अशी तापले तापले, सांग कशी थंडावू रे, एका एका थेंबासाठी, जीव झाला खुळा रे
अशी तापले तापलेसांग कशी थंडावू रे
एका एका थेंबासाठी
जीव झाला खुळा रे
आता येरे झरझर
पाणी पाहू डोळाभर
माझी इवलीशी कूस
तुजसाठी कासावीस गर्भ कोंभाचा धरण्या
किती कराव्या मागण्या
बीज अंकुरण्या पोटी
किती करावी आटापिटी
नाही धीर धरवत
पाणावले बघ नेत्र
डोळीयाचा माठ आत
झालारे आत जड