Loading ...

आशेचा हिंदोळा (मराठी कविता)

आशेचा हिंदोळा, मराठी कविता - [Aashecha Hindola, Marathi Kavita] आशेच्या हिंदोळ्यावर बसून, दूरवर बघत बघत, स्वप्न पहाण्याचा, आता कंटाळा आलाय.

आशेचा हिंदोळा - मराठी कविता | Aashecha Hindola - Marathi Kavita

आशेच्या हिंदोळ्यावर बसून, दूरवर बघत बघत, स्वप्न पहाण्याचा, आता कंटाळा आलाय


आशेचा हिंदोळा (मराठी कविता)

मराठीमाती डॉट कॉम च्या सभासद कवयित्री अनुराधा फाटक यांची ‘वादळे झेलतांना’ या कविता संग्रहातील ‘आशेचा हिंदोळा’ ही कविता.



आशेच्या हिंदोळ्यावर बसून
दूरवर बघत बघत
स्वप्न पहाण्याचा
आता कंटाळा आलाय
अंत नाही आशेला
त्यावर बांधलेल्या मनोरथाला
त्या मनोरथानीच
आजवर मला फसवलं
मी वेडी
त्या आशेच्या पंखावर
स्वार झाले
आता समजलं
आशेचे ते पंख
परिस्थितीनं छाटून टाकले
पण वेड्या मनानं
मानलच नाही.
पुन्हा बसले.
त्या निर्जीव
आशेच्या झोपाळ्यावर!
बसून बसून कंटाळले!
वाटतं त्या हिंदोळ्याचे दोर
कुणीतरी कापावेत
म्हणजे
मी धपकन आपटेन
वास्तवाच्या जमिनीवर
स्वप्न संपतील
जीवनाचा अर्थ समजेल




अनुराधा फाटक | Anuradha Phatak
सभासद, मराठीमाती डॉट कॉम । पुणे
मराठी कविता या विभागात लेखन.

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची