सोळा सोमवारची कहाणी

सोळा सोमवारची कहाणी, श्रावणातल्या कहाण्या - [Sola Somvarachi Kahani, Shravanatalya Kahanya] श्रावणात वाचल्या जाणाऱ्या श्रावणातल्या कहाण्यांपैकी एक कहाणी - सोळा सोमवारची कहाणी.

सोळा सोमवारची कहाणी - श्रावणातल्या कहाण्या | Sola Somvarachi Kahani - Shravanatalya Kahanya

श्रावणात वाचल्या जाणाऱ्या श्रावणातल्या कहाण्यांपैकी एक - सोळा सोमवारची कहाणी

आटपाट नगर होतं. त्या नगरात एक महादेवाचं देऊळ होतं. एके दिवशी काय झालं? शिवपार्वती फिरता फिरता त्या देवळात आली. सारीपाट खेळू लागली. “डाव कोणी जिंकला?” म्हणून पार्वतीनं गुरवाला विचारलं. त्यानं शंकराचं नाव सांगितलं. पार्वतीला राग आला. गुरवाला “तू कोडी होशील” म्हणून शाप दिला. तशा त्याला असह्य वेदना होऊ लागल्या. पुढे एके दिवशी काय झालं? देवळी स्वर्गीच्या अप्सरा आल्या. त्यांनी गुरव कोडी पाहिला. त्याला कारण पुसिलं. गुरवानं गिरिजेचा शाप सांगितला. त्या म्हणाल्या, “भिऊ नको. घाबरू नको. तू सोळा सोमवारचं व्रत कर, म्हणजे तुझं कोड जाईल.” गुरव म्हणाला, “ते व्रत कसं करावं?” अप्सरांनी सांगितलं, “सारा दिवस उपास करावा. संध्याकाळी आंघोळ करावी. शंकराची पूजा करावी. नंतर अर्धा शेर कणीक घेऊन त्यात तूप गूळ घालावा व ते खावं. मीठ त्या दिवशी खाऊं नये. त्याप्रमाणं सोळा सोमवार करावे. सतरावे सोमवारी पाच शेर कणीक घ्यावी, त्यात तूप गूळ घालून चूर्मा करावा. तो देवळी न्यावा. भक्तीनं शंकराची षोडशोपचारे पूजा करावी. नंतर चुर्म्याचा नैवद्य दाखवावा. पुढं त्याचे तीन भाग करावे. एक भाग देवाला द्यावा. दुसरा भाग देवळी ब्राह्मणांना वाटावा किंवा गाईला चारावा, तिसरा भाग आपण घरी घेऊन जाऊन सहकुटुंबी भोजन करावं.” असं सांगून त्या नाहीशा झाल्या. पुढं गुरवानं ते व्रत केलं, गुरव चांगला झाला.

पुढं काही दिवसांनीं शंकरपार्वती पुन्हा त्या देऊळी आली. पार्वतीनं गुरवाला कुष्ठरहित पाहिलं. तिनं गुरवाला विचारलं, “तुझं कोड कशानं गेलं?” गुरवानं सांगितलं, “मी सोळा सोमावारचं व्रत केलं, त्यानं माझं कोड गेलं.” पार्वतीला आश्चर्य वाटलं. तिनं आपला रागावून गेलेला मुलगा कार्तिकस्वामी परत यावा म्हणून हे व्रत केलं. समाप्तीनंतर कार्तिकस्वामी लागलीच येऊन भेटला. दोघांना आनंद झाला. त्यानं आईला विचारलं “आई, आई, मी तर तुझ्यावर रागावून गेलो होतो आणि मला पुन्हा तुझ्या भेटीची इच्छा झाली, याचं कारण काय?” पार्वतीनं त्याला सोळा सोमवारच्या व्रताचा महिमा सांगितला. पुढे कार्तिकस्वामीनं ते व्रत केलं.

त्याचा एक ब्राह्मण मित्र फार दिवस देशांतराला गेला होता. त्याची व ह्याची सहज रस्त्यात भेट झाली. पुढे कार्तिकस्वामींनं हे व्रत त्या ब्राह्मणाला सांगितलं. त्यानं लग्नाचा हेतु मनात धरला. मनोभावे सोळा सोमवाराचं व्रत केलं. समाप्तीनंतर तो प्रवासाला निघाला. फिरता फिरता एका नगरात आला. तिथं काय चमत्कार झाला? तिथल्या राजाच्या मुलीचं लग्न होतं. लग्नाला अनेक देशांचे राजपुत्र आले होते. मंडप चांगले सुशोभित केले आहेत. लग्नाची वेळ झाली आहे. पुढं राजानं हत्तिणीच्या सोंडेत माळ दिली. माळ ज्याच्या गळ्यात हत्तीण घालील, त्याला आपली मुलगी द्यायची असा राजाचा पण होता. तिथं आपला हा ब्राह्मण ती मौज पहायला गेला होता. पुढं कर्मधर्मसंयोगानं ती माळ हत्तिणीनं ह्याच ब्राह्मणाच्या गळ्यात घातली, तशी राजानं आपली मुलगी त्याला दिली. दोघांचं लग्न लावलं व नवरानवरीची बोळावण केली.

[next] पुढं काय झालं? राजाची मुलगी मोठी झाली. तशी दोघं नवराबायको एका दिवशी खोलीत बसली आहेत. तसं बायकोनं नवऱ्याला विचारलं, “कोणत्या पुण्यानं मी आपणास प्राप्त झाले?” त्यानं तिला सोळा सोमवारच्या व्रताचा महिमा सांगितला. त्या व्रताची प्रचिती पाहण्याकरिता पुत्रप्राप्तीचा हेतु मनात धरला व ते व्रत ती करू लागली. तसा तिला सुंदर मुलगा झाला. तो मोठा झाल्यावर त्यानं आईला विचारलं की, “मी कोणत्या पुण्यानं तुला प्राप्त झालो?” तिनं त्याला व्रताचा महिमा सांगितला. त्यानं राज्यप्राप्तीची इच्छा मनात धरली. तो व्रत करू लागला व देशपर्यटनाला निघाला. इकडे काय चमत्कार झाला? फिरता फिरता तो एका नगरात गेला. त्या राजाला मुलगा नव्हता, एक मुलगी मात्र होती. तेव्हा कोणीतरी एखादा सुंदर व गुणवान असा नवरामुलगा पाहून त्याला आपली मुलगी द्यावी व राज्यही त्यालाच द्यावं, असा त्यानं विचार केला. अनायसं त्या पुत्राची गाठ पडली. राजानं त्याला पाहिलं. तो राजचिन्ह त्याच्या दृष्टीस पडली. राजानं त्याला आपल्या घरी आणलं. कन्यादान केलं व त्याला आपल्या राज्यावर बसवलं. इतकं होत आहे तो ब्राह्मणाचा सतरावा सोमवार आला. ब्राह्मणपुत्र देऊळी गेला. घरी बायकोला निरोप पाठविला की, पाच शेर कणकीचा चुर्मा पाठवून दे. राणीनं आपला थोरपणा मनात आणला. चुर्म्याला लोक हसतील, म्हणून एका तबकात पाचशे रुपये भरून ते पाठवून दिले. चुर्मा वेळेवर आला नाही, व्रतभंग झाला म्हणून देवाला राग आला. त्यानं राजाला दृष्टांत दिला. तो काय दिला? राणीला घरात ठेवशील तर राज्याला मुकशील. दरिद्रानं पिडशील. असा शाप दिला. पुढं दुसरे दिवशी ही गोष्ट राजानं प्रधानाला सांगितली. तो म्हणाला. “महाराज, राज्य हे तिच्या बापाचं. आपण असं करू लागलो तर लोक दोष देतील, याकरितां असं करणं अयोग्य आहे.” राजा म्हणाला, ‘ईश्वराचा दृष्टांत अमान्य करणं हेही अयोग्य आहे.” मग उभयतांनी विचार केला. तिला नगरातून हाकलून लावलं.

पुढं ती दीन झाली. रस्त्यानं जाऊ लागली. जाता जाता एका नगरात गेली. तिथं एका म्हातारीच्या घरी उतरली. तिनं तिला ठेवून घेतलं, खाऊपिऊ घातलं. पुढं काय झालं? एके दिवशी म्हातारीनं तिला चिवटं विकायला पाठवलं. दैवाची गति विचित्र आहे! बाजारात ती चालली. मोठा वारा आला, सर्व चिवटं उडून गेली. तिनं घरी येऊन म्हातारीला सांगितलं. तिनं तिला घरातून हाकलून लावलं. तिथून निघाली तो एका तेल्याच्या घरी गेली, तिथे तेलाच्या घागरी भरल्या होत्या, त्याजवर तिची नजर गेली. तसं त्यातलं सगळं तेल नाहीसं झालं. म्हणून तेल्यानं तिला घालवून दिलं. पुढं तिथून निघाली. वाटेनं जाऊ लागली. जाता जाता एक नदी लागली. त्या दिवशी नदीला पाणी पुष्कळ होतं. पण तिची दृष्टी त्याजवर गेल्याबरोबर सर्व पाणी आटून गेलं. पुढं जाता जाता एक सुंदर तळं लागलं. त्याजवर तिची दृष्टी गेली, तसे पाण्यात किडे पडले. पाणी नासून गेलं. रोजच्यासारखे तळ्यावर गुराखी आले. नासकं पाणी पाहून मागं परतले. गुरंढोरं तान्हेली राहिली. पुढं काय झालं? तिथं एक गोसावी आला. त्यानं तिला पाहिलं. कोण कुठची म्हणून सगळी हकीकत विचारली. तिनं सगळी हकीकत सांगितली. गोसाव्यानं तिला धर्मकन्या मानलं व आपले घरी घेऊन आला. तिथं राहून ती कामधंदा करू लागली. तशी जिकडे तिकडे तिची दृष्टी जाऊ लागली. ज्यात तिची दृष्टी जाई त्यात किडे पडावे, काही जिनसा आपोआप नाहीशा व्हाव्या, असा चमत्कार होऊ लागला. मग गोसाव्यानं विचार केला. अंतदृष्टी लावली. तिच्या पदरी व्रत मोडल्याचं पाप आहे असं त्यानं जाणलं. ते नाहीसं केल्याशिवाय तिची दृष्टी चांगली होणार नाही असं ठरवलं. मग त्यानं शंकराची प्रार्थना केली. देव प्रसन्न झाले. गोसाव्यानं राणीबद्दल प्रार्थना केली. शंकरानं तिला सोळा सोमवारचं व्रत करायला सांगितलं व आपण अंतर्धान पावले. पुढं गोसाव्यानं तिच्याकडून सोळा सोमवाराचं व्रत करविलं, तसा परमेश्वराचा कोप नाहीसा झाला.

तिच्या नवऱ्याला तिच्या भेटीची इच्छा उद्भवली. दूत चोहीकडे शोधाला पाठवले. शोधता शोधता तिथं आले. गोसाव्याच्या मठीत राणीला पाहिलं. तसंच जाऊन त्यांनी सांगितलं. त्याला मोठा आनंद झाला. राजा प्रधानासुद्धा गोसाव्याकडे आला. गोसाव्याला साष्टांग नमस्कार केला. वस्त्रप्रावर्ण देऊन संतोषित केलं. गोसावी म्हणाला, “राजा राजा, ही माझी धर्मकन्या. मी इतके दिवस तिला माहेरी ठेवूनी घेतलं होतं, ती तुझी स्त्री आपले घरी घेऊन जा व चांगल्या रीतीनं पाणिग्रहण करून सुखानं नांद.” राजानं होय म्हटलं. गोसाव्याला जोड्यानं नमस्कार केला व राणीला घेवून आपल्या नगरी आला. पुढं मोठा उत्सव केला. दानदक्षिणा देऊन ब्राह्मण संतुष्ट केले. राजाराणींची भेट झाली. आनंदानं रामराज्य करू लागली.

तसे तुम्ही शंकराला प्रसन्न करून रामराज्य करा. ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी, देवाब्राह्मणांचे द्वारी, गाईचे गोठीत, पिंपळाचे पारी सुफळ संपूर्ण.

अभिप्राय

ब्लॉगर


  सामायिक करा


नाव

अंधश्रद्धेच्या कविता,5,अजय दिवटे,1,अजित पाटणकर,18,अनिकेत शिंदे,1,अनिल गोसावी,2,अनुभव कथन,12,अनुराधा फाटक,39,अपर्णा तांबे,7,अब्राहम लिंकन,2,अभंग,2,अभिव्यक्ती,924,अमन मुंजेकर,6,अमरश्री वाघ,2,अमित पडळकर,4,अमित पवार,1,अमित बाविस्कर,3,अमुक-धमुक,1,अमोल देशमुख,1,अमोल वाघमारे,1,अमोल सराफ,2,अर्थनीति,3,अलका खोले,1,अश्विनी तातेकर-देशपांडे,1,अक्षय वाटवे,1,अक्षरमंच,690,आईच्या कविता,19,आईस्क्रीम,3,आकाश पवार,1,आकाश भुरसे,8,आज,12,आजीच्या कविता,1,आठवणींच्या कविता,13,आतले-बाहेरचे,3,आतिश कविता लक्ष्मण,1,आत्मविश्वासाच्या कविता,9,आनंद दांदळे,8,आनंदाच्या कविता,20,आभिजीत टिळक,2,आमट्या सार कढी,16,आरती गांगन,2,आरती शिंदे,4,आरत्या,82,आरोग्य,4,आशिष खरात-पाटील,1,इंद्रजित नाझरे,26,इसापनीती कथा,44,उदय दुदवडकर,1,उन्मेष इनामदार,1,उपवासाचे पदार्थ,13,उमेश कानतोडे,1,उमेश कुंभार,12,ऋग्वेदा विश्वासराव,3,ऋचा पिंपळसकर,10,ऋचा मुळे,16,ऋषिकेश शिरनाथ,2,एप्रिल,30,एहतेशाम देशमुख,2,ऑक्टोबर,31,ऑगस्ट,31,ओंकार चिटणीस,1,कपिल घोलप,11,करमणूक,43,कर्क मुलांची नावे,1,कविता शिंगोटे,1,कवितासंग्रह,7,कार्यक्रम,9,कालिंदी कवी,2,किल्ले,92,किल्ल्यांचे फोटो,5,किशोर चलाख,6,कुठेतरी-काहीतरी,2,कुणाल खाडे,1,कुसुमाग्रज,1,कृष्णाच्या आरत्या,5,केदार कुबडे,40,केदार नामदास,1,केदार मेहेंदळे,1,केशवसुत,1,कोशिंबीर सलाड रायते,14,कौशल इनामदार,1,खंडोबाची स्थाने,1,खंडोबाच्या आरत्या,2,खरगपूर,1,गणपतीच्या आरत्या,5,गणेश तरतरे,10,गणेश पाटील,1,गण्याचे विनोद,1,गाडगे बाबा,1,गावाकडच्या कविता,10,गुरूच्या आरत्या,2,गुलझार काझी,1,गोड पदार्थ,57,घरचा वैद्य,2,घाट,1,चटण्या,3,चातुर्य कथा,6,चित्रपट समीक्षा,1,चैतन्य म्हस्के,1,जयश्री मोहिते,1,जानेवारी,31,जिल्हे,1,जीवनशैली,366,जुलै,31,जून,30,ज्योती मालुसरे,1,टीझर्स,1,ट्रेलर्स,3,डिसेंबर,31,तरुणाईच्या कविता,4,तिच्या कविता,48,तुकाराम गाथा,4,तेजस्विनी देसाई,1,दत्ताच्या आरत्या,5,दर्शन जोशी,2,दादासाहेब गवते,1,दिनदर्शिका,372,दिनविशेष,366,दिनेश बोकडे,1,दिनेश लव्हाळे,1,दिनेश हंचाटे,1,दिपक शिंदे,2,दिवाळी फराळ,26,दीप्तीदेवेंद्र,1,दुःखाच्या कविता,68,देवीच्या आरत्या,3,देशभक्तीपर कविता,2,धार्मिक स्थळे,1,धोंडोपंत मानवतकर,9,निखिल पवार,3,निमित्त,3,निराकाराच्या कविता,7,निवडक,1,निसर्ग कविता,16,नोव्हेंबर,30,न्याहारी,41,पंचांग,6,पथ्यकर पदार्थ,2,पराग काळुखे,1,पल्लवी माने,1,पांडुरंग वाघमोडे,3,पाककला,301,पालकत्व,6,पावसाच्या कविता,19,पी के देवी,1,पुडिंग,10,पुणे,9,पोस्टर्स,5,पोळी भाकरी,18,पौष्टिक पदार्थ,19,प्रजोत कुलकर्णी,1,प्रतिक बळी,1,प्रतिभा जोजारे,1,प्रतिक्षा जोशी,1,प्रफुल्ल चिकेरूर,10,प्रभाकर लोंढे,3,प्रवास वर्णन,1,प्रवासाच्या कविता,10,प्रविण पावडे,10,प्रवीण राणे,1,प्रसन्न घैसास,2,प्रज्ञा वझे-घारपुरे,10,प्राजक्ता गव्हाणे,1,प्रिती चव्हाण,11,प्रिया जोशी,1,प्रियांका न्यायाधीश,3,प्रेम कविता,78,प्रेरणादायी कविता,14,फेब्रुवारी,29,फोटो गॅलरी,11,बा भ बोरकर,1,बातम्या,6,बाबा आमटे,1,बाबाच्या कविता,1,बायकोच्या कविता,3,बालकविता,11,बालकवी,1,बाळाची मराठी नावे,1,बाळासाहेब गवाणी-पाटील,1,बिपीनचंद्र नेवे,1,बेकिंग,9,भक्ती कविता,8,भरत माळी,1,भाज्या,28,भाताचे प्रकार,16,भूमी जोशी,1,मंगळागौरीच्या आरत्या,2,मंजुषा कुलकर्णी,2,मंदिरांचे फोटो,2,मंदिरे,1,मधल्या वेळेचे पदार्थ,35,मनाचे श्लोक,205,मनिषा दिवेकर,3,मराठी उखाणे,2,मराठी कथा,92,मराठी कविता,534,मराठी गझल,17,मराठी गाणी,2,मराठी गोष्टी,1,मराठी चारोळी,1,मराठी चित्रपट,12,मराठी टिव्ही,27,मराठी नाटक,1,मराठी पुस्तके,4,मराठी प्रेम कथा,23,मराठी भयकथा,41,मराठी रहस्य कथा,2,मराठी लेख,30,मराठी विनोद,1,मराठी साहित्य,13,मराठी साहित्यिक,1,मराठी सुविचार,2,मराठीमाती,293,मसाले,12,महाराष्ट्र,274,महाराष्ट्र फोटो,9,महाराष्ट्राचा इतिहास,32,महाराष्ट्रीय पदार्थ,19,महालक्ष्मीच्या आरत्या,2,महेश बिऱ्हाडे,2,मांसाहारी पदार्थ,17,माझं मत,1,माझा बालमित्र,54,मातीतले कोहिनूर,14,मारुतीच्या आरत्या,2,मार्च,31,मुंबई,8,मुकुंद शिंत्रे,35,मुक्ता चैतन्य,1,मुलांची नावे,1,मुलाखती,1,मे,31,मैत्रीच्या कविता,5,मोहिनी उत्तर्डे,1,यश सोनार,2,यशपाल कांबळे,2,यशवंत दंडगव्हाळ,17,यादव सिंगनजुडे,2,योगा,1,योगेश कर्डिले,4,रजनी जोगळेकर,4,रागिनी पवार,1,राजकीय कविता,6,राजकुमार शिंगे,1,राजेंद्र भोईर,1,राजेश्वर टोणे,1,रामचंद्राच्या आरत्या,5,राहुल अहिरे,3,रेश्मा विशे,1,रोहित काळे,7,रोहित साठे,14,लता मंगेशकर,1,लक्ष्मण अहिरे,2,लिलेश्वर खैरनार,2,लोणची,9,वात्रटिका,2,वासुदेव कामथ,1,वाळवणाचे पदार्थ,6,विचारधन,211,विठ्ठलाच्या आरत्या,5,विद्या कुडवे,4,विद्या जगताप,2,विनायक मुळम,1,विरह कविता,50,विराज काटदरे,1,विलास डोईफोडे,4,विवेक जोशी,2,विशेष,5,विष्णूच्या आरत्या,4,विज्ञान तंत्रज्ञान,2,वृषाली काकडे,2,वृषाली सुनगार-करपे,1,वेदांत कोकड,1,वैभव सकुंडे,1,वैशाली झोपे,1,व्यंगचित्रे,17,व्हिडिओ,20,शंकराच्या आरत्या,4,शशांक रांगणेकर,1,शांततेच्या कविता,5,शांता शेळके,1,शारदा सावंत,4,शाळेच्या कविता,10,शितल सरोदे,1,शिक्षकांवर कविता,2,शुभम बंबाळ,2,शुभम सुपने,2,शेतकर्‍याच्या कविता,10,शेती,1,श्याम खांबेकर,1,श्रद्धा नामजोशी,9,श्रावणातल्या कहाण्या,27,श्रीनिवास खळे,1,श्रीरंग गोरे,1,संगीता अहिरे,1,संघर्षाच्या कविता,21,संजय पाटील,1,संजय बनसोडे,2,संजय शिवरकर,5,संजय सावंत,1,संत एकनाथ,1,संत तुकाराम,7,संत नामदेव,2,संत ज्ञानेश्वर,4,संतोष झोंड,1,संतोष सेलुकर,30,संदिप खुरुद,5,संदेश ढगे,37,संपादकीय,25,संपादकीय व्यंगचित्रे,16,संस्कार,2,संस्कृती,128,सचिन पोटे,12,सचिन माळी,1,सण-उत्सव,17,सणासुदीचे पदार्थ,32,सतिश चौधरी,1,सदाशिव गायकवाड,2,सनी आडेकर,10,सप्टेंबर,30,समर्थ रामदास,206,समर्पण,9,सरबते शीतपेये,8,सागर बनगर,1,सागर बाबानगर,1,सामाजिक कविता,96,सायली कुलकर्णी,6,साहित्य सेतू,1,साक्षी खडकीकर,9,सिद्धी भालेराव,1,सिमा लिंगायत-कुलकर्णी,1,सुदेश इंगळे,3,सुनिल नेटके,2,सुनील गाडगीळ,1,सुभाष कटकदौंड,2,सुमती इनामदार,1,सुरेश भट,1,सुशील दळवी,1,सुशीला मराठे,1,सैनिकांच्या कविता,2,सैरसपाटा,97,सोपानदेव चौधरी,1,सोमकांत दडमल,1,स्तोत्रे,1,स्फूर्ती गीत,1,स्वप्नाली अभंग,4,स्वाती खंदारे,300,स्वाती दळवी,6,स्वाती नामजोशी,31,स्वाती वक्ते,2,ह मुलांची नावे,1,हमार्टिक समा,1,हरितालिकेच्या आरत्या,1,हर्षद खंदारे,38,हर्षदा जोशी,3,हर्षवर्धन घाटे,1,हर्षाली कर्वे,2,हसनैन आकिब,3,हेमा चिटगोपकर,8,होळी,5,harshad-khandare,1,swati-khandare,1,
ltr
item
मराठीमाती | माझ्या मातीचे गायन: सोळा सोमवारची कहाणी
सोळा सोमवारची कहाणी
सोळा सोमवारची कहाणी, श्रावणातल्या कहाण्या - [Sola Somvarachi Kahani, Shravanatalya Kahanya] श्रावणात वाचल्या जाणाऱ्या श्रावणातल्या कहाण्यांपैकी एक कहाणी - सोळा सोमवारची कहाणी.
https://4.bp.blogspot.com/-JmbRv_qCZi0/W5iTxT8-VZI/AAAAAAAABow/Cq50LTR2yWE8HCoyE4Ga8-yKiLI1ftbpACPcBGAYYCw/s1600/marathimati-logo-1280x720.png
https://4.bp.blogspot.com/-JmbRv_qCZi0/W5iTxT8-VZI/AAAAAAAABow/Cq50LTR2yWE8HCoyE4Ga8-yKiLI1ftbpACPcBGAYYCw/s72-c/marathimati-logo-1280x720.png
मराठीमाती | माझ्या मातीचे गायन
https://www.marathimati.com/2012/08/sola-somvarachi-kahani.html
https://www.marathimati.com/
https://www.marathimati.com/
https://www.marathimati.com/2012/08/sola-somvarachi-kahani.html
true
2079427118266147504
UTF-8
सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची