फाटून आभाळ आता - मराठी गझल

फाटून आभाळ आता, मराठी गझल - [Phatun Abhal Ata, Marathi Ghazal] फाटून आभाळ आता, गेले विझून तारे, उधळीत वेदनांना, येती दूरुन वारे.

फाटून आभाळ आता, गेले विझून तारे, उधळीत वेदनांना, येती दूरुन वारे

फाटून आभाळ आता
गेले विझून तारे
उधळीत वेदनांना
येती दूरुन वारे

नाहीच आज आला
गंध ही बाहेर फुलांच्या
काठावरी पाकळीच्या
आहेत अजून पहारे

आता कुठे जरासा
पडला उजेड दारी
अंधार वेचनारे
येती कुठून नारे

आवाज नदीचा शांत
झाला कसा कळेंना
झाडावरून आता
जाती उडून पाखरे
संतोष सेलुकर | Santosh Selukar
परभणी, महाराष्ट्र (भारत) । सभासद, मराठीमाती डॉट कॉम
लिखाणाची आवड असणारे आणि व्यवसायाने शिक्षकी पेशात असलेले संतोष सेलुकर यांचा ‘दुरचे गाव’ हा कविता संग्रह प्रकाशित झालेला आहे.

२ टिप्पण्या

 1. संतोष दादा,

  मराठीमाती डॉट कॉम येथे प्रकाशित आपल्या सर्व मराठी गझल वाचल्या आहेत.
  आपल्या सर्वच रचना फारच अर्थपूर्ण आहेत.
  1. अंकिता,

   आपल्याला संतोष सेलुकर यांच्या रचना आवडल्या यात आम्हाला आनंदच आहे.
   आपल्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद!
स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.