांचा पुतळा आहे.

सोमाळे तलाव


गडाच्या पेठेलगत हे एक मोठे तळे आहे. तळ्याच्या काठावर सोमेश्वर मंदिर आहे. ह्या मंदिराला महाराजांनी व त्याच्या सहस्त्र मावळ्यांनी लक्ष्य चाफ्यांची फुले वाहिली होती.

रामचंद्रपंत अमात्य यांची समाधी


सोमेश्वर तलावापासून थोडे पुढे गेल्यावर दोन समाध्या दिसतात. त्यातील उजवीकडची रामचंद्रपंत अमात्य व बाजूची त्यांच्या पत्नीची.

रेडे महाल


याच्याच बाजूला एक आडवी इमारत दिसते. त्यास रेडे महाल म्हणतात. वस्तुतः ही पागा आहे मात्र त्यात नंतर जनावरे बांधत म्हणून त्याला रेडे महाल म्हणत.

संभाजी मंदिर


त्याच्यापुढे ही एक छोटी गढी व दरवाजा आहे हे संभाजी मंदिर आहे.

धर्मकोठी


संभाजी मंदिरापुढे गेल्यावर ही एक झोकदार इमारत दिसते. ती धर्मकोठी सरकारातून धान्य आणून येथे यथायोग्य दानधर्म करत.

अंदरबाव


तीन दरवाज्याच्या वरच्या बाजूला माळावर एक तीन कमानीची, काळ्या दगडांची वास्तू दिसते. ही वास्तू तीन मजली आहे. सर्वात तळाला खोल पाण्याची विहीर आहे. तर मधला मजला रा पेस आहे त्यातून तटाबाहेर जाण्यासाठी खिडकीवजा चोर दरवाजा दिसतो.

महालक्ष्मी मंदिर


राजवाड्यातून बाहेर पडल्यावर नेहरू उद्यानाच्या खालच्या बाजूस महालक्ष्मी मंदिर आहे. हे गडावरील सर्वात प्राचीन मंदिर आहे. ह्याच्या बांधणीवरून ते साधारण १००० वर्षापूर्वीचे असावे. राजा गंडारित्य भोज याचे हे कुलदैवत होय.

तीन दरवाजा


हा पश्चिमेकडील सर्वात महत्त्वाचा दरवाजा. दरवाज्या वरील नक्षीकाम प्रेक्षणीय आहे. इ.स. १६७६ मध्ये कोंडाजी फर्जदने येथूनच अवघ्या ६० मावळ्यानिशी किल्ला जिंकला.

बाजीप्रभुंचा पुतळा


एस.टी थांब्यावरून थोडे खाली आल्यावर एका ऐसपैस चौकात वीररत्न बाजीप्रभु देशपांडे ह्यांचा आवेशपूर्ण पुतळा आहे.

पन्हाळगड गडावर जाण्याच्या वाटा


चार दरवाजा मार्गे


कोल्हापूर शहरातून एस.टी बसने किंवा खाजगी वाहनाने थेट किल्ल्यावर जाता येते. ही वाट चार दरवाजा मार्गे गडात प्रवेश करते.

तीन दरवाजा मार्गे


गडावर जाण्यासाठीचा दुसरा मार्ग तीन दरवाजातून जातो. हा दरवाजा तीन मजली असून याचे बांधकाम शिसे ओतून केलेले आहे.

  • किल्ल्यावर राहण्यासाठी निवासस्थाने हॉटेल्स आहेत.
  • जेवणाची सोय निवासस्थानांमध्ये होते.
  • किल्ल्यावर बारामही पिण्याच्या पाण्याची सोय आहे.
  • किल्ल्यावर जाण्यासाठी कोल्हापूर मार्गे गाडी रस्त्याने १ तास लागतो.
  • किल्ल्यावर जाण्यासाठी सर्व ऋतु उत्तम आहेत.

महाराष्ट्रातील दुर्ग - किल्ले संबंधी इतर लेखन वाचा:

अभिप्राय

  1. मंदार कदम०२ ऑगस्ट, २०२५

    पन्हाळा किल्ला आजही बऱ्यापैकी चांगल्या स्थितीत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची सर्वच गड - किल्ले - दुर्ग शासनाने डागडूजी करून सुधारावीत अशी अपेक्षा आहे.
    मराठीमाती डॉट कॉम तुमच्या संकेतस्थळास शुभेच्छा! लाईक्स आणि शेअरच्या काळात हरवलेल्या कंटेंटचा दर्जा आपण आजही टिकवून आहात.

    उत्तर द्या हटवा
तुमची टिप्पणी आमच्यासाठी महत्त्वाची आहे!
तुमचा अभिप्राय / टिप्पणी ही आम्ही कसे कार्य करतो? त्यातील सुधारणांसाठी आणि आम्ही सातत्याने उच्च-गुणवत्तेची सेवा प्रदान करतोय की नाही हे समजून घेण्यासाठी आमच्यासाठी महत्वाची आहे.

मराठीतील बोलीभाषा
मराठीतील बोलीभाषा
सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची