Loading ...

पाचा देवांची कहाणी

पाचा देवांची कहाणी, श्रावणातल्या कहाण्या - [Pacha Devanchi Kahani, Shravanatalya Kahanya] श्रावणात वाचल्या जाणाऱ्या श्रावणातल्या कहाण्यांपैकी एक कहाणी - पाचा देवांची कहाणी

पाचा देवांची कहाणी - श्रावणातल्या कहाण्या | Pacha Devanchi Kahani - Shravanatalya Kahanya

श्रावणात वाचल्या जाणाऱ्या श्रावणातल्या कहाण्यांपैकी एक - पाचा देवांची कहाणी

ऐका पाची देवांनो, तुमची कहाणी. एके दिवशी ईश्वरपार्वती पृथ्वीप्रदक्षिणा करण्यास निघाली. मुक्कामी उतरली. पार्वती पादसेवा करू लागली. तिचे हात कठीण लागले. तिला एका गरीब ब्राह्मणाच्या बायकोचं बाळंतपण करू सांगितलं. “तुझे हात कमळासारखे मऊ होतील.” पार्वतीनं ब्राह्मणाच्या बायकोचं बाळंतपण केलं. ती फार उतराई झाली. पार्वतीला म्हणाली, “तू माझी मायबहीण आहेस. मला काही वाण सांग, वसा सांग.” तिनं वसा सांगितला. काय सांगितला? चातुर्मास आला, आखाडी दशमी आली, गणपतीची पूजा करावी, दुर्वा वहाव्या, मोदकांचा नैवेद्य दाखवावा, वर तुपाची धार धरावी, कार्तिक्या दशमीस ब्राह्मण जेवायला सांगून आपल्या वशाचं उद्यापन करावं. याप्रमाणं विष्णूचं पूजन करावं. तुळशीपत्र वहावं, खिरीचा नैवेद्य दाखवावा, वर तुपाची धार धरावी आणि कार्तिकात ब्राह्मण सांगून उद्यापन करावं. तसंच नंदीला स्नान घालावं, आघाड्याचं पान वहावं; खिचडीचा नैवेद्य दाखवावा, वर तुपाची धार धरावी, ब्राह्मण सांगून उद्यापन करावं. तसंच महादेवाला स्नान घालावं, बेलाची पानं वहावी, दहीभाताचा नैवेद्य दाखवावा, वर तुपाची धार धरावी आणि ब्राह्मण जेवू घालून उद्यापन करावं. तसंच पार्वतीला स्नान घालावं, पांढरी फुलं वहावी, घारगेपुऱ्यांचा नैवेद्य दाखवावा आणि कार्तिकात ब्राह्मण जेवू सांगून उद्यापन करावं. हा वसा कधी घ्यावा? आखाड्या दशमीस घ्यावा. कार्तिक्या दशमीस संपूर्ण करावा.” असा तिनं वसा सांगितला व आपण अदृश्य झाली.

बरेच दिवस झाले. इकडे पार्वतीनं काय केलं? गरिबीचा वेष घेतला. त्या बाईला भेटायला गेली. तिनं हिला ओळखलं नाही. पार्वतीला राग आला, ती गणपतीकडे गेली. सगळी हकीकत सांगितली. “ती उतली आहे, मातली आहे, तिचं वैभव काढून टाक.” “ही गोष्ट मजपासून घडायची नाही. ती काही उतायची नाही, मातायची नाही. तिनं माझी चार महिने पूजा केली, दूर्वा वाहिल्या, मोदकांचा नैवेद्य दाखविला, वर तुपाची धार धरली आहे. मी काही तिचं वैभव काढणार नाही.” असं गणपतीनं म्हटल्यावर विष्णुकडे गेली, सगळी हकीकत सांगितली. “ती उतली आहे, मातली आहे. तिचं वैभव काढून टाक.” “ही गोष्ट मजकडून घडायची नाही. ती काही उतायची नाही, मातायची नाही. तिनं माझी चार महिने पूजा केली. तुळशीपत्र वाहिलं, खिरीचा नैवेद्य दाखविला, वर तुपाची धार धरली आहे. मी काही तिचं वैभव काढणार नाही.” तिथून उठली, नंदीकडे गेली. सगळी हकीगत सांगितली. “ती उतली आहे, मातली आहे, तिचं वैभव काढून टाक.” “ही गोष्ट मजकडून घडायची नाही. ती काही उतायची नाही. मातायची नाही, तिनं माझी चार महिने पूजा केली. आघाड्याचं पान वाहिलं. खिचडीचा नैवेद्य दाखविला, वर तुपाची धार धरली आहे. मी काही तिचं वैभव काढणार नाही.” तिथून उठली, महादेवाकडे गेली. सगळी हकिकत सांगितली. “ती उतली आहे. मातली आहे. तिचं वैभवं काढून टाकं.” “ही गोष्ट मजपासून घडायची नाही. ती काही उतायची नाही. मातायची नाही. तिनं माझी चार महिने पूजा केली. बेलाची पानं वाहली, दहीभाताचा नैवेद्य दाखविला, वर तुपाची धार धरली आहे. मी काही तिचं वैभव काढणार नाही. तूं गरिबीच्या वेषानं गेलीस म्हणून तुला ओळखलं नाहीं. पहिल्या वेषानं जा म्हणजे तुला ओळखील.” श्रीमंती वेषानं पार्वती पुन्हा गेली. बसायला पाट दिला. पाय धरून आभारी झाली. तिला पार्वती प्रसन्न झाली, उत्तम आशीर्वाद दिला.

जसे तिला पाच देव प्रसन्न झाले, तसे तुम्हा आम्हा होवोत. ही साठा उत्तराची कहाणी, पाचा उत्तरी, सुफळ संपूर्ण.

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची