मनमोर - मराठी कविता

मनमोर, मराठी कविता - [Manmor, Marathi Kavita] अनामिक तृप्तीने, आनंदला मनमोर, फुलविले पिसाऱ्यास, आनंदे नाचण्यास.

अनामिक तृप्तीने, आनंदला मनमोर, फुलविले पिसाऱ्यास, आनंदे नाचण्यास

अनामिक तृप्तीने
आनंदला मनमोर
फुलविले पिसाऱ्यास
आनंदे नाचण्यास
नाचला धुंद होऊनी
अन्‌ दुसऱ्याच क्षणी...
पिसाऱ्याच्या असंख्य डोळ्यांनी
जे दिसले मन्मनी...
मनमोराचा आनंद लोपला
भीतीनं तो घाबरला
पिसारा फुललेला
नकळत मिटला
मनमोराचा कंठ
दाटून आला
मूक रुदनाने
डोळे भरले
भरल्या डोळ्याने
पायाकडे पाहिले
खेदाने हसला
हेच जगाचे खरे रूप!


अनुराधा फाटक | Anuradha Phatak
सभासद, मराठीमाती डॉट कॉम
मराठी कविता या विभागात लेखन.

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.