Loading ...

ताहुली किल्ला (महाराष्ट्रातील दुर्ग - किल्ले)

ठाणे जिल्ह्यातील माथेरान डोंगररांगेत वसलेला ताहुली किल्ला गिरीदुर्ग प्रकारातील असून ३४८७ फूट उंच आहे. ट्रेकर्ससाठी तो मध्यम अवघड समजला जातो.

ताहुली किल्ला (महाराष्ट्रातील दुर्ग - किल्ले)

ताहुलीच्या पठारावर संत गाडगे बाबा महाराजांचा मठ आहे


ताहुली किल्ला (महाराष्ट्रातील दुर्ग - किल्ले)

ताहुली किल्ला - (Tahuli Fort) ३४८७ फूट उंचीचा ताहुली किल्ला गिरीदुर्ग प्रकारातील आहे. ठाणे जिल्ह्यातील माथेरान डोंगररांगेतील ताहुली किल्ला ट्रेकर्स च्या दृष्टीने मध्यम समजला जातो. कल्याण, कर्जत व पनवेल या विभागात हा किल्ला आहे. ताहुली ला किल्ला किंवा गड म्हणणे तसे अयोग्यच. हा त्याच्या तीन सुळक्यांमुळे प्रसिद्ध आहे. उंच बेलाग कडे, जाण्याच्या अवघड वाटा यामुळे ताहुली वैशिष्ट्यपूर्ण आहे आणि कदाचित यामुळेच दुर्लक्षितही आहे.


ताहुली किल्ल्यावर पहाण्यासारखी ठिकाणे


ताहुलीच्या पठारावर संत गाडगे बाबा महाराजांचा मठ आहे. या वाटेत आणखी दोन आश्रम लागतात. पठाराच्या सर्वात वरच्या भागाला ‘दादीमा ताहुली’ म्हणतात. येथे ५ पीर आहेत. समोरच एक छोटेसे घर देखील आहे. याच वाटेने थोडे पुढे गेल्यावर दोन तासात आपण ताहुलीच्या सुळक्यापाशी पोहोचतो. एका सुळक्याचे नाव ‘दाऊद’ तर दुसऱ्याचे नाव ‘बामण’ आहे.

ताहुली गडावर जाण्याच्या वाटा


ताहुलीवर जाण्यासाठी दोन मार्ग आहेत.

अंबरनाथ मार्गे: अंबरनाथवरून बाहेर पडून बदलापुरचा रस्ता ओलांडावा. थोड्याच वेळात काकुली नावाचा तलाव लागतो. या काकुली तलावापासून थोड्याच अंतरावा एक डोंगराची सोंड वर ताहुलीच्या तीन सुळक्यांपाशी पोहोचते. या वाटेने ताहुली पठार गाठण्यास ४ तास लागतात.

कुशीवली मार्गे: कुशीवली वरून कल्याण मलंगगड रोडवर कुशीवली गावाच्या स्टॉपवर उतरणे. गावाच्या बाहेरूनच थेट बैलगाडी जाईल एवढी मोठी वाट ताहुलीला गेली आहे. ही वाट दोन डोंगराच्या बेचक्यातून वर चढते. कुशीवली गावापासून वर पठारावर जाण्यास अडीच तास लागतात.

गडावर राहण्याची सोय नाही. येथे जेवणाची सोय नाही, आपणच सोय करावी लागते. पाण्याची सोय नाही. जाण्यासाठी अडीच तास कुशीवली मार्गे व चार तास काकुली लेक मार्गे लागतात.

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची