तेव्हा, तुझ्या खांद्यावर मान टाकून, आसवात भिजलेलं, मनावरचं ओझं
तेव्हा,तुझ्या खांद्यावर मान टाकून
आसवात भिजलेलं
मनावरचं ओझं
तुझ्या खांद्यावर देणार होते
त्याचवेळी तू...
मला बाजूला करत
खांदा झटकलास...
तुला काळजी होती
शर्ट ओला होण्याची
कारण तो किंमती होता
माझ्या आसवांपेक्षा..!
आज,
पराभूत तू
अचानक माझ्या खांद्यावर
डोकं ठेवलंस...
मी नाही झटकला खांदा
कारण,
तुझा पराभव झेलण्यास
तो समर्थ आहे