Loading ...
/* Dont copy */

ॐ नमो आद्यरूपे - महालक्ष्मीची आरती

ॐ नमो आद्यरूपे, महालक्ष्मीची आरती - [Om Namo Aadyarupe Mahalaxmichi Aarti] ॐ नमो आद्यरूपे, देवी भगवती माते, काळिका कामरूप.

ॐ नमो आद्यरूपे - महालक्ष्मीची आरती | Om Namo Aadyarupe Mahalaxmichi Aarti

ॐ नमो आद्यरूपे, देवी भगवती माते, काळिका कामरूप

ॐ नमो आद्यरूपे ।
देवी भगवती माते ॥
काळिका कामरूप ।
शक्ति तूं जगन्माते ॥
वैष्णवी भूतमाया ।
मूळपीठ देवते ॥
झालिया भेटी तूझी ।
नीवारिसी पापंतें ॥ १ ॥

जय श्रीकुलदेवते ।
महालक्ष्मी ग माते ।
आरती घेउनीयां ।
ओंवाळीन मी तूतें ॥ ध्रु० ॥

अंबिका भद्रकाली ।
देवी आद्या कुमारी ॥
मारिलें चंडमुंड ।
महिषासुर हे वैरी ॥
हर्षले देवद्विज ।
गाती जयजयकारी ॥
उजळुनी दीपमाळा ।
ओंवाळीती नरनारी ॥ जय० ॥ २ ॥

परिधान हेमवर्ण ।
कंठीं नवरत्नें हार ॥
करतळें रातोत्पळें ।
अद्भुत जयजयकार ॥
अवतार कोल्हापुरी ।
केला प्रताप थोर ॥
मारिले दैत्य बिकट ।
अघट कोल्हासुर ॥ जय० ॥ ३ ॥

नासिकीं मुक्ताफळ ।
रत्नकुंडलें श्रवणीं ॥
घवघवीत नेपुरें हो ।
अंदु वाजती चरणीं ॥
मस्तकीं पुष्पहार ।
दिसे भासे वदनीं ॥
पौर्णिमाचंद्रबिंब ।
पृष्ठीवरी रुळे वेणी ॥ जय० ॥ ४ ॥

नवकोटी कात्यायनी ।
चतुःषष्टी योगिनी ॥
भूचरां जलचरां ।
आई तुजपासुनी ॥
ऐसी तूं महालक्ष्मी ।
जगताची जननी ॥
नामया विष्णुदासा ।
तुझें चिंतन ध्यानीं ॥ जय० ॥ ५ ॥

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची