कापूस पिंजून काढावा, तसं पिंजून काढलं मन
कापूस पिंजून काढावातसं पिंजून काढलं मन
त्या पिंजण्यात नाही सापडली
अविचरांची गाठ, चुकीची बोच
मग
तुला खुपत काय होत
माझं समाधान तृप्ती
की तुझा अहंकार
मला काहीच नाही खुपलं
दगडावर हात ठेवून झोपणारी मी
तुझ्या अहंकाराच्या, तिरस्काराच्या
गाठी कशा टोचणार?
मी तुझ्याकडं पाहील
मला दिसलं तुझं विस्कटलेलं मन
जाणवल्या अहंकाराच्या गाठी
आता मी नाही पिंजणार
माझं मन
माझ्या विचारांनी, आचारांनी
तूच घे पिंजून
तूच तुख्या जीवनाचा
मऊ बिछाना तयार कर
उबदार दुलईसाठी आहेच
माझं पिंजलेलं मन