अधांतरी - मराठी कविता

अधांतरी, मराठी कविता - [Adhantari, Marathi Kavita] मानस सरोवरीच्या हंसा, जा उडून कुठंतरी, मीच आहे अधांतरी, तुला कसा सांभाळू?

मानस सरोवरीच्या हंसा, जा उडून कुठंतरी, मीच आहे अधांतरी, तुला कसा सांभाळू?

मानस सरोवरीच्या हंसा
जा उडून कुठंतरी
मीच आहे अधांतरी
तुला कसा सांभाळू?
मनीच्या खोपीतल्या सुगरणी
नको बांधू नवे घरटे
नैराश्याचे बोचणारे काटे
तुझ्या घरट्यात अडकतील,
अन्‌ घरट्याची नाजूक वीण
विस्कटून विस्कटून जाईल!
नको लावूस कोकीळे
मन जागाविण्य पंचम!
आघात सोसून सोसून
थंड पडलंय माझं मन!
या थंडगार मनात
कसे राहतील
हंस, कोकीळ, सुगरण
त्यांच्या मनानं घ्यावं भरारी
मनातून माझ्या जावे अंबरी
मला माहीत आहे
मीच आहे अधांतरी!


अनुराधा फाटक | Anuradha Phatak
सभासद, मराठीमाती डॉट कॉम
मराठी कविता या विभागात लेखन.

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.