धरित्रीची कहाणी

धरित्रीची कहाणी, श्रावणातल्या कहाण्या - [Dharitrichi Kahani, Shravanatalya Kahanya] श्रावणात वाचल्या जाणाऱ्या श्रावणातल्या कहाण्यांपैकी एक कहाणी - धरित्रीची कहाणी.
धरित्रीची कहाणी - श्रावणातल्या कहाण्या | Dharitrichi Kahani - Shravanatalya Kahanya

श्रावणात वाचल्या जाणाऱ्या श्रावणातल्या कहाण्यांपैकी एक - धरित्रीची कहाणी

ऐका परमेश्वरा, धरित्रीमाये, तुमची कहाणी. आटपाट नगर होतं. नगरात एक ब्राह्मण होता, त्या ब्राह्मणाची स्त्री काय करी? धरित्री मायेचं चिंतन करी. वंदन करी. ‘धरित्रीमाये, तूच थोर, तूच समर्थ, कांकणलेल्या लेकी दे. मुसळकांड्या दासी दे. नारायणासारखे पाच पुत्र दे. दोघी कन्या दे. कुसुंबीच्या फुलासारखे स्थळ दे.’

हा वसा कधी घ्यावा? आखाड्या दशमीस घ्यावा, कार्तिक्या दशमीस संपूर्ण करावा किंवा श्रावणी तृतीयेला घ्यावा, माघी तृतीयेला संपूर्ण करावा. सहा रेघांचा चंद्र काढावा, सहा रेघांचा सूर्य काढावा, सहा गाईची पावलं काढावी व त्यांची रोज पूजा करावी. संपूर्णाला काय करावं? वाढाघरची सून जेवू सांगावी. कोरा करा, पांढरा दोरा, चोळीपोळीचं वाण द्यावं आणि आपल्या वशाचं उद्यापन करावं.

ही धरित्रीमायेची कहाणी, साठा उत्तराची पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण.

तात्पर्य: धरित्रीमातेला पुज्य मानून तिचे नेहमी पूजन करावे.

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.