ललितापंचमीची कहाणी

ललितापंचमीची कहाणी, श्रावणातल्या कहाण्या - [Lalitapanchamichi Kahani, Shravanatalya Kahanya] श्रावणात वाचल्या जाणाऱ्या श्रावणातल्या कहाण्यांपैकी एक कहाणी - ललितापंचमीची कहाणी.

ललितापंचमीची कहाणी - श्रावणातल्या कहाण्या | Lalitapanchamichi Kahani - Shravanatalya Kahanya

श्रावणात वाचल्या जाणाऱ्या श्रावणातल्या कहाण्यांपैकी एक - ललितापंचमीची कहाणी

आटपाट नगर होतं. तिथं एक ब्राह्मण होता. त्याला आवळे जावळे मुलगे होते. त्यांच्या लहानपणीच त्यांचे आईबाप मेले. भाऊबंदांनी त्यांचं काय होतं नव्हतं ते सगळे हिरावून घेतलं व मुलांना देशोधडीला लावलं. पुढं ती मुलं जाता जाता एका नगरात आली. दोन प्रहरची वेळ झाली आहे. वाट चालता चालता दोघे दमून गेले आहेत. दोघांचे जीव भुकेनं कळवळले आहेत. दोघांची तोंडं सुकून गेली आहेत. असे ते दोघेजण त्या नगरीत आले. इतक्यात एक चमत्कार झाला. एक ब्राह्मण काकबळी टाकण्याकरिता घरातून बाहेर आला. ब्राह्मणाने त्या मुलांस पाहिलं. आपल्या घरातून बोलावून नेलं. जेवू घातलं. खाऊ घातलं. नंतर त्यांची सगळी हकीकत विचारली. त्या मुलांनी आपली सर्व हकीकत सांगितली. ब्राह्मणानं दोन्ही मुलांना घरी ठेवून घेतलं. वेदाध्ययन पढवू लागला. मुलंही तिथं राहून वेद पढू लागली. असं करता करता पुष्कळ दिवस झाले.

पुढं काय झालं ? तो ब्राह्मण ललितापंचमीचं व्रत करू लागला. शिष्यांनी गुरुजीला विचारलं, “हे आपण काय करता?” तेव्हा गुरुजी म्हणाले,“ हे उपांगललितापंचमीचं व्रत आहे. ह्यानं द्रव्य मिळतं, विद्या प्राप्त होते. इच्छित हेतु प्राप्त होतात,” हे त्या शिष्यांनी ऐकलं. यथाशक्ति त्यांनी व्रत केले, तशी त्यांना लवकर विद्या आली. दोघां मुलांची लग्ने झाली. पुढं ते आपल्या नगरी आले. श्रीमंत झाले. सुखासमाधानानं किर्ती मिळवून राहू लागले. याप्रमाणं काही दिवस गेले.

पुढं काय चमत्कार झाला? दोघे भाऊ वेगळे निघाले. थोरला भाऊ दर वर्षी आपलं ललितापंचमीचं व्रत करी, त्यामुळं त्याची संपत्ति कायम राहिली. धाकट्या भावानं व्रताची हेळसांड केली त्याचा देवीला राग आला. त्यामुळं त्याला दारिद्र्य आलं. पुढं ती नवराबायको थोरल्या भावाकडे रहावयास गेली. एके दिवशी वडील भावाची बायको दिराला काही बोलली. त्यामुळं त्याला राग आला. मोठा पश्चात्ताप झाला. आपल्या बायकोला म्हणाला, “मी उपांगललितेचं व्रत टाकलं. त्याचं मला हे फळ आलं. हा अपमान सहन करून इथं रहाणं चांगलं नाही, मी आता देवीला प्रसन्न करीन तेव्हाच घरी येईन.” असं बोलून तो गेला. पुढं त्याच्या भावानं त्याचा पुष्कळ शोध केला; परंतु शोध काही लागला नाही. पुढं हिंडतां हिंडतां एकदा तो नगराजवळ आला. त्या नगराबाहेर गुराखी भेटले. त्यांना विचारलं, “ह्या गावाचं नाव काय? कोणता राजा इथं रहातो? उतरायला जागा कुठं मिळेल?” ते म्हणाले, “ह्या गावाचं नांव उपांग आहे. इथं राजाही उपांगच आहे. तिथं ललितेचं एक देऊळ आहे. तिथं मोठी धर्मशाळा आहे. तिथं उतरायला जागा मिळेल. आम्ही त्याच गावातून आलो. तिकडेच आम्हांला जायचं आहे. तुम्हालाही यायचं असेल तर चला” मग तो त्या नगरात गेला. धर्मशाळेत उतरला. देवीचं दर्शन घेतलं. अनन्यभावानं तिला शरण गेला. रात्री देवळातच निजला. देवीनं स्वप्नात येऊन दृष्टांत दिला. “राजाकडे जा, माझ्या पूजेच्या करंड्याचं झाकण माग, त्याची नेहमी पूजा कर, म्हणजे तुझे मनोरथ पूर्ण होईल.” इतकं सांगून देवी गुप्त झाली व तो जागा झाला.

[next] दुसरे दिवशी तो राजाकडे गेला, देवीचा दृष्टांत सांगितला, पूजेचं झाकण मागितलं. राजानं ते दिलं. ब्राह्मण ते घेऊन आपल्या गावी आला. घरी नेऊन त्याची पूजा करू लागला. ललितादेवीचं व्रत करू लागला. तसे पुन्हा सुखाचे दिवस आले. इच्छित मनोरथ सिद्धीला गेले. पुढं देवीच्या आशीवार्दानं त्याला एक मुलगी झाली. सोबतिणीबरोबर खेळायला जाऊ लागली. पुढं काय चमत्कार झाला? एके दिवशी मुलीनं तें झाकण घेतलं. नदीवर खेळायला गेली. तिथं जाऊन आंघोळ करू लागली. इतक्यात एका ब्राह्मणाचं प्रेत वाहत आलं. तिनं त्याच्यावर झाकणानं पाणी उडविलं, तसा तो ब्राह्मण जिवंत झाला. देवीच्या प्रसादानं त्याला सुंदर रूप प्राप्त झालं. तिनं ते पाहिलं. आपल्याला हा पति असावा असं तिला वाटलं. आपला हेतु त्याला कळविला. तेव्हा त्यानं हिला विचारलं, “ही गोष्ट घडेल कशी? तशी ती म्हणाली, “मी तुम्हाला घरी जेवायला बोलावते, जेवायच्या वेळेस आपोषणी हातात घ्या आणि अडून बसा म्हणजे बाबा तुम्हाला विचारतील. “भटजी, आपोषणी का घेत नाही? तेव्हां सांगा कीं, आपली कन्या मला देशील तर जेवतो, नाही तर असाच उठतो. म्हणजे ते देतील.” त्याप्रमाणं तिनं जेवायला बोलावलं. ब्राह्मण जेवायला बसू लागला. मुलीचं मागणं केलं. बापानं मुलगी देण्याचं कबूल केलं. सुखासमाधानानं जेवणं झाली. चांगला मुहूर्त पाहून लग्न लावलं, नवरानवरींची बोळवण केली. मुलगी घरी जातेवेळेस देवीचं प्रसादाचं झांकण घेऊन गेली. त्यामुळे बापाच्या घरातलं सगळं द्रव्यं गेलं. दळिद्र आलं, तो फार गरीब झाला. तसं त्याच्या बायकोनं मुलीजवळ झाकण मागितलं. मुलीनं ते दिलं नाहीं. तिनं तो रोष मनात ठेवला. एके दिवशी आई मुलीच्या घरी जाऊ लागली. जाताना वाटेत जांवई भेटला. सासूनं त्याला ठार मारवलं. झांकण घेऊन घरी आली.

इकडे मुलीच्या व्रताच्या पुण्यानं जावई जिवंत झाला. उठून घरी गेला. बायकोला झालेली हकीगत सांगितली. तिला मोठा आनंद झाला. पुढं ही सगळी हकीगत सासूला समजली, तशी ती जावयाच्या घरी आली. पटापट पाया पडू लागली. केलेला अपराध कबूल झाली. तिला पश्चात्ताप झाला. अशा कर्मामुळं तिला गरीबी आली. तिचा नवरा आश्चर्य करू लागला की वारंवार असं का होतं? ह्याचं कारण काही केल्या त्याच्या लक्षात येईना. म्हणून वडील भावाकडे गेला. त्याला सगळी हकीकत सांगितली. तो म्हणाला, “तू ललितापंचमीच्या व्रताची हेळसांड करतोस, त्या योगानं असं होतं. व्रतनेम यथास्थित कर. देवीची पूजा कर. म्हणजे तुझं कल्याण होईल.” त्यानं तसं वागण्याचा निश्चय केला. घरी आला. व्रत करू लागला. काही काळाने दळिद्र गेलं. मनातले त्याचे इष्ट हेतु पूर्ण झाले. तसे तुमचे आमचे होवोत.

ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण.

तात्पर्य: जो उन्मत्त होऊन देवाच्या भक्तीकडे दुर्लक्ष करतो त्याला त्याच्याबद्दल चांगले शासन होते.

अभिप्राय

ब्लॉगर


  सामायिक करा


तुमच्यासाठी सुचवलेले संबंधित लेखन

नाव

अंधश्रद्धेच्या कविता,5,अजय दिवटे,1,अजित पाटणकर,18,अनिकेत शिंदे,1,अनिल गोसावी,2,अनुभव कथन,10,अनुराधा फाटक,39,अपर्णा तांबे,7,अब्राहम लिंकन,2,अभंग,2,अभिव्यक्ती,865,अमन मुंजेकर,6,अमरश्री वाघ,1,अमित पडळकर,4,अमित पवार,1,अमित बाविस्कर,3,अमुक-धमुक,1,अमोल देशमुख,1,अमोल वाघमारे,1,अमोल सराफ,2,अर्थनीति,2,अलका खोले,1,अश्विनी तातेकर-देशपांडे,1,अक्षय वाटवे,1,अक्षरमंच,633,आईच्या कविता,17,आईस्क्रीम,3,आकाश पवार,1,आकाश भुरसे,8,आज,10,आजीच्या कविता,1,आठवणींच्या कविता,11,आतले-बाहेरचे,3,आत्मविश्वासाच्या कविता,9,आनंद दांदळे,8,आनंदाच्या कविता,20,आभिजीत टिळक,2,आमट्या सार कढी,15,आरती गांगन,2,आरती शिंदे,4,आरत्या,80,आरोग्य,4,आशिष खरात-पाटील,1,इंद्रजित नाझरे,26,इसापनीती कथा,44,उदय दुदवडकर,1,उन्मेष इनामदार,1,उपवासाचे पदार्थ,13,उमेश कानतोडे,1,उमेश कुंभार,12,ऋग्वेदा विश्वासराव,2,ऋचा पिंपळसकर,10,ऋचा मुळे,16,ऋषिकेश शिरनाथ,2,एप्रिल,30,एहतेशाम देशमुख,2,ऑक्टोबर,31,ऑगस्ट,31,ओंकार चिटणीस,1,कपिल घोलप,11,करमणूक,43,कर्क मुलांची नावे,1,कविता शिंगोटे,1,कवितासंग्रह,6,कार्यक्रम,9,कालिंदी कवी,2,किल्ले,92,किल्ल्यांचे फोटो,5,किशोर चलाख,6,कुठेतरी-काहीतरी,2,कुसुमाग्रज,1,कृष्णाच्या आरत्या,5,केदार कुबडे,40,केदार नामदास,1,केदार मेहेंदळे,1,कोशिंबीर सलाड रायते,11,कौशल इनामदार,1,खंडोबाची स्थाने,1,खरगपूर,1,गणपतीच्या आरत्या,5,गणेश तरतरे,10,गणेश पाटील,1,गण्याचे विनोद,1,गाडगे बाबा,1,गावाकडच्या कविता,7,गुरूच्या आरत्या,2,गुलझार काझी,1,गोड पदार्थ,37,घरचा वैद्य,2,घाट,1,चटण्या,1,चातुर्य कथा,6,चित्रपट समीक्षा,1,चैतन्य म्हस्के,1,जानेवारी,31,जिल्हे,1,जीवनशैली,267,जुलै,31,जून,30,ज्योती मालुसरे,1,टीझर्स,1,ट्रेलर्स,3,डिसेंबर,31,तरुणाईच्या कविता,2,तिच्या कविता,33,तुकाराम गाथा,4,तेजस्विनी देसाई,1,दत्ताच्या आरत्या,5,दर्शन जोशी,2,दादासाहेब गवते,1,दिनदर्शिका,372,दिनविशेष,366,दिनेश बोकडे,1,दिनेश हंचाटे,1,दिपक शिंदे,2,दिवाळी फराळ,9,दुःखाच्या कविता,61,देवीच्या आरत्या,3,देशभक्तीपर कविता,2,धार्मिक स्थळे,1,धोंडोपंत मानवतकर,9,निखिल पवार,1,निमित्त,3,निराकाराच्या कविता,6,निवडक,1,निसर्ग कविता,15,नोव्हेंबर,30,न्याहारी,37,पंचांग,6,पथ्यकर पदार्थ,2,पराग काळुखे,1,पल्लवी माने,1,पांडुरंग वाघमोडे,3,पाककला,205,पालकत्व,6,पावसाच्या कविता,18,पी के देवी,1,पुडिंग,10,पुणे,9,पोस्टर्स,5,पोळी भाकरी,11,पौष्टिक पदार्थ,14,प्रजोत कुलकर्णी,1,प्रतिक बळी,1,प्रतिभा जोजारे,1,प्रतिक्षा जोशी,1,प्रभाकर लोंढे,3,प्रवास वर्णन,1,प्रवासाच्या कविता,10,प्रविण पावडे,9,प्रवीण राणे,1,प्रसन्न घैसास,2,प्रज्ञा वझे-घारपुरे,9,प्राजक्ता गव्हाणे,1,प्रिया जोशी,1,प्रियांका न्यायाधीश,3,प्रेम कविता,72,प्रेरणादायी कविता,14,फेब्रुवारी,29,फोटो गॅलरी,11,बा भ बोरकर,1,बातम्या,6,बाबाच्या कविता,1,बायकोच्या कविता,3,बालकविता,8,बालकवी,1,बाळाची मराठी नावे,1,बाळासाहेब गवाणी-पाटील,1,बिपीनचंद्र नेवे,1,बेकिंग,9,भक्ती कविता,8,भाज्या,21,भाताचे प्रकार,11,भूमी जोशी,1,मंगळागौरीच्या आरत्या,2,मंजुषा कुलकर्णी,2,मंदिरांचे फोटो,2,मंदिरे,1,मधल्या वेळेचे पदार्थ,33,मनाचे श्लोक,205,मनिषा दिवेकर,3,मराठी उखाणे,2,मराठी कथा,87,मराठी कविता,486,मराठी गझल,17,मराठी गाणी,2,मराठी गोष्टी,1,मराठी चारोळी,1,मराठी चित्रपट,12,मराठी टिव्ही,27,मराठी नाटक,1,मराठी पुस्तके,4,मराठी प्रेम कथा,22,मराठी भयकथा,41,मराठी रहस्य कथा,2,मराठी लेख,28,मराठी विनोद,1,मराठी साहित्य,12,मराठी साहित्यिक,1,मराठी सुविचार,2,मराठीमाती,353,मसाले,12,महाराष्ट्र,271,महाराष्ट्र फोटो,9,महाराष्ट्राचा इतिहास,32,महाराष्ट्रीय पदार्थ,18,महालक्ष्मीच्या आरत्या,2,महेश बिऱ्हाडे,1,मांसाहारी पदार्थ,17,माझं मत,1,माझा बालमित्र,53,मातीतले कोहिनूर,13,मारुतीच्या आरत्या,2,मार्च,31,मुंबई,8,मुकुंद शिंत्रे,35,मुक्ता चैतन्य,1,मुलांची नावे,1,मुलाखती,1,मे,31,मैत्रीच्या कविता,5,यश सोनार,2,यशपाल कांबळे,2,यशवंत दंडगव्हाळ,17,यादव सिंगनजुडे,2,योगा,1,योगेश कर्डिले,4,रजनी जोगळेकर,4,राजकीय कविता,6,राजकुमार शिंगे,1,रामचंद्राच्या आरत्या,5,राहुल अहिरे,3,रेश्मा विशे,1,रोहित काळे,7,रोहित साठे,14,लता मंगेशकर,1,लक्ष्मण अहिरे,2,लिलेश्वर खैरनार,2,लोणची,8,वासुदेव कामथ,1,वाळवणाचे पदार्थ,6,विचारधन,211,विठ्ठलाच्या आरत्या,5,विद्या कुडवे,4,विद्या जगताप,2,विनायक मुळम,1,विरह कविता,46,विराज काटदरे,1,विलास डोईफोडे,3,विवेक जोशी,2,विशेष,4,विष्णूच्या आरत्या,4,विज्ञान तंत्रज्ञान,2,वृषाली काकडे,2,वेदांत कोकड,1,वैभव सकुंडे,1,वैशाली झोपे,1,व्यंगचित्रे,15,व्हिडिओ,20,शंकराच्या आरत्या,4,शशांक रांगणेकर,1,शांततेच्या कविता,5,शांता शेळके,1,शारदा सावंत,4,शाळेच्या कविता,10,शितल सरोदे,1,शिक्षकांवर कविता,2,शुभम बंबाळ,2,शुभम सुपने,2,शेतकर्‍याच्या कविता,9,श्याम खांबेकर,1,श्रद्धा नामजोशी,9,श्रावणातल्या कहाण्या,27,श्रीनिवास खळे,1,श्रीरंग गोरे,1,संगीता अहिरे,1,संघर्षाच्या कविता,20,संजय पाटील,1,संजय बनसोडे,2,संजय शिवरकर,5,संजय सावंत,1,संत एकनाथ,1,संत तुकाराम,7,संत नामदेव,2,संत ज्ञानेश्वर,4,संतोष झोंड,1,संतोष सेलुकर,30,संदिप खुरुद,1,संदेश ढगे,37,संपादकीय,23,संपादकीय व्यंगचित्रे,14,संस्कार,1,संस्कृती,125,सचिन पोटे,8,सचिन माळी,1,सण-उत्सव,16,सणासुदीचे पदार्थ,32,सतिश चौधरी,1,सदाशिव गायकवाड,2,सनी आडेकर,10,सप्टेंबर,30,समर्थ रामदास,206,सरबते शीतपेये,8,सागर बनगर,1,सागर बाबानगर,1,सामाजिक कविता,88,सायली कुलकर्णी,5,साहित्य सेतू,1,साक्षी खडकीकर,9,सिमा लिंगायत-कुलकर्णी,1,सुदेश इंगळे,3,सुनिल नेटके,2,सुनील गाडगीळ,1,सुभाष कटकदौंड,2,सुमती इनामदार,1,सुरेश भट,1,सुशीला मराठे,1,सैनिकांच्या कविता,2,सैरसपाटा,97,सोमकांत दडमल,1,स्तोत्रे,1,स्फूर्ती गीत,1,स्वप्नाली अभंग,3,स्वाती खंदारे,204,स्वाती दळवी,6,स्वाती नामजोशी,31,स्वाती वक्ते,2,ह मुलांची नावे,1,हमार्टिक समा,1,हरितालिकेच्या आरत्या,1,हर्षद खंदारे,38,हर्षदा जोशी,3,हर्षवर्धन घाटे,1,हर्षाली कर्वे,2,हसनैन आकिब,3,हेमा चिटगोपकर,8,होळी,5,harshad-khandare,1,swati-khandare,1,
ltr
item
मराठीमाती | माझ्या मातीचे गायन: ललितापंचमीची कहाणी
ललितापंचमीची कहाणी
ललितापंचमीची कहाणी, श्रावणातल्या कहाण्या - [Lalitapanchamichi Kahani, Shravanatalya Kahanya] श्रावणात वाचल्या जाणाऱ्या श्रावणातल्या कहाण्यांपैकी एक कहाणी - ललितापंचमीची कहाणी.
https://4.bp.blogspot.com/-JmbRv_qCZi0/W5iTxT8-VZI/AAAAAAAABow/Cq50LTR2yWE8HCoyE4Ga8-yKiLI1ftbpACPcBGAYYCw/s1600/marathimati-logo-1280x720.png
https://4.bp.blogspot.com/-JmbRv_qCZi0/W5iTxT8-VZI/AAAAAAAABow/Cq50LTR2yWE8HCoyE4Ga8-yKiLI1ftbpACPcBGAYYCw/s72-c/marathimati-logo-1280x720.png
मराठीमाती | माझ्या मातीचे गायन
https://www.marathimati.com/2012/08/lalitapanchamichi-kahani.html
https://www.marathimati.com/
https://www.marathimati.com/
https://www.marathimati.com/2012/08/lalitapanchamichi-kahani.html
true
2079427118266147504
UTF-8
सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची