मनातलं वादळ - मराठी कविता

मनातलं वादळ, मराठी कविता - [Manatala Vadal, Marathi Kavita] तुझ्या मनातल्या वादळानं, ज्या शब्दांचं रूप घेतलं.

तुझ्या मनातल्या वादळानं, ज्या शब्दांचं रूप घेतलं

तुझ्या मनातल्या वादळानं
ज्या शब्दांचं रूप घेतलं
त्या शब्दांनीच,
माझ्या मनाची माती
विस्कटून गेली
तिचा फोफाटा झाला
मनाची जमीन सोडून
विचारांचा कोश मोडून
तुझ्या शाब्दिक वादळाला
न जुमानता
माझं मन
उंच उंच गेलं
आता,
ते तुझ्या बंधनात
कधीच अडकणार नव्हतं!
मूकपणानं मी,
तुझ्यासमवेत उरले
मनाशिवाय देहानं
गंध नसलेल्या फुलासारखं
ज्याला
कोण हुंगणार
याची भीती नसते
मी यापेक्षा वेगळी नव्हते
आता तुझ्या मनातल्या वादळाला
तुलाच पेलावं लागणार आहे


अनुराधा फाटक | Anuradha Phatak
सभासद, मराठीमाती डॉट कॉम
मराठी कविता या विभागात लेखन.

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.