माझ्यात जीवनाची मैफल रंगवीत गेले, गाणे जुनेच तरीही तराणा बदलत गेले
माझ्यात जीवनाची मैफल रंगवीत गेलेगाणे जुनेच तरीही तराणा बदलत गेले
सुटला कधी ना ताल ठेका धरीत गेले
गाण्यातील सूर होते जरी जुने ते
शब्दांगणात माझ्या नाविन्य बहरले ते
जे जे समोर होते ते ते सुखवीत गेले
माझ्याच जीवनाची मैफल रंगवीत गेले
कधी लागली जरी तेच ना दिसली परि खाच
अंतरीच्या स्पंदनी जे त्या लावली ना आच
मन्मनीच्या उमाळ्याला सजवीन मीच गेले
माझ्याच जीवनाची मैफल रंगवीत गेले