प्रेमाच्या गोंडस नावानं, तुझ्या सहवासातले, ते क्षण
प्रेमाच्या गोंडस नावानंतुझ्या सहवासातले
ते क्षण...
ते होते तुझ्यातल्या
पशूचे, वासनांचे व्रण...
वाटलं तुझं कौतुक
पण,
कौतुकाचा पदर
ढळता ढळताच
तुझ्यातलं पशुत्व
समोर आलं...
तुझा लबाड चेहरा
पुसून टाकून
अंगावरचा पदर लपेटत
तुझ्यापासून दूर झाले
तुला कधीही
न भेटण्यासाठी